आयुष्यात आलेल्या प्रेरणादायी व्यक्ती, घटना..............

Submitted by यशस्विनी on 31 July, 2012 - 03:29

मानवी आयुष्य हे अनेक लहान-मोठया, चांगल्या-वाईट घटनांनी भरले आहे...... परंतु काही घटना, व्यक्ती या आयुष्याला एक चांगले वळण लावतात, आपला आत्मविश्वास वाढवतात, प्रेरणादायी ठरतात....... त्यांच्या आयुष्यात येण्यामुळे आपल्यात खुप चांगले बदल घडतात...... आपला उत्कर्ष होत असेल तर मत्सर वाटून नाउमेद करणारे,कटु बोलणारे खुपजण भेटतात. पण अश्या काही व्यक्ती असतात ज्यांच्या उत्तम वागणुकीचा,त्यांच्या कार्यतत्परतेचा आपल्या आयुष्यावर कळत-नकळत चांगला परिणाम होतो, ज्यामुळे आपण त्यांचे आयुष्यभराचे ऋणी राहतो. तर अश्या काही व्यक्ती,घटना किंवा कदाचित एखादे पुस्तक, विचार तुमच्या आयुष्यात आल्या/ घडल्या/ वाचनात असतील तर इथे आपले अनुभव कथन करा. ज्यामुळे इतर लोकांनादेखील जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टीकोण मिळेल.

उदा. सध्या आमीर खान या अभिनेत्याचा "सत्यमेव जयते" या कार्यक्रमाचा शेवटचा भाग असाच प्रेरणादायी होता.... त्यातील विविध व्यक्तींनी केलेले कार्य पाहुन आपण किती संकुचीत विचार करतो व जगात कितीतरी व्यक्ती जिद्दीने,स्वयंप्रेरणेने व सातत्य ठेउन स्वत:च्या आयुष्यात किती मोठा पल्ला गाठतात ज्याचा आपण विचार देखील करु शकत नाही.

तुमच्या आयुष्यातील एखादी लहानशी देखील गोष्ट असेल पण ज्यामुळे तुम्हाला सकारात्मक उर्जा मिळाली तर कृपया आपला अनुभव इथे शेअर करा.

धन्यवाद........

Group content visibility: 
Public - accessible to all site users