९ दिवस १७२ खेळाडू ५ सुवर्ण पदके.
शनिवार २८ जुलै ते रविवार ५ ऑगस्ट
ठिकाण : विंबल्डन (ग्रास कोर्ट)
-टेनिस कोर्ट २४ मिटरपेक्षा थोडेसे लहान असते आणि कोर्टच्या मध्यभागी नेट असते. नेट १ मिटरपेक्षा थोडे कमी उंचीचे असते.
-दुहेरी सांमन्यांसाठी कोर्टची पूर्ण रूंदी वापरली जाते. एकेरी सामन्यांसाठी कोर्ट थोडे अरूंद असते. साईड लॉबीचा वापर केला जात नाही.
-खेळाचा मुख्य भाग म्हणजे चेंडू जाळ्याच्या पलिकडे अश्यापद्धतीने मारणे जेणेकरून तो प्रतिस्पर्ध्याला परतवता येणार नाही.
-आपण मारलेल्या फटक्यावर आपण खालील कारणांमुळे पॉईंट हरू शकतो.
१. बॉल जाळ्यात अडकला तर
२. बॉल कोर्टच्या बाहेर पडला तर.
- प्रत्येक पॉईंटची सुरुवात सर्व्हिस पासून होते.
१. जर पहिली सर्व्हिस चुकली तर सर्व्हिस करणार्या खेळाडूला आणखी एक संधी मिळते.
२. ह्या सर्व्हिसला सेकंड सर्व्ह म्हणतात.
३. एका गेममध्ये एकच खेळाडू सर्व्हिस करतो . गेम संपल्यानंतर दुसर्या खेळाडूची सर्व्हिस सुरु होते.
-पॉईंट मोजण्याची पद्धत
१.पहिले तीन पॉईंट १५, ३०, ४० असे मोजतात तर पुढच्या पाँईटवर खेळाडू गेम जिंकतो.
२. स्कोर ४०-४० झाला तर त्याला ड्युस म्हणतात. ड्सुस नंतर जो खेळाडू सलग दोन पॉईंट जिंकतो, तो गेम जिंकतो.
३. गेम्सचा मिळून सेट बनतो. कमित कमी दोन गेमच्या फरकानी पहिल्यांदा ६ गेम जिंकणारा खेळाडू सेट जिंकतो. उदा. ६-४, ७-५.
४. जर सेट मधल्या गेम्सचा स्कोर ६-६ झाला तर टाय ब्रेकर खेळला जातो.टाय ब्रेकरमध्ये कमित कमी दोनाच्या फरकाने पहिल्यांदा सात पॉईंट जिंकणारा खेळाडू जिंकतो.
- मेडल्स
१. पुरूष एकेरी
२. महिला एकेरी
३. पुरुष दुहेरी
४. महिला दुहेरी
५. मिश्र दुहेरी
- पुरूष एकेरीची अंतिम फेरी पाच सेटची (बेस्ट ऑफ फाईव्ह) खेळली जाते बाकी सर्व सामने तीन सेटचे (बेस्ट ऑफ थ्री) खेळले जातात.
-टेनिसचे सामने बाद फेरी पद्धतीने खेळवले जातात. हरणारा खेळाडू किंवा संघ स्पर्धेबाहेर जातो.
-खेळाडू आणि संघांना मानांकन दिले जाते. सगळ्यात चांगला खेळाडू किंवा संघ प्रथम मानांकित असतो. सर्वोत्तम चार खेळाडू किंवा संघ उपांत्य फेरीपर्यंत एकमेकांविरुद्ध खेळत नाहीत.
- चार खेळाडू किंवा संघ उपांत्य फेरीचे सामने खेळतात. त्यातून दोन अंतिम फेरीत जातात. अंतिम विजेत्याला सुवर्ण पदक मिळते. उपविजेत्याला रजत पदक मिळते. उपांत्य फेरीत हरलेले दोन खेळाडू / संघ एकमेकांशी सामना खेळतात आणि त्यातल्या विजेत्याला कांस्य पदक मिळते.
ऑलिंपीकमध्ये टेनिस
-१८९६मध्ये टेनिसचा ऑलिंपीकमध्ये सर्वप्रथम समावेश झाला पण नंतर १९२४ च्या पॅरिस ऑलिंपीकमध्ये टेनिस वगळण्यात आले.
