हाताची घडी म्हणे, तोंडावर बोट !

Submitted by सुचेता जोशी on 30 July, 2012 - 14:02

हाताची घडी म्हणे,
तोंडावर बोट !
डोळ्यांनी बोलण्याची
घेतोच की सूट !

डब्यात हवीय म्हणे
भाजी न पोळी !
खिशात आजी ठेवे
लिमलेटची गोळी !

रोज-रोज, तोच-तोच
शाळेचा ड्रेस..
रिबीनीत आवळले
कुरळे-कुरळे केस !

पायातल्या बुटांचे
चमचमते पॉलिश,
नव्या-नव्या शब्दांच
नाही कळत इंग्लिश !

'छ्डी लागे छम-छम,
विदया येइ घम-घम'
पाढे पाठ होता-होता
नाकी येइ दम-दम !

सांग सांग देवा
मी कधी होइन मोठी?
शाळेमधुन असल्या माझी
कधी होइल सुट्टी?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.