Submitted by Kiran.. on 1 August, 2012 - 10:52
खरोखरच मोठ्या मनाने संबंधितांनी क्षमा करून हलकेच घ्यावी ही विनंती. शिकण्याचा प्रयत्न असल्याने दिसेल ती गझल विडंबण्यात येत आहे.
वारलो मी त्या खुशीत आज आहे ही नसल
जाळले मजला तुम्ही तरी लिहीतो मी गझल
जे चुकीचे वाटते ते ना तपासावे कधी
हे चुकीचे वाटते, तू आपली खिडकी बदल
नोकरी गेली जरी कामास नाही जायचो
कारणे जी आजही आहेत ती सगळी सबल
आठ झाला आकडा की परवाना मीळतो
आरटीओ आपल्या वाट्यामधे होतो सफल
आज कुकुचकूच करती कोंबड्यांच्या पलटणी
श्रावणाचा मास संपावा म्हणे हे दैत्यदल
_ Kiran..
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरेरे कुणी तरी नोकरी गेली
अरेरे
कुणी तरी नोकरी गेली म्हणून गझल रचली होती.
ग्रेसजींच्या अपमानास हे आमचे उत्तर !!