Submitted by सुधाकर.. on 10 August, 2012 - 08:01
शब्द शब्द टिपत गेलो
फ़ूले घेतली हुंगून.
अनावृत्त चालता चालता
आभाळ आलं वाकून.
कसं कधी अवचित
मुकं झालं झाड.
खोल खोल जाताना
मुळा लागली वाढ.
वळणवेड्या झर्यातून
गीत आले वाहून.
मातीसवे नातं गोवून
उन्हे घेतली न्हाऊन.
आयुष्याच्या वादळात
फ़ाटली सारी शिडं.
सैरभैर फ़िरतं आता
मन-पाखरू हे वेडं
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आयुष्याच्या वादळात फ़ाटली सारी
आयुष्याच्या वादळात
फ़ाटली सारी शिडं.
सैरभैर फ़िरतं आता
मन-पाखरू हे वेडं>>>>>>>>>>>>>>छान!
वा वा मस्त रे
वा वा मस्त रे ऑर्फी.....
आवडली ही कविता
शोभा,वैभू-- धन्यवाद.
शोभा,वैभू-- धन्यवाद.