कोळबी -१/२ किलो
कांदे- ३
खोबरे -ओले असेल तर १-१/२ वाटी.(मी इथं खोबरयाची बारीक पूड वापरली आहे)
लसून -५/६
आलं- १/२ इंच
टोमटो - ३ लालबुंद
ति़खट - २/३ चमचे
कश्मिरी मिर्च पावडर - १ १/२ चमचा
तेल - १ डाव मोठा
कोथिबींर - चवीप्रमाणे
दहि - २ चमचे
हळद - १/२ चमचा
धने-जिरे पूड - १ चमचा
काळे मिरी - ४
लवंगा -४
दालचिनी - १ इंच
मीठ - आवडीनुसार
बॅचलर कोळंबी, खरंतर नाव वाचून गम्मत वाटली ना !!!
पण याची रेसिपी माझा नवरा बॅचलर असताना करायचा, कारण काय तर म्ह्णे आम्हाला तुमच्या बायकासारखा मसाला करता येत नाही म्हणून आम्ही सगळ एकत्र करतो....टेन्शन नाही !!!!! म्हणून याचं नाव बॅचलर कोळंबी
पण आता आजिबात करत नाही का तर म्ह्णे आता बॅचलर नाही ना
पण खर खर सांगू का खरच खुप सोपी आहे ही.
बरं ते जाऊदे आपण रेसिपी बघु.
१) कोळंबी निवडून स्वच्छ करून; त्याला दही, हळद, मीठ, धने-जिरे पूड पेस्ट लावून बाजुला ठेवा.
२) आता मसाला करु, एका पॅन मध्ये फक्त १ चमचा तेल घाला, तेल गरम झालं की, त्यात काळे मिरी, लवंगा, दालचिनी, भाजून घ्या, मग त्यात कांदाचे मोठे काप करुन ते सुद्धा परतून घ्या. मग त्यातच लसून,आलं भाजून घ्या. आता टोमॅटो अणि खोबरं घाला आणि १/२ चमचा मीठ घालून छानपैकी शिजून घ्या अणि मग कोथिंबीर घाला. हा बघा असा.....
३) आता हे सगळा मसाला मिक्सर मधून चागंला बारीक करुन घ्या.
४) एका मोठया भांड्यात तेल गरम करून त्यात तिखट आणि कश्मिरी मिर्च पावडर टाकून मग त्याला चांगल तेल सुटल्यावर त्यात हा मसाला चांगला परतून घ्या आणि आवडीनुसार मीठ टाका.
५) मग त्यात कोळंबी घालून त्या मस्तपैकी परतून घ्या आणि ३ वाट्या पाणि घालून शिजून घ्या..
ही बघा आपली तयार बॅचलर कोळंबी
१) भात किंवा पोळी/भाकरी बरोबर छान लागतो.
२) जर आवडत असेल तर चिंच घातली तरी खुप छान लागतो. (आमचे हे सातारा कडचे असल्याने ति़खट लागते, चिंच आजिबात चालत नाही.
तरी म्हटलं बॅचलर कोळंबी
तरी म्हटलं बॅचलर कोळंबी ओळखायची कशी ? बॅचलर मुलगी / मुलगा ओळखण्यासारखं नाही हो ते .
मस्त रेसीपी.
मस्त्, सोल्लीड रंग आलाय....पण
मस्त्, सोल्लीड रंग आलाय....पण केवढं ते तेल्.....दह्यामुळं सुटलेलं दिसतय!!
काय तोंपासू आहे.....श्रावणात
काय तोंपासू आहे.....श्रावणात असा अत्याचार नका हो करू
धन्स श्री , aashu29,
धन्स श्री , aashu29, टोकुरिका
पण केवढं ते तेल्.....दह्यामुळं सुटलेलं दिसतय!! >>>>>>>>> आग मी जरा अस काही करायच असल की जरा हात मोकळा सोडावा लागतो
श्रावणात असा अत्याचार नका हो करू >>>>>>> आग इथ मी फक्त सोमवार पाळते.... आमच्याकडे आठवड्यातून २/३ वेळा non-veg असतच.... काय करणार- नवरा अणि मुलगा फक्त non-veg आवडत.
ंमस्तच........
ंमस्तच........
बॅचलर डिश आवडली... रंग बघुन
बॅचलर :p डिश आवडली... रंग बघुन तों.पा.सु.
श्रावण संपल्याचे सार्थक झाले.
कसलं झक्कास दिसतयं. स्लर्प
कसलं झक्कास दिसतयं. स्लर्प
छान
छान
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स आह व्
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
आह
व्वाह
वाव, एक क्षण विसरलोच होतो की
वाव, एक क्षण विसरलोच होतो की श्रावण चालू आहे
वा वा वा एकदम कातील दिसतेय
वा वा वा
एकदम कातील दिसतेय कोलंबी
आमच्यासारख्या दुर्लक्षित बॅचलारांसाठी एकदम उपयुक्त
माझ्या खिचडी बरोबर सुद्धा हे "कोम्बिनेषण" भन्नाट लागेल
धन्स सगळ्याना
धन्स सगळ्याना shrushti14@gmail.com , इंद्रधनुष्य, सस्मित, anusaya, बेफ़िकीर,प्रसिक, प्रसन्न अ !!!!
