हुकुमाची राणी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 16 August, 2012 - 07:37

स्वप्नाची परी आपली
हुकुमाची राणी होते
जीभेची छडी तिच्या
तोंडाची तोफ होते
दळायचा डबा हातात
भाजीची पिशवी येते
शहाणे गुलामी स्वीकारतात
त्यालाच प्रेम नाव देतात
शिळ्या भाताबरोबरच
आपला मान गिळून टाकतात
ज्यांना हे कळत नाही
तेच भांडत बसतात
त्यांचा संसार नासून जातो
एक करार फक्त उरतो
सुख सुख म्हणजे
अखेर काय असते
घरचे जेवण दोन वेळ
पोटभरून खाणे असते
कटकटी शिवाय संध्याकाळी
मस्त चहा पिणे असते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दळायचा डबा हातात
भाजीची पिशवी येते
शहाणे गुलामी स्वीकारतात
त्यालाच प्रेम नाव देतात>>>>तुम्ही मला बघितलत काय हो प्रभाकर दळण घेऊन येताना,सुंदर निरिक्षण,
छान कविता.

विभाग्रज
मनःपूर्वक आभार.
आणि हो दळण घेऊन येताना पाहिलय बर खूप वेळा.पण ते तुम्ही होता हे आज कळ्ले.