निरोप...

Submitted by बागेश्री on 28 July, 2012 - 08:07

जाणारा रेंगाळला की,
अस्वस्थता वाढतेच...
त्रास दोघांनाही!
त्या जाणार्‍याला आणि मागे राहणार्‍याला..

डोळ्यांचे मूक संवाद,
हातांची चाळवा-चाळव,
भिरभिरून स्थिरावणारी नजर,
आणि नेमक्या वेळी डोळच्या पाण्याची निग्रही प्रतारणा...!!

जाणार्‍याला, नवा प्रवास,
नवी जागा,
नव्या आठवणी....

मागे राहणार्‍याला मात्र-
तीच जागा,
सोबत घालवलेल्या क्षणांचं पुसट अस्तित्व...
उमटून विरत आलेल्या पाऊलखूणा,
काही थकलेले कयास,
काही निश्वास,
उंबर्‍यात अडकून राहिलेले भास...!

पण म्हणून,

निरोप टळतात थोडेच?

गुलमोहर: 

आता खरे रग्र कर..

कवयित्रीचा कुणीतरी लांबचा भोळसट नातेवाईक घरी रहायला आलेला असावा. असं गि-हाईक सोडेल तर हाडाची कवयित्री कसली त्याला कवयित्रीने आपल्या सगळ्या कविता ऐकवल्या असणार. हाच तो जाच ज्यामुळे तो निघालेला आहे !

किरण : कस रे हे कस Lol
बागे त्याला खर रग्र करायला सांगून तू पायावर कुर्हाड वैगेरे मारून घेतेयेस
डोण्ट यू थिंक सो? Wink

बागेश्री, अफाट सुंदर उतरली आहे कविता. अगदी हेच होतं वेगवेगळ्या पातळीवरील ऋणानुबंध असलेल्यांचा निरोप घेताना / देताना.

Pages