स्वातंत्र्य म्हणजे काय नक्की
असतय हेच कळायचय
दारिद्र्याच्या बेड्या तोडुन
झेंडा वंदन करायचय
ध्वजारोहणासाठी येती
हात पुढे का बरबटलेले?
नैतिकतेची दिवाळखोरी
राजकारणी खरकटलेले
पुन्हा एकदा मतदानातुन
चलेजाव म्हणायचय
दारिद्र्याच्या बेड्या तोडुन
झेंडा वंदन करायचय
देश जाहला मुक्त तरी पण
आम्ही खितपत पडलो सारे
रूढीवादी बुरसटलेले
सदैव वाहे दूषित वारे
परंपरांच्या जंजाळातुन
मला बाहेर पडायचय
दारिद्र्याच्या बेड्या तोडुन
झेंडा वंदन करायचय
काळी करणी इतकी! यांनी
अंधाराला काळे केले
हिम्मत यांची भरदिवसाही
नको नको ते चाळे केले
अंधाराशी लढण्यासाठी
किरण शलाका बनायचय
दारिद्र्याच्या बेड्या तोडुन
झेंडा वंदन करायचय
हिमालयाच्या ताठ कण्याने
रस्त्यावरती प्रजाच येइल
आक्रंदाच्या वणव्यामध्ये
भस्मासुरही जळून जाइल
फिनिक्सप्रमाणे राखेमधुनी
आकाशाला भिडायचय
दारिद्र्याच्या बेड्या तोडुन
झेंडा वंदन करायचय
निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yqhoo.com
अंधाराशी लढण्यासाठी किरण
अंधाराशी लढण्यासाठी
किरण शलाका बनायचय
दारिद्र्याच्या बेड्या तोडुन
झेंडा वंदन करायचय>>>>सुंदर!
मस्त कविता,मनातली.
तुमच्या भावना अगदी व्यवस्थित
तुमच्या भावना अगदी व्यवस्थित पोचल्या.
पण ..
>>
ध्वजारोहणासाठी येती
हात पुढे का बरबटलेले?
नैतिकतेची दिवाळखोरी
राजकारणी खरकटलेले
पुन्हा एकदा मतदानातुन
चलेजाव म्हणायचय <<
सगळ्या निवडणुकांचे निकाल पाहाता, दुर्दैवाने असे वाटणारे लोक, अजून तरी , अत्यल्पमतात आहेत हो!
लोकशाहीत जशी प्रजा तसा राजा.
व्वा... निशिकांतजी, ....
व्वा... निशिकांतजी, .... अफलातून कविता. अतिशय आवडली.
......खरकटलेल्या राजकारण्यांचे चांगलेच धिंडवडे काढलेत.