Submitted by Nilu on 29 July, 2012 - 00:53
जाणारा रेंगाळला की,
अस्वस्थता वाढतेच...
त्रास देउनही ..
त्या जाणार्याला पुन्हा राहण्याची इच्छा..
डोळ्यांची खुणवा खुणव,
हातांची चाळवा चाळव,
फिर-फिरून किचनमधे जाणारी नजर,
आणि नेमक्या वेळी "थांबताय ना आज"... निग्रही विचारणा
जाणार्याला, हवं तसच,
नवाआग्रह,
नवी मेजवानी....
किचनचा मात्र -
तोच त्रागा,
खाल्लेल्या ताटांवरचं स्वामित्व...
उठून-उठून दिलेली तंबाखू,चूना,
काही थकलेले प्रयास,
काही शिणलेले श्वास,
उंबर्याबाहेर गेल्याचे आभास...!
पण म्हणून,
पाहूणे टळतात थोडेच?
-------------------------------------------------------------
मूळ कविता ? http://www.maayboli.com/node/36745
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लाईक्ड!
लाईक्ड!
छान स्तुत्य
छान
स्तुत्य
अगदी खरय हे
अगदी खरय हे
खूप बोलकी कविता आहे,मस्त.
खूप बोलकी कविता आहे,मस्त.
अं...धन्यवाद मंडळी
अं...धन्यवाद मंडळी
झक्कास!
झक्कास!