Submitted by राजीव मासरूळकर on 21 August, 2012 - 22:14
दुःख गंधाळून गेले !
ओठ सुकले, पापण्यांचे काठही वाळून गेले
पावसा रे, लांबुनी जाणे तुझे जाळून गेले !
वेदनांचे वेद गाणाऱ्या दरिद्री माणसांनो
त्याग केलेल्या जनांचे दुःख गंधाळून गेले !
तू असेतो कैक तारे चेहरे झाकून होते
तू निघाला , काजवेही फार चेकाळून गेले !
"कोवळ्या कोँबांतला टाहो कुणी ऐका जरा ना "
वांझ झालेले बियाणे आसवे ढाळून गेले !
संत योगी झुंजले ज्या भ्रष्ट मार्गाच्या विरोधी
शेवटी ते राजनीतीलाच ओवाळून गेले !
लाख वेळा बोललो श्वासांस थांबा एकदाचे
तू उभी दारात नी ते नेमके पाळून गेले !
- राजीव मासरूळकर
दि २२.८.१२
०.३० वाजता
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्योमगंगा वृत्तात थोडी सवलत
व्योमगंगा वृत्तात थोडी सवलत घेतली आहे .
व्योमगंगाच ना ?
लाख वेळा बोललो श्वासांस थांबा
लाख वेळा बोललो श्वासांस थांबा एकदाचे
तू उभी दारात नी ते नेमके पाळून गेले !
सुंदर ..... ( आम्हाला का असे खयाल सुचत नाहीत???
बहुतेक आमचे श्वास जाणार तेंव्हा दारात खयाल येणार ...
)
पाळुन गेले की पळुन
पाळुन गेले की पळुन गेले????
मी पळुन गेले असा अर्थ घेतला.
प्रत्येक खयाल ताकदीचा .
प्रत्येक खयाल ताकदीचा . जबरदस्त
तू असेतो कैक तारे चेहरे झाकून होते
तू निघाला , काजवेही फार चेकाळून गेले !>>>>>>>>कया बात है ।
"कोवळ्या कोँबांतला टाहो कुणी ऐका जरा ना "
वांझ झालेले बियाणे आसवे ढाळून गेले !>>>>>>>>>>> अप्रतिम
शेळी ( क्षमस्व , पण आपलं खरं
शेळी ( क्षमस्व , पण आपलं खरं नाव माहित नाही हो , सांगता का एकदा ?) आणि देसले सर ,
दोघांचेही हार्दिक आभार !
श्वासांना सांगितलेले शब्द ते (श्वास) पाळून गेले ( त्याप्रमाणे वागून गेले) असा खयाल होता , त्याची वाटच लागलेली दिसतेय बहुतेक . फेसबुकवरही काही जणांची हीच शंका होती . असो .
शेळींना नाव नाही आहे. त्यांनी
शेळींना नाव नाही आहे. त्यांनी मारलेल्या गप्पा या 'शेळोप्या'च्या गप्पा या सदरात मोडतात. पण त्यांचा एकंदरच (राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती यातील) अभ्यास आणि गझलेची तहान हे मात्र त्यांच्या सदस्यनामाला शोभत नाही.
(No subject)
पाळुन गेले की पळुन गेले????
पाळुन गेले की पळुन गेले????
हे मात्र त्यांच्या सदस्यनामाला शोभत नाही.
यावर आता काय लिहू ? गोची
यावर आता काय लिहू ?
गोची झालीय जाम !
अजुन एक गझलकार बाकी गझलेतल
अजुन एक गझलकार

बाकी गझलेतल काही कळत नाही पण काही काही शेर खुप आवडले
अजुन एक गझलकार<<< तोही
अजुन एक गझलकार<<< तोही सार्वजनिक
अजुन एक गझलकार<<< तोही
अजुन एक गझलकार<<< तोही सार्वजनिक

>>
छान
छान
मासरूळकर टेन्शन घेवू नका
मासरूळकर टेन्शन घेवू नका .........आनन्द लुटा .........मायबोली अशीच आहे







टेन्शन नाहीच काही ! सर्वाँना
टेन्शन नाहीच काही !
सर्वाँना धन्यवाद !
पण हे "सार्वजनिक" काय भानगड आहे कळालं नाही ?
गझल सार्वजनिक म्हणून पोस्ट करणं योग्य नाही का ?
(No subject)
(No subject)
बेफिकीर राहू का ?
बेफिकीर राहू का ?
एकदम बेफिकीर व्हा
एकदम बेफिकीर व्हा
वेदनांचे वेद गाणाऱ्या
वेदनांचे वेद गाणाऱ्या दरिद्री माणसांनो
त्याग केलेल्या जनांचे दुःख गंधाळून गेले !<< चांगला शेर आहे. गझलही छान आहे. राजनीतीलाच ओवाळून हा शेर अण्णांवर चपखल आहे. शुभेच्छा
<<तू असेतो कैक तारे चेहरे
<<तू असेतो कैक तारे चेहरे झाकून होते
तू निघाला , काजवेही फार चेकाळून गेले !
"कोवळ्या कोँबांतला टाहो कुणी ऐका जरा ना "
वांझ झालेले बियाणे आसवे ढाळून गेले !<< सुंदर!
<<लाख वेळा बोललो श्वासांस थांबा एकदाचे
तू उभी दारात नी ते नेमके पाळून गेले !<< क्लास शेर!
वैभव जी , बेफिकीर जी , आर्या
वैभव जी , बेफिकीर जी , आर्या म्याडम ,
हार्दिक धन्यवाद !
:-);-);-(:-/:-|:-(:-x
:-);-);-(:-/:-|:-(:-D:-x