Submitted by शेळी on 16 August, 2012 - 07:50
इंग्रजी व्याकरणातील शंका
इंग्रजी व्याकरणातील शंका कुशंका आणि त्यांचे समाधान यांचे साठी हा धागा आहे.
शंका : १. प्रत्येक वाक्याला सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतेच का?
उदा. There is silence. ...... subject ? Predicate?
There is a garden ........ subject ? Predicate?
२. इयत्ता आठवी- पूर्ण इंग्लिश मेडियमच्या पोराना इंग्रजी व्याकरणात फिगर ऑफ स्पीच नावाचा प्रकार आहे. गुगलून बघितले तर भरपूर प्रकार मिलाले.
आठवीच्या पोरांच्या दृष्टीने आवश्यक फिगर ऑफ स्पीच ची यादी मिळू शकेल काय?
आठवीला आहे, म्हणजे हा प्रकार दहावीपर्यंत प्रत्येक वर्षी असणार काय? तेंव्हा कोणते प्रकार असतात?
आथवी ते दहावी मध्ये या विष्यावर नेमके किती प्रश्न असतात? प्रश्नांचे स्वरुप काय असते?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शाळेत असताना शिकलेले फिगर ऑफ
शाळेत असताना शिकलेले फिगर ऑफ स्पीचः
१. Alliteration
2. Simile
3. Personification
4. Hyperbole
ज्यु.कॉलेजात शिकलेले:
1. Oxymoron
2. Superlative
3. Anticlimax
4.Climax
5. Onomatopoeia
6.Parenthesis
7. Irony
हे पूर्णपणे माझ्या अधु स्मृतीवर आधारित आहे. आताचा कोर्स माहीत नाही. तुम्ही पुन्हा पुन्हा विचारताय, म्हणून लिहिले.
धन्यवाद... मीही इतकीच यादी
धन्यवाद... मीही इतकीच यादी केली होती. पण माझ्याकडच्या पुस्तकात २५ प्रकार आहेत. ते सगळे तर ८ वीला नक्की नसनार.
अजून एक, metaphor राहिलं.
अजून एक, metaphor राहिलं.
खालीलपैकी कोणती वाक्यरचना
खालीलपैकी कोणती वाक्यरचना बरोबर आहे. ( की दोन्ही बरोबर आहेत?)
Today is Monday ........................ or .................... It is Monday today.
My favorite dish is idli ..................... or .................... Idli is my favorite dish.
मला वाटतेय दोन्ही बरोबर आहेत.
मला वाटतेय दोन्ही बरोबर आहेत.
My favorite dish is idli
My favorite dish is idli ..................... or .................... Idli is my favorite dish.
>>
माझी फेवरिट डिश (फक्त) इडली आहे हा पहिल्या वाक्याचा अर्थ तर 'इडली ही (ही एक) माझी आवडती डिश आहे असा दुसर्या वाक्याचा अर्थ होईल.
It is raining so I am
It is raining so I am happy.
It is raining. So I am happy.
It is raining. So, I am happy.
कोंचं बरोबर हाये????
It is raining. So I am
It is raining. So I am happy.
एम एस वर्डात असे टायपले की एरर दाखवते. सो च्या पुढे स्वल्पविराम दिला आणि It is raining. So, I am happy. असे लिवले की बरोबर दाखवते ..... बिल गेटाचं इंग्रजी आनी येलिझाबेथचे विंग्रजी वेगळं असतं का? मग आपलं भारतीय विंग्रजी नेमकं कूणाशी जुळतं? भारतीय विंग्रजीत आम्ही कधी सो च्या पुढे कॉमा लिवत नव्हतो, असे मला अंधूक आठवते.
न्यू यॉर्क टाइम्स मधला एक लेख
न्यू यॉर्क टाइम्स मधला एक लेख वाचत होते आज, तर त्यात हे वाक्य सापडलं
But Mr. Romney has twisted it to suggest that Mr. Obama believes all businesses are creatures of the government, and so the convention had to parrot the line.
तुमचे हे सो थोडे वेगळे आहे.
तुमचे हे सो थोडे वेगळे आहे. अजून सो चे लई प्रकार आहेत .. जसे .... ऑल मराठी गर्ल्स आर ब्युटीफुल अँड सो ईज माधुरी ... हे सो वेगळे ..... मी विचारले आहे, त्यात सो चा अर्थ म्हणून असा आहे.
अॅज यू सो, सो यू रीप .......... या सो चं यवढं पीक आलय की कळंना काय बरोबर आणि काय चूक !
चला, गुड नाइट.. सो जा राजकुमारी सो जा !
शब्बाखैर.
आता इंग्रजी शिकायला मास्तर कोन आनायचा?
-- ती शेळीराणी
बाजो, फेवरेट ही एकच गोष्ट असू
बाजो, फेवरेट ही एकच गोष्ट असू शकते. त्यामुळे दोन्हीचे अर्थ सेमच.