Submitted by सुधाकर.. on 11 August, 2012 - 11:36
सळसळूनी शब्दगाणी बोलताती झाड वेली.
अमृताहून जीवनाच्या गोड माझी मायबोली
नादब्रम्ह साचलेली जेथ आहे गहन खोली
अर्थगर्भ जीवनाचा सांगते ही मायबोली.
माय माझी बोलली जी, तिच मी ही शिकलेली
बोबडा मी बोलताना मित झाली मायबोली.
बाळबोध जिवणीशी एकदा मी बांधलेली.
तिच आज बोलतो मी काळजाची मायबोली.
परभाषी पावसाची झड आली झड गेली
तोलली मी वादळात एक माझी मायबोली.
चोखळोनी पैस सारा ज्ञानदेवे रचियेली
माऊलीची साऊली ही शब्दरुप मायबोली.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा रे वा ऑर्फी मस्त रे खूप
वा रे वा ऑर्फी मस्त रे
खूप छान
धन्यवाद
सुंदर. सळसळूनी शब्दगाणी
सुंदर.
सळसळूनी शब्दगाणी बोलताती झाड वेली.
अमृताहून जीवनाच्या गोड माझी मायबोली
नादब्रम्हे स्पंदणारी जेथ आहे गहन खोली
जीवनाचा अर्थगाभा सांगते ही मायबोली.
माय माझी बोलली जी तीच मी उच्चारलेली
बोबडे ते बोल ऐके कौतुकाने मायबोली.
बाळवयी त्या जिवणीपाशी नकळता मी गोंदलेली
तीच आजही बोलतो मी काळजाची मायबोली.
परप्रांतिक पावसांची झड आली झड गेली
तोलली मी वादळातून एक माझी मायबोली.
चोखळोनी पैस सारा ज्ञानदेवांनी रचियली
माऊलीची शब्दरुपा साऊली ही मायबोली.
हे अर्थातच अंतिम नाही अगदी कमीत कमी प्रसाधन,पण या सुंदर कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी मात्रांकडे याप्रकारचं लक्ष तुम्ही याहून चांगल्या रीतीने देऊ शकाल.
भारतीजी माझ्या कवितेच पुन्हा
भारतीजी माझ्या कवितेच पुन्हा सौंदर्य प्रसाधन केल्याबध्दल खुप खुप धन्यवाद.
हि कविता मला जशी स्फुरली तशीच मी उतरली आहे. ती ही फक्त एका तासाच्या अवधीत. कविता अशी कधी कधी
स्वत:हून माझ्या घरी आली तर मी गझलेच्या वा मात्रावृताच्या नियमात घालून तिची मोडतोड कधीच करत नाही.
फक्त लयबध्द स्वरांकडेच लक्ष देतो. बाकी सारी तिची तिच नटते, शृंगारते. असो-
तरीही तुम्ही केलेले बदल ही मला खासच आवडले. पहील्या ओळीत केलेला बदल अगदी मझ्याही मनात होता.
तो आता मी पुन्हा करत आहे.
सौंदर्य प्रसाधन >>>>>> शब्द
सौंदर्य प्रसाधन >>>>>>
शब्द चुकलाय का रे ऑर्फी ???
बरोबर आहे.
बरोबर आहे.