-१९८८ च्या ऑलिंपीकपासून टेनिसचा परत समावेश करण्यात आला.
भुपती बोपण्णा पहिली फेरी
भुपती बोपण्णा पहिली फेरी अटीतटीट जिंकले. मिर्नयी होता समोर..
बाकी एकेरीत वर्धन आणि सोमदेव दोघेही हरले.
पेस आणि विष्णूवर्धन पण जिंकले
पेस आणि विष्णूवर्धन पण जिंकले पहिली फेरी...
फेडररने पहिल्या दोन फेर्या पार केल्या...
भुपती बोपण्णा दुसर्या फेरीत
भुपती बोपण्णा दुसर्या फेरीत पराभूत...
http://sports.yahoo.com/olympics/tennis/mens-doubles-tem002.html
ओह ...पेस म्हणेल भांडुया
ओह ...पेस म्हणेल भांडुया सौख्यभरे
(No subject)
आधी किती टिवटीव केली आणि काय
आधी किती टिवटीव केली आणि काय हरले दुसर्या फेरीत. सगळीकडे मुलाखती देऊन स्वतःचे सांत्वन करत आहेत. पेसने आता तिसरी फेरी गाठावी आणि ह्यांची जिरवावी.
आज पेसचे पुरुष
आज पेसचे पुरुष दुहेरी(फ्रान्सविरुद्ध- त्सोंगा) आणि मिश्र दुहेरी(सर्बिया : अॅना+नेनाद) असे दोन्हीचे सामने आहेत. कठीण आहे.
पेसने आता तिसरी फेरी गाठावी
पेसने आता तिसरी फेरी गाठावी आणि ह्यांची जिरवावी. >+१
आज मिस्क डबल मधे सानिया, पेसचा सामना ८:३० आहे का?
फेडरर वि डेल पोट्रो सामना
फेडरर वि डेल पोट्रो सामना सुरू आहे.
डीडी स्पोर्ट्सने तीन्-चार दिवसांपूर्वी फेडररची मुलाखत घेतली होती. पुढल्या दोन वर्षांत भारतात व्हेकेशनसाठी येणार. भारतातल्या ट्रॅफिकची त्याला भीती वाटते म्हणे.
काल पेस-सानियाची सर्बियन
काल पेस-सानियाची सर्बियन टीमविरुद्धची मॅच पाहिली. छान खेळले दोघेही. मध्ये जरा खेळावरचं नियंत्रण जातंय की काय असं वाटत असताना पेसने सानियाला सर्विससाठी काहीतरी टीप दिली, आणि त्यानंतर लगेचच पेसने कोर्टच्या बरोब्बर मध्यभागी ड्रॉप टाकून मस्त पॉईंट मिळवला. सानियाची सर्विस मस्त आहे. बाकीच्या मिक्स्ड डबल्समधल्या महिला खेळाडूंची सर्विस लेचीपेची वाटली.
पेस पुरुष दुहेरीतून बाहेर
पेस पुरुष दुहेरीतून बाहेर पडलेला आहे... पण मिश्र दुहेरीत पुढच्या फेरीत गेला आहे.. आजच आहे त्याची मॅच..
मंजूडी +१ .. काल सानियासुद्धा
मंजूडी +१ .. काल सानियासुद्धा पेसईतकीच छान खेळली. आता नं. १ ची जोडी आहे पुढल्या फेरीत.
भारतातल्या ट्रॅफिकची त्याला
भारतातल्या ट्रॅफिकची त्याला भीती वाटते म्हणे.>>मग तो त्याच्या स्पॅनिश दोस्ताला डायवर म्हणून आणेल.
पेस आणि सानियाला मेडलची संधी आहे असे मला वाटते. :). मिश्र दुहेरीत अपसेट होउ शकते.
फेडेक्स १ सेट डाऊन...
फेडेक्स १ सेट डाऊन... दुसर्या सेट मध्ये २ -१ पुढे पण पोट्रोची सर्व्हीस..
