Submitted by शेळी on 6 August, 2012 - 12:26
काळ नाही, वेळ नाही, वाट नुसती पाहतो
जिंदगी सरली तरी कबरीत अश्रू ढाळतो
वाट पाहूनी तुझी सुकली फुले ही येथली
पानगळतीचा ऋतू निर्लज्ज होउन लांबतो
पिंपळाची पानगळती बघुन मी आक्रंदतो
माणसाच्या जीवनी ना बहर फिरुनी जागतो
रोज नूतन नित्य मुखडा जीवनाने बसवला
आरशातिल मी मला दुसराच कोणी भासतो
कालचे आयुष्य सरले आजचेही चालले
काळ होतो व्याध मी शेळीप्रमाणे चालतो
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोलीच्या गझलांचा काळ!
मायबोलीच्या गझलांचा काळ!
Submitted by अजिंक्यराव पाटील on 22 March, 2020 - 12:39

दुसऱ्याची नको ओ तुम्ही लिहलेली गझल दाखवा!
Pages