Submitted by aart on 6 August, 2012 - 07:59
पाउस पंचक
पहिला पाउस,
पाउसपैंजण सजवजुनी थुईथुई
धबधबते हे हीरवे रान,
कुशीत घेता झुळुक नवथर
खुशीत गाते इवले पान.....
दुसरा पाउस,
कातरवेळी कातरकाया
अन आवेगाचे आर्त कडे,
चंद्रउरीच्या कळ्या उमलल्या
पण माळ अनाहत आत कुढे....
तिसरा पाउस,
सुबक ठेंगणी नाजुक चंचल
लव्हाळ रुवजी रानोमाळ,
झरझरते झुळझुळते अल्लड
त्यात निळेसावळे आभाळ.....
चौथा पाउस,
थबथबणार्या थेंबांची झालर
नखरेल नाचवे पिंपळपान,
निरखुन बघता सूर्याने मग
इंद्रधनुषी होते रान...
पाचवा पाउस,
काळाकभिन्न कातळकडा
अन धबधब्यांची कोसळती रांग,
धुक्यात हरवली वाट सख्या रे
तुजप्रत येउ कशी मी सांग....
..
..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
आधीच पाउस नाही, त्यातच त्याला
आधीच पाउस नाही, त्यातच त्याला पंचक लावा.