जेव्हा हाताशी आलेलं उभ पीक
बेचिराख होऊन जाईल,
माझ्या अनवाणी पावलांना
सुर्य डागण्या देत राहील,
तेव्हा तुझा हात माझ्या हातात असू दे..
नव्या स्वप्नांची पेरणी करण्यासाठी
जेव्हा वादळाच्या पाठीवर स्वार होऊन
शेवटचं कौल उडून जाईल,
मुसळधार सरी घराच्या सांदीकोपर्यात
मनमुराद नांदून जातील,
तेव्हा तुझा हात माझ्या हातात असू दे..
नव्या स्वप्नाची शाकारणी करण्यासाठी
जेव्हा असंख्य सुया गोठलेल्या देहाला
टोचा मारून थकतील,
जाणिवांच्या सर्व भावना
थिजून काळ्यानिळ्या होतील,
तेव्हा तुझा हात माझ्या हातात असू दे..
नव्या स्वप्नाला कवटाळून घेण्यासाठी
जेव्हा डोळ्यातील एकेका स्वप्नाचा मोती
हातांच्या शिंपलीत हलके स्थिरावेल,
निर्धास्त झोपेला अर्ध्यामुर्ध्या स्वप्नांनी
दचकून जाग येणार नाही,
तेव्हा तुझा हात माझ्या हातात असू दे..
जुनीच स्वप्ने नव्याने उधळण्यासाठी
तुझा हात माझ्या हातात असू दे !
तुझा हात माझ्या हातात असू दे !
खूपच छान! कोणीतरी आपल्यासोबत
खूपच छान!
कोणीतरी आपल्यासोबत आहे हेच खूप महत्वाचे असते.
<<<कोणीतरी आपल्यासोबत आहे हेच
<<<कोणीतरी आपल्यासोबत आहे हेच खूप महत्वाचे असते.>>>>
ह्म्न!
कोणीतरी नाही, फक्त 'आपलेच' माणूस !
आर्तता पुरेपूर उतरलीय कवितेत...
आवडली खुप.
प्रत्येक ओळींतील कल्पना
प्रत्येक ओळींतील कल्पना भन्नाट... उदा. सुर्याने तळपायांना डागण्या देणे, वादळाच्या पाठीवर कौलाने स्वार होणे.
एकंदर कविता सह्हीच !
आवडली...
आवडली...
अगदी पटली! अनुभव तर येतोच असा
अगदी पटली! अनुभव तर येतोच असा अनेकदा पावलो-पावली की आपल्या माणसाचं केवळ आपल्यासाठी असणं किती किती महत्त्वाचं असतं...
अगदी
"जाणिवांच्या सर्व भावना
थिजून काळ्यानिळ्या होतील,"
तेव्हाही!
खूप सुंदर! कल्पना भारीच.
खूप सुंदर! कल्पना भारीच.

प्रत्येक ओळींतील कल्पना भन्नाट... उदा. सुर्याने तळपायांना डागण्या देणे, वादळाच्या पाठीवर कौलाने स्वार होणे.>>>>>>>>>+१
वाह ! आवडली. ( कुणाचा हात ते
वाह ! आवडली.
( कुणाचा हात ते नाही कळलं
)
__/\__ प्रत्येक कल्पना
__/\__
प्रत्येक कल्पना अप्रतिम
ओळ न ओळ आवडली
प्रचड सुंदर
आधी मला वाटलं पत्ते खेळतोयस
आधी मला वाटलं पत्ते खेळतोयस की काय.
<<कोणीतरी नाही, फक्त 'आपलेच'
<<कोणीतरी नाही, फक्त 'आपलेच' माणूस !>>
कोणीतरी ...स्वतः व्यतिरीक्त दुसरे!! अशा अर्थाने..
भावना महत्वाची!!
भारी रे.....!
भारी रे.....!
प्रत्येक ओळ आवडली. छानच.
प्रत्येक ओळ आवडली. छानच.
I really like this poem.
I really like this poem.
जेव्हा वादळाच्या पाठीवर स्वार होऊन
शेवटचं कौल उडून जाईल,
मुसळधार सरी घराच्या सांदीकोपर्यात
मनमुराद नांदून जातील,
The imagery is really wonderful.
जेव्हा असंख्य सुया गोठलेल्या देहाला
टोचा मारून थकतील,
जाणिवांच्या सर्व भावना
थिजून काळ्यानिळ्या होतील,
तेव्हा तुझा हात माझ्या हातात असू दे..
नव्या स्वप्नाला कवटाळून घेण्यासाठी
I especially liked the expressions..
हात् तिच्या....... कुठेही
हात् तिच्या.......
कुठेही पळून जाणार नाही रे ती
सुंदर......आवडली........
सुंदर......आवडली........
भावली आपल माणुस सोबत असण
भावली

आपल माणुस सोबत असण हेच तर कुठल्यापण गोष्टीपेक्षा जास्त महत्वाच असत
व्वा शिरोडकर.. आवडेश बाबू...
व्वा शिरोडकर.. आवडेश
बाबू...
जेव्हा डोळ्यातील एकेका
जेव्हा डोळ्यातील एकेका स्वप्नाचा मोती
हातांच्या शिंपलीत हलके स्थिरावेल,
निर्धास्त झोपेला अर्ध्यामुर्ध्या स्वप्नांनी
दचकून जाग येणार नाही,
तेव्हा तुझा हात माझ्या हातात असू दे..
जुनीच स्वप्ने नव्याने उधळण्यासाठी...
हे आवडले.
एकदम छान कविता!
एकदम छान कविता!
अगदी मनाल भिडणारी! उत्तम.
अगदी मनाल भिडणारी! उत्तम.
वाह सुंदर कविता ! कौतुक,
वाह सुंदर कविता !
कौतुक, अगदी खरंय. आपल्या माणसाची सोबत असेल तर दु:खांचे, अडचणींचे कितीही डोंगर
मार्गात आडवे आले तरीही नो टेन्शन !
मस्तच.... लिखते रहो$$$
मस्तच.... लिखते रहो$$$
मस्तच...
मस्तच...
(No subject)
'कौतुक' फारच मस्त!!
'कौतुक' फारच मस्त!! कौतुकास्पद!!
मस्तय आवडली
मस्तय
आवडली
सुंदर! आपल्याची साथ किती ताकद
सुंदर!
आपल्याची साथ किती ताकद देते, अचूकपणे सांगणारी कविता.
अप्रतिम.