Submitted by सुधाकर.. on 23 August, 2012 - 12:58
हृदयाच्या त्या शब्दासाठी हरवून सारे भान.
होते कधीचे अतुरलेले माझे हळवे कान
अवचित आले तुझ्याकडूनी होकाराचे दान
आणि माझ्या मनात फ़ुलले गुलमोहराचे रान
तुझ्या वाचुनी भासत होती सृष्टी ही निशप्राण
तुला पाहता चराचराला क्षणात आला प्राण
रुप आगळे तुझे साजणी लावण्याची खाण
लपून पाहे फ़ूलांअडूनी वेलीवरचे पान.
कशास करशी रुप सोहळे,लावूनी दिपमाळ?
उठून दिसते चांदण्यात ही तुझे चांदणी वाण
वाजत येई वाटेवरूनी ऋतू ऋतूंचे गाण
आपण दोघे सहप्रवासी दिगंतराचे छान
कशास करशी उगाच चिंता हरून सारे त्राण?
जगणे माझे तुझ्याचसाठी शतजन्माची आन.
काळजात या अजून आहे तुझ्या स्मृतींचे पान
गतकाळाचे क्षण गुलाबी मांडून बसले ठान
असेल कोण राजा त्याचा ताज असूदे महान
भातुकलीची दिवली सुध्दा अमर प्रीतीची शान
लक्ष फूलांनी जरी बहरले दिशा दिशांचे रान,
आधी वेचण्या सुधाकरी फूलराणीचा मान.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रुप आगळे तुझे साजणी लावण्याची
रुप आगळे तुझे साजणी लावण्याची खाण
लपून पाहे फ़ूलांअडूनी वेलीवरचे पान.>>>>>>मस्त,
आवडली.
भातुकलीची दिवली सुध्दा अमर
भातुकलीची दिवली सुध्दा अमर प्रीतीची शान .>>
छान
धन्यवाद
धन्यवाद