प्रार्थना
युगे युगे मी वाट पाहते
जन्मामागून जन्मच घेते
प्रभूकृपा परी मज न लाभते
सांग कोणती होऊ पायरी
मी तव चरणस्पर्श मिळवाया
माझा जन्म सफल हा व्हाया
शिळा अहिल्या उद्धरण्याला
अरण्यात राघवा पातला
तिच्याच पुढची असून शिळा मी
चरण धूलीकण मज न लाभला .
का पक्षपात केला रघुराया?
गेला शिळा जन्म मम वाया!
तव स्पर्शाला अति आतुरले
शबरी हाती 'बोर' जाहले,
तव भ्रात्याने मला फेकिले
हिणवून 'उष्टे' रे रघुराया !
ही पण तुझीच की रे माया !!
गेला 'बोर-जन्म' मम वाया!
कुब्जे हाती सहाण झाले
चन्दनासवे कण कण झिजले
कुब्जेला तू उद्धरिले अन
चंदन झाले तुझे विलेपन
मज न लाभली कृपा कासया?
गेला तोही जन्म मम वाया !!
तूच सांग मज जाऊ कुठे मी?
तळमळ मनीची दावू कुणा मी?
कुण्या गुरूचे चरण धरू मी?
दावील वाट मला प्रभुराया
मिळण्या अखंड प्रभुपद ठाया?
न जावो जन्म हा तरी वाया
सांग रे सांग मला प्रभुराया!!
-------------०--------------------
कवितेमागची कल्पना अतिशय सुंदर
कवितेमागची कल्पना अतिशय सुंदर आहे, मात्र कवयित्रीने तिचे तुकडे केले आहेत, शिवाय कवयित्री स्वतःच संभ्रमात पडल्याचे जाणवते त्यामुळे मनात आलेले सुंदर विचार कसे स्पष्ट करावेत याबद्दल घोटाळा झाला आहे.
तरीही फक्त कल्पना लक्षात घेतल्यास कविता सुंदर व आशयघन आहे. प्रवाहीही आहे.
छान आहे. प्रद्युम्नजींच्या
छान आहे. प्रद्युम्नजींच्या सूचनांचा विचार व्हावा.
प्रद्युम्नजी,किरणजी ,
प्रद्युम्नजी,किरणजी , प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
छान आहे बा़की वरीलप्रमाणे
छान आहे बा़की वरीलप्रमाणे