श्रावण संपल्याचे सार्थक झाले.>>>>>>>> मला पण
माझ्या खिचडी बरोबर सुद्धा हे "कोम्बिनेषण" भन्नाट लागेल >>>>. खरच छान लागेल, मी पण ट्राय करेन...
अरे, बघितलिच नव्हती ही
अरे, बघितलिच नव्हती ही पाकृ..
छान वाटत्येय.. नवरोबांना करुन देइन माझ्यासाठी भाज्या घालेन
चला या वेळी डीश फोटोसह आली,
चला या वेळी डीश फोटोसह आली, नाहीतर मागच्या वेळी फोटो काढेकाढे पर्यंत संपून गेली होती..
झक्कास दिसतेय कोळंबी.. उद्या शुक्रवार...हं .. ठरलं पक्क!
कातिल!
कातिल!
छान वाटत्येय.. नवरोबांना करुन
छान वाटत्येय.. नवरोबांना करुन देइन माझ्यासाठी भाज्या घालेन >>>>> नक्की ट्राय कर खुप सोपी आहे, आणि तू non-veg आजिबात खात नाहीस ?????
चला या वेळी डीश फोटोसह आली,
चला या वेळी डीश फोटोसह आली, नाहीतर मागच्या वेळी फोटो काढेकाढे पर्यंत संपून गेली होती.. >>>>>>>>>>>>> या वेळी मी सगळ्यानां सागिंतल होत....फोटो काढल्याशिवाय जेवण नाही
धन्स बित्तुबंगा !!!
शेवगा. रेसिपी सुपर्हिट्टं
शेवगा. रेसिपी सुपर्हिट्टं झालीये माझ्याकडे..
आज नुस्ताच मसाला करून फ्रीझ केलाय
मसाला भारी वेळ घेतोय पण तो तयार असलाकि कमीतकमी दोन वेळा तरी करी करता येते झटपट!!!
मटन याच मसाल्यात करून झाले.. टू गुड
अरे वा ! हे चाखलच, अर्र्र
अरे वा ! हे चाखलच, अर्र्र वाचलच नव्हतं मी. भारी आहे. एकदम मस्त. करावंच आता धन्यवाद !
आहा काय मस्त वाटेल गरम गरम भात अन ही बॅचलर कोळंबी ! सगळे फोटो एकदम कातिल
तुमचे नाव अन कोळंबी म्हटल्यावर "डांबवणी" ची आठवण झाली.
एक्दम मस्त रेसिपी.... नक्की
एक्दम मस्त रेसिपी.... नक्की करीन....
धन्स वर्षू नीलू.. मस्त
धन्स वर्षू नीलू.. मस्त टेंमटिंग दिसतेय तूझी डिश.... मी सुद्धा कधी कधी जास्त करुन ठेवते.फार उपयोगी पडतो...
धन्स अवल आणि प्रिति १
.
तुमचे नाव अन कोळंबी म्हटल्यावर "डांबवणी" ची आठवण झाली.>>>>"डांबवणी" म्ह्णजे काय असत? मला माहीत नाही
शेवगा, डांबवणी :
शेवगा, डांबवणी : http://www.maayboli.com/node/37625 हे घ्या
शेवगा... एखाद्या आळसावलेल्या
शेवगा... एखाद्या आळसावलेल्या रविवारी मस्त पाऊस पडत असताना अशी झणझणीत गरमागरम तोंपासू डिश हाणून मग ताणून देण्यात स्वर्गसुख आहे... (अर्थात हे माझं नव्हे आमच्या ह्यांचं मत! नॉनव्हेजच खाणार्यांच्या बायकांचा रविवार उलट जास्त बिझी जातो... या रविवारच्या चोचल्यांची सोय केल्याबद्दल धन्स! )
फक्त विचारायचं होतं ५-६ लसूण म्हणजे लसूण पाकळ्याच ना?
माहीतीच्या स्त्रोतमध्ये आमचे 'हे' वाचून गंमत वाटली आणि तुमच्या ह्यांचं कौतुकही!
नावपण इंटरेस्टिंग आहे पाकृ चं
"डांबवणी" म्हणजे बहुदा शेवगा + कोळंबी असा प्रकार असावा असं वाटतंय....!
बॅचलर कोळंबी... भारीये. हे
बॅचलर कोळंबी... भारीये.
हे असे धागे उघडायचे म्हणजे जल्ला स्वतःलाच त्रास करुन घेण्यासारखे आहे..
५-६ लसूण म्हणजे लसूण पाकळ्याच
५-६ लसूण म्हणजे लसूण पाकळ्याच ना >>>>> हो ग !!! मी अजुन नवीनच आहे ना इथे
नॉनव्हेजच खाणार्यांच्या बायकांचा रविवार उलट जास्त बिझी जातो >>>> अगदी खर आहे
धन्स dreamgirl आणि सेनापती
दही आणि कोळंबी थोड ऑफ कॉम्बो
दही आणि कोळंबी थोड ऑफ कॉम्बो वाटतं नाही का?
कारण दुग्धजन्य पदार्थ मास्यांसोबत चालत नाही............
आग तृष्णा ही माझ्या नवरयाची
आग तृष्णा ही माझ्या नवरयाची रेसिपी आहे (त्याला काय कळतंय कशा बरोबर काय घालायच नाही ते )
पण जर तुला वाटत असेल तर दही नाही घातल तरी चालेल ग, दही न घालता सुद्धा छान होईल ही कोळंबी