ही उपांत्य फेरी आहे ! दुसरी
ही उपांत्य फेरी आहे ! दुसरी जोको वि मरे
फेडरर - डेल पोट्रो तिसरा सेट
फेडरर - डेल पोट्रो तिसरा सेट . नो टायब्रेकर. सध्या ८-९
केली ब्रेक १९ व्या
केली ब्रेक १९ व्या गेममध्ये!
बघूया सर्वीस ठेवायला जमतंय का?
१९-१७ जिंकला एकदाचा
१९-१७
जिंकला एकदाचा
फेडरर वि मरे अॅक्शन
फेडरर वि मरे अॅक्शन रिप्ले?
शारापोव्हा वि सेरेना
पेस-मिर्झा यांच्य मॅचला मुहूर्त मिळेना
जोकोविच-मरे लढतीत जोक्या हरला
जोकोविच-मरे लढतीत जोक्या हरला की काय? अंतिम फेरी फेडरर-मरे आहे का? कधी?
सेरेना भयंकर फॉर्मात आहे! काय सर्व्हिस पडत होती काल तिची! घेतेय बहुतेक सुवर्ण पदक असाच फॉर्म राहिला तर.
येस.. फायनल मरे - फेडरर आहे..
येस.. फायनल मरे - फेडरर आहे.. उद्या आहे फायनल..
मरेनी जोकोला ७ - ५, ७ - ५ असे हारवले..
मारियाच्या सर्विस सेरेना
मारियाच्या सर्विस सेरेना आरामात ब्रेक करत होती. अगदीच एकतर्फी झाला अंतिम सामना.
सेरेनाची गोल्डन करिअर स्लॅम
सेरेनाची गोल्डन करिअर स्लॅम पूर्ण. (फक्त)स्टेफीकडे गोल्डन स्लॅम आहे.
फेडररही करेल का?
काल फेडरर- डेल पोट्रो सामन्यानंतर रडारड.
सेरेना दहा वर्षांच्या निरागस मुलीसारखे लाडेलाडे वागते आणि बोलते. ती कौन्सेलिंग करून घेत असेल तर आता पुरे म्हणावं. नाहीतर क्युरियस केस व्हायची.
मयेकर फार दंगा करते कोर्ट
मयेकर फार दंगा करते कोर्ट वर, खुन्नसपाणी वगैरे. जबरीच खेळली पण आज. शॅरापोवा अगदीच शेळपट वाटत होती.
उद्या मजा येणार. मरे बिचार्या बच्चू वर परत प्रेशर.
>>(फक्त)स्टेफीकडे गोल्डन
>>(फक्त)स्टेफीकडे गोल्डन स्लॅम आहे
या वाक्यात "बायकांमध्ये" हा शब्द राहिलाय. आणि आता ते "होता" पाहिजे.
गोल्डन स्लॅम म्हणजे एकाच
गोल्डन स्लॅम म्हणजे एकाच वर्षात ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबल्डन, यू एस ओपन आणि ऑलिंपिक गोल्ड जिंकणे. ते फक्त स्टेफीनेच केलेय.
वरच्या पोस्टमध्ये मी फेडररही 'करियर' गोल्डन स्लॅम करेल का असे म्हणायला हवे होते.
आगासी, राफा आणि आता सेरेनाने करियर गोल्डन स्लॅम केलेय. म्हणजे कधीना कधी या पाचांतली एकेक स्पर्धा जिंकलीय.
स्लॅम हा एक रेकॉर्ड असेल तर तो 'होता' कसा होईल?
"(फक्त)" आहे म्हणून. "करियर"
"(फक्त)" आहे म्हणून.
"करियर" कडे लक्ष नव्हते.
गल्ली चुकली, सॉरी.
गल्ली चुकली, सॉरी.
जाऊ द्या हो.
जाऊ द्या हो.
अहो ते "गल्ली चुकली" चुकून
अहो ते "गल्ली चुकली" चुकून पेडगावातले पोस्ट इथे टाकले म्हणून लिहिले.
तुमचे बरोबर आहे की वर. ४ वर्षातून एकदा ऑलिंपिक येणार तेव्हा ते गोल्डन स्लॅमचे अवघडच आहे.
विल्यम्स भगिनी जिंकल्या.
Pages