रिमझिम रिमझिम पाउसधारा मनात माझ्या रुजती
खळखळते ओहोळ पाहुनी तरंग नकळत उठती
तुझी नि माझी बालपणीची कागदहोडी ओली
तसाच पाउस, तसेच पाणी, पण मी तीरावरती
कळले नाही मलाच माझे कधी जाणता झालो
वर्तमान जगण्याचे सोडुन 'उद्या' पाहता झालो
प्रश्न तुझ्या डोळ्यांना पडता नव्हते उत्तर काही
व्यवहाराच्या दुनियेमध्ये प्रेम शोधता झालो
क्षणाक्षणाला सुखास वेचून बरेच संचित केले
वणवण माझी वाऱ्यावरची उडून सारे गेले
आज पुन्हा ना हाती काही, पुन्हा पावले थकली
प्रश्नाचे उत्तर पाण्याने सोबत वाहून नेले
मनात होते काय तुला मी आज खरे सांगतो..
फूल हासरे, झुळझुळ पाणी, तिथे तुला पाहतो
जीवनभर तू हसत रहावे म्हणून वणवणलो मी
सुगंध, सौंदर्यापाशी मी रमणेही टाळतो
जे जे माझे होते ते ते हरून गेलो सारे
आता घेतो उधार काही चंद्राकडून तारे
सांग तुझ्या प्रेमाची किंमत कुणी मोजली इतकी ?
गुलाब दरवळणारे आणिक तारे लुकलुकणारे....
....रसप....
३१ जुलै २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/07/blog-post_31.html
वा रणजित, काय सुंदर सुंदर
वा रणजित, काय सुंदर सुंदर कविता लिहितोस तू ..... आणि इतक्या छान लयीत / तालात.......
बहोत खूब......
खूप छान रे जियो मेरे दोस्त !!
खूप छान रे
जियो मेरे दोस्त !!
छान आहे रे.....मस्तच....
छान आहे रे.....मस्तच.... आवडली.......
रिमझिम रिमझिम पाउसधारा मनात
रिमझिम रिमझिम पाउसधारा मनात माझ्या रुजती
यावरुन
या रिमझिम-झिलमिल पाऊस धारा
तन मन फुलवून जाई
सहवास तुझा मधुमास फुलाचा
रंग सुखाचा हावी
हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा
उजळून रंग आले स्वछंद प्रितीचे !
चिंब भिजलेले, रुप सजलेले बरसुनी आले रंग प्रितीचे...
चिंब भिजलेले, रुप सजलेले बरसुनी आले रंग प्रितीचे..
हे गाणं आठवल.
लै (लय) खास !!!!
लै (लय) खास !!!!
सहज वृत्त हाताळणी आणि योग्य
सहज वृत्त हाताळणी आणि योग्य शब्दांतून अभिव्यक्ती ..... कविता आवडली.
"जे जे माझे होते ते ते हरून गेलो सारे
आता घेतो उधार काही चंद्राकडून तारे" >>>> यातला गझल टाइप खयाल अधिक आवडला.
अतिशय सुंदर आहे
अतिशय सुंदर आहे
सुंदर,सबल शब्दरचना.अभिनंदन
सुंदर,सबल शब्दरचना.अभिनंदन रसप.