मुष्टियुद्ध
- १६ दिवस, २८६ स्पर्धक, १३ सुवर्ण पदके
- मुष्टियुद्ध सामन्यास लढत म्हणले जाते.
- दोर्यांच्या आतील चौरस ६.१ मी क्ष ६.१ मी असतो. आणि दोर्यांची उंची १.३२ मीटर असते.
- जास्ती गुण मिळवणारा मुष्टियोद्धा विजेता घोषित कला जातो.
- प्रतिस्पर्ध्याला ठोसा मारून गुण मिळवले जातात.
- प्रतिस्पर्ध्याच्या शरीराचा वरच्या भागाला(कमरेचा वरचा भाग) किंवा डोक्याला ठोसा लागल्यास गुण मिळतो.
- प्रतिस्पर्धी जमिनीवर पडल्यास पंच १० आकडे मोजतात. मुष्टियोद्धा तेव्हढ्या कालावधीत उभा न राहिल्यास तो सामना हारतो.
- मुष्टियोद्धा पुढे खेळू शकणार नाही असे लक्षात आल्यास पंच मध्याताही सामना थांबवू शकतात.
- पुरुष व महिलांचे सामने वेगवेगळ्या वेळांचे असतात.
- पुरूषांचे सामने ३ मिनिटांच्या ३ फेर्यांचे असतात.
- महिलांचे सामने २ मिनिटांच्या ४ फेर्यांचे असतात.
- एकूण १३ स्पर्धा आहेत. १० पुरुष गटातील तर ३ महिला गटातील
खेळाडूंच्या वजनानुसार स्पर्धा असतात.
पुरुष गट
४६ - ४९ किलोग्रॅम - लाईट फ्लाय वेट सर्वात हलका वजन गट तर ९१ किलोग्रॅम पेक्षा जास्त वजन सुपर हेवी गट सर्वात जड गट
महिला गट
४८ - ५१ किलोग्रॅम - फ्लाय वेट हा सर्वात हलका आणि ६९ - ७५ मिडल वेट हा सर्वात जड वजन गट
- मुष्टियुद्ध हे बाद फेरीनुसार खेळले जाते.
- समान वजन असलेले खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळतात. हरलेला मुष्टियोद्धा स्पर्धेतून बाद होतो.
- सर्वोत्तम चार मुष्टियोध्दे उपांत्य फेरीचे सामने खेळतात त्यातील विजेते अंतिम लढत खेळतात. विजेत्यास सुवर्ण पदक, हारलेल्यास रौप्य तर उपांत्य फेरीतील पराभूत मुष्टियोद्ध्यास कांस्य पदक दिले जाते.
- मुष्टियुद्धाचा समावेश ऑलिम्पिकमध्ये सर्वात प्रथम १९०४ साली केला गेला.
- महिला मुष्टियुद्धाचा समावेश यंदाच्या लंडन ऑलिम्पिक पासून होतो आहे.
- ऑलिंपिकमध्ये वापरला जाणारा मोजा २८४ ग्रॅमचा आहे.
- ऑलिम्पिक मध्ये भाग घेणारा मुष्टीयोद्धा वय ३४ वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही.
- ऑलिम्पिक मुष्टियुद्ध लढती मध्ये दोन्ही खेळाडूंना जो कोपरा(लाल किंवा निळा) दिला जाईल त्या कोपर्याच्या रंगाचे कपडे घालावे लागतात.
मूळ लेख - http://www.london2012.com/mm/Document/Documents/Publications/01/25/72/53...
भारतीय मुष्टियोद्धे
मेरी कोम : महिला फ्लायवेट (५१ किलो) २००२-२०१० लाइट फ्लायवेट गटातली ५ वेळची विश्वविजेती. ऑलिंपिकमध्ये लाइटफ्लायवेट गट नसल्याने फ्लायवेट गटात समावेश. २०१० आशियाई स्पर्धेत या गटात कास्यपदक.
जयभगवान - लाइट वेट (६० किलो)
देवेंद्र सिंग लैशराम : लाइट फ्लायवेट (४९ किलो) वय २० वर्षे
मनोजकुमार : लाइट वेल्टर (६४ किलो) २०१० कॉमनवेल्थ गेम्स सुवर्णपदक
सुमीत सांगवान : लाइट हेवी (८१ किलो) : वय १९ वर्षे
शिव थापा : बँटम (५६ किलो) वय १८ वर्षे : २०१० यूथ ऑलिंपिक्समध्ये रौप्यपदक
विजेंदर सिंग : मिडलवेट (७५ किलो) (बीजिंग ऑलिंपिक्स कास्यपदक, २०१० आशियाई गेम्स :सुवर्णपदक)
विकास क्रिशन : वेल्टरवेट (६९ किलो) (वय २० वर्षे) (यूथ जागतिक मुष्टियुद्ध २०१० सुवर्णपदक , समर यूथ ऑलिंपिक्स २०१० कास्यपदक, २०१० आशियाई स्पर्धा सुवर्णपदक : ही तिन्ही पदके लाइटवेट गटातली).
विजेंदर हरला आजची मेरी कोमची
विजेंदर हरला
आजची मेरी कोमची मॅच मस्तच झाली पण. तिला सुवर्णपदकासाठी शुभेच्छा
मेरी कोमला सुवर्णपदकासाठी
मेरी कोमला सुवर्णपदकासाठी शुभेच्छा
इंद्रधनुष्य +१ ... पण पुढल्या
इंद्रधनुष्य +१ ... पण पुढल्या फेरीत प्रतिस्पर्धी यजमान देशाची आहे तेव्हा हे अशक्य वाटत आहे. अगदी निकाल सुद्धा फीरवतील..
वादग्रस्त निर्णयांमुळे
वादग्रस्त निर्णयांमुळे मुष्टियुद्धातले रेफरीज आणि टेक्निकल ऑफिशियल्स सस्पेंड्/एक्स्पेल होऊ लागलेत.
अजून कोणाला बाहेर काढलंय???
अजून कोणाला बाहेर काढलंय???
http://www.reuters.com/articl
http://www.reuters.com/article/2012/08/02/oly-boxi-judges-day-idUSL6E8J2...
मेरी कोमची लढत सुरु झाली
मेरी कोमची लढत सुरु झाली आहे... पण तिची लढत ब्रिटीश स्पर्धका विरुद्ध आहे.. अगदीच माफक अपेक्षा आहे की निर्णय योग्य दिला जावा...
मेरी कोम उपांत्य फेरीची लढत ६
मेरी कोम उपांत्य फेरीची लढत ६ - ११ अशी हारली...
भारताच्या खात्यात अजून एका कांस्य पदकाचीच भर..
हे ही नसे थोडके. मेरी कोमचे
हे ही नसे थोडके.
मेरी कोमचे आभिनंदन!!!
ती हरली
ती हरली
देवेन्द्र सिंग लैशराम
देवेन्द्र सिंग लैशराम उप-उपान्त्य फेरीत जिंकु शकला नाही.. मुष्टी युद्धातली आपली शेवटची आशा संपुष्टात आली आहे.
Pages