९ दिवस १७२ खेळाडू ५ सुवर्ण पदके.
शनिवार २८ जुलै ते रविवार ५ ऑगस्ट
ठिकाण : विंबल्डन (ग्रास कोर्ट)
-टेनिस कोर्ट २४ मिटरपेक्षा थोडेसे लहान असते आणि कोर्टच्या मध्यभागी नेट असते. नेट १ मिटरपेक्षा थोडे कमी उंचीचे असते.
-दुहेरी सांमन्यांसाठी कोर्टची पूर्ण रूंदी वापरली जाते. एकेरी सामन्यांसाठी कोर्ट थोडे अरूंद असते. साईड लॉबीचा वापर केला जात नाही.
-खेळाचा मुख्य भाग म्हणजे चेंडू जाळ्याच्या पलिकडे अश्यापद्धतीने मारणे जेणेकरून तो प्रतिस्पर्ध्याला परतवता येणार नाही.
-आपण मारलेल्या फटक्यावर आपण खालील कारणांमुळे पॉईंट हरू शकतो.
१. बॉल जाळ्यात अडकला तर
२. बॉल कोर्टच्या बाहेर पडला तर.
- प्रत्येक पॉईंटची सुरुवात सर्व्हिस पासून होते.
१. जर पहिली सर्व्हिस चुकली तर सर्व्हिस करणार्या खेळाडूला आणखी एक संधी मिळते.
२. ह्या सर्व्हिसला सेकंड सर्व्ह म्हणतात.
३. एका गेममध्ये एकच खेळाडू सर्व्हिस करतो . गेम संपल्यानंतर दुसर्या खेळाडूची सर्व्हिस सुरु होते.
-पॉईंट मोजण्याची पद्धत
१.पहिले तीन पॉईंट १५, ३०, ४० असे मोजतात तर पुढच्या पाँईटवर खेळाडू गेम जिंकतो.
२. स्कोर ४०-४० झाला तर त्याला ड्युस म्हणतात. ड्सुस नंतर जो खेळाडू सलग दोन पॉईंट जिंकतो, तो गेम जिंकतो.
३. गेम्सचा मिळून सेट बनतो. कमित कमी दोन गेमच्या फरकानी पहिल्यांदा ६ गेम जिंकणारा खेळाडू सेट जिंकतो. उदा. ६-४, ७-५.
४. जर सेट मधल्या गेम्सचा स्कोर ६-६ झाला तर टाय ब्रेकर खेळला जातो.टाय ब्रेकरमध्ये कमित कमी दोनाच्या फरकाने पहिल्यांदा सात पॉईंट जिंकणारा खेळाडू जिंकतो.
- मेडल्स
१. पुरूष एकेरी
२. महिला एकेरी
३. पुरुष दुहेरी
४. महिला दुहेरी
५. मिश्र दुहेरी
- पुरूष एकेरीची अंतिम फेरी पाच सेटची (बेस्ट ऑफ फाईव्ह) खेळली जाते बाकी सर्व सामने तीन सेटचे (बेस्ट ऑफ थ्री) खेळले जातात.
-टेनिसचे सामने बाद फेरी पद्धतीने खेळवले जातात. हरणारा खेळाडू किंवा संघ स्पर्धेबाहेर जातो.
-खेळाडू आणि संघांना मानांकन दिले जाते. सगळ्यात चांगला खेळाडू किंवा संघ प्रथम मानांकित असतो. सर्वोत्तम चार खेळाडू किंवा संघ उपांत्य फेरीपर्यंत एकमेकांविरुद्ध खेळत नाहीत.
- चार खेळाडू किंवा संघ उपांत्य फेरीचे सामने खेळतात. त्यातून दोन अंतिम फेरीत जातात. अंतिम विजेत्याला सुवर्ण पदक मिळते. उपविजेत्याला रजत पदक मिळते. उपांत्य फेरीत हरलेले दोन खेळाडू / संघ एकमेकांशी सामना खेळतात आणि त्यातल्या विजेत्याला कांस्य पदक मिळते.
ऑलिंपीकमध्ये टेनिस
-१८९६मध्ये टेनिसचा ऑलिंपीकमध्ये सर्वप्रथम समावेश झाला पण नंतर १९२४ च्या पॅरिस ऑलिंपीकमध्ये टेनिस वगळण्यात आले.
-१९८८ च्या ऑलिंपीकपासून टेनिसचा परत समावेश करण्यात आला.
दुबईः जागतिक रँकिंगमध्ये
दुबईः जागतिक रँकिंगमध्ये अव्वल असलेला रफाएल नदाल आंतरराष्ट्रीय टेनिस प्रीमियर लीगमध्ये (आयटीपीएल) मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे! मुंबईच्या संघात सानिया मिर्झा व रोहन बोपण्णा यांचादेखील समावेश आहे. या लीगकडून आलेल्या पत्रकात ही माहिती नमूद करण्यात आली आहे. मुंबई, सिंगापूर, दुबई आणि बँकॉक अशा चार संघांचे मालक रविवारी दुबईत एकत्र आले अन् त्यांनी स्पर्धेच्या कार्यक्रमाबाबत चर्चा केली.
महेश भूपतीला सुचलेल्या कल्पनेतून साकारणारी ही लीग आशियातील पाच शहरांमध्ये होईल, असे सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र आता या स्पर्धेला २८ नोव्हेंबरला सिंगापूरमध्ये सुरुवात होईल, असे जाहीर केले गेले आहे. तर १४ डिसेंबरला दुबईत या स्पर्धेचा समारोप होईल.
आश्चर्याची बाब म्हणजे भारताचा आघाडीचा टेनिसपटू सोमदेव देववर्मनला सध्या तरी स्पर्धेतील एकाही संघाने करारबद्ध केलेले नाही. फ्रान्सचा गेल मॉनफिल्स, अमेरिकेचा महान टेनिसपटू पीट सॅम्प्रस, अॅना इवानोविच व फॅब्रिस सँतोरो यांचाही मुंबई संघात समावेश आहे. जागतिक रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा नोवाक जोकोविच दुबईचे प्रतिनिधित्व करेल. या संघात कॅरोलिन वॉझनियाकी, गोरान इवानोसेविच, यान्को टिपसरेविच, नेनाद झिमानिच, मॅलेक जॅझिरी आणि मार्टिना हिंगिस ही मंडळीदेखील दुबई संघात आहेत.
अँडी मरे सिंगापूरचे प्रतिनिधित्व करेल, या संघात त्याला साथ असेल ती जो विलफ्रेड सोंगा, व्हिक्टोरिया अझरेंका, डॅनिएल नेस्टर, कार्लोस मोया आणि कर्स्टन फ्लिपकेन्स यांची. सध्याची स्टार खेळाडू सेरेना विल्यम्सला सिंगापूरने आपल्या संघात घेतले आहे. तिच्यासह या संघात आंद्रे आगासीसारखा बडा माजी टेनिसपटू, टॉमस बर्डिच, लेटन ह्युईट, ब्रुनो सॉरेस, पॅट्रिक राफ्टर, डॅनिएला हँतुकोवा आणि निक क्रिगिओस यांचा समावेश असेल.
Pages