मुष्टीयुद्ध

Submitted by हिम्सकूल on 27 July, 2012 - 04:12

मुष्टियुद्ध

- १६ दिवस, २८६ स्पर्धक, १३ सुवर्ण पदके

- मुष्टियुद्ध सामन्यास लढत म्हणले जाते.

- दोर्‍यांच्या आतील चौरस ६.१ मी क्ष ६.१ मी असतो. आणि दोर्‍यांची उंची १.३२ मीटर असते.

- जास्ती गुण मिळवणारा मुष्टियोद्धा विजेता घोषित कला जातो.

- प्रतिस्पर्ध्याला ठोसा मारून गुण मिळवले जातात.

- प्रतिस्पर्ध्याच्या शरीराचा वरच्या भागाला(कमरेचा वरचा भाग) किंवा डोक्याला ठोसा लागल्यास गुण मिळतो.

- प्रतिस्पर्धी जमिनीवर पडल्यास पंच १० आकडे मोजतात. मुष्टियोद्धा तेव्हढ्या कालावधीत उभा न राहिल्यास तो सामना हारतो.

- मुष्टियोद्धा पुढे खेळू शकणार नाही असे लक्षात आल्यास पंच मध्याताही सामना थांबवू शकतात.

- पुरुष व महिलांचे सामने वेगवेगळ्या वेळांचे असतात.
- पुरूषांचे सामने ३ मिनिटांच्या ३ फेर्‍यांचे असतात.
- महिलांचे सामने २ मिनिटांच्या ४ फेर्‍यांचे असतात.

- एकूण १३ स्पर्धा आहेत. १० पुरुष गटातील तर ३ महिला गटातील
खेळाडूंच्या वजनानुसार स्पर्धा असतात.

पुरुष गट
४६ - ४९ किलोग्रॅम - लाईट फ्लाय वेट सर्वात हलका वजन गट तर ९१ किलोग्रॅम पेक्षा जास्त वजन सुपर हेवी गट सर्वात जड गट

महिला गट
४८ - ५१ किलोग्रॅम - फ्लाय वेट हा सर्वात हलका आणि ६९ - ७५ मिडल वेट हा सर्वात जड वजन गट

- मुष्टियुद्ध हे बाद फेरीनुसार खेळले जाते.

- समान वजन असलेले खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळतात. हरलेला मुष्टियोद्धा स्पर्धेतून बाद होतो.

- सर्वोत्तम चार मुष्टियोध्दे उपांत्य फेरीचे सामने खेळतात त्यातील विजेते अंतिम लढत खेळतात. विजेत्यास सुवर्ण पदक, हारलेल्यास रौप्य तर उपांत्य फेरीतील पराभूत मुष्टियोद्ध्यास कांस्य पदक दिले जाते.

- मुष्टियुद्धाचा समावेश ऑलिम्पिकमध्ये सर्वात प्रथम १९०४ साली केला गेला.

- महिला मुष्टियुद्धाचा समावेश यंदाच्या लंडन ऑलिम्पिक पासून होतो आहे.

- ऑलिंपिकमध्ये वापरला जाणारा मोजा २८४ ग्रॅमचा आहे.

- ऑलिम्पिक मध्ये भाग घेणारा मुष्टीयोद्धा वय ३४ वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही.

- ऑलिम्पिक मुष्टियुद्ध लढती मध्ये दोन्ही खेळाडूंना जो कोपरा(लाल किंवा निळा) दिला जाईल त्या कोपर्‍याच्या रंगाचे कपडे घालावे लागतात.

मूळ लेख - http://www.london2012.com/mm/Document/Documents/Publications/01/25/72/53...

भारतीय मुष्टियोद्धे
मेरी कोम : महिला फ्लायवेट (५१ किलो) २००२-२०१० लाइट फ्लायवेट गटातली ५ वेळची विश्वविजेती. ऑलिंपिकमध्ये लाइटफ्लायवेट गट नसल्याने फ्लायवेट गटात समावेश. २०१० आशियाई स्पर्धेत या गटात कास्यपदक.
जयभगवान - लाइट वेट (६० किलो)
देवेंद्र सिंग लैशराम : लाइट फ्लायवेट (४९ किलो) वय २० वर्षे
मनोजकुमार : लाइट वेल्टर (६४ किलो) २०१० कॉमनवेल्थ गेम्स सुवर्णपदक
सुमीत सांगवान : लाइट हेवी (८१ किलो) : वय १९ वर्षे
शिव थापा : बँटम (५६ किलो) वय १८ वर्षे : २०१० यूथ ऑलिंपिक्समध्ये रौप्यपदक
विजेंदर सिंग : मिडलवेट (७५ किलो) (बीजिंग ऑलिंपिक्स कास्यपदक, २०१० आशियाई गेम्स :सुवर्णपदक)
विकास क्रिशन : वेल्टरवेट (६९ किलो) (वय २० वर्षे) (यूथ जागतिक मुष्टियुद्ध २०१० सुवर्णपदक , समर यूथ ऑलिंपिक्स २०१० कास्यपदक, २०१० आशियाई स्पर्धा सुवर्णपदक : ही तिन्ही पदके लाइटवेट गटातली).

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विजेंदर सिंग आहे. बीजिंगच्या वेळी अखिलकुमार, दिनेशकुमार, जितेंद्रकुमार या कुमारांच्या गोतावळ्यात विजेंदरचाही उल्लेख विजेंदरकुमार असा केला गेला तेव्हा त्याने आपले नाव विजेंदर सिंग असल्याचे स्पष्ट केले होते अशी बातमी वाचल्याचे आठवते.

मेरी कोम

मयेकर... माहिती हेडर मध्ये दिली आहे.. धन्यवाद...

विजेंदर कुमार आणि सिंग मध्ये घोळच आहे... काल टिव्हीवरच्या कुढल्यातरी बातमीत पण विजेंदर कुमारच होते..

असो.. वर माहिती बदललेली आहे..

सुमित संगवान चांगली लढत देऊन पहिल्या फेरीत हारला.. (४-५, ४-५, ६-५) १४-१५ अश्या फक्त एका गुणाच्या फरकाने हरला...

सुमीत संगवानच्या सामन्यात पंचांनी डेलाइट रॉबरी केली इति (अभारतीय)समालोचक .
आतापर्यंत जय भगवान आणि विजेंद्र सिंग यांनी आपले पहिल्या फेरीचे सामने जिंकले आहेत. शिव थापा पहिल्या फेरीत बाद झाला आहे. आज देवेंद्र सिंग आणि मनोज कुमार यांचे सामने आहेत.

पण आपले लोक अपिल करणार आहेत म्हणे... अपिल केल पण आणि फेटाळल पण.... अपिल मान्य करण्याची शक्यता खुप कमी असते अश्या वेळेस

देवेंद्र सिंग लैश्राम लैच डेंजर दिसतोय.. २:२४ मिनिटांत दोनदा नॉक आउट केलय प्रतिस्पर्ध्याला.. पंचांनी मॅच थांबवली आणि देवेंद्रला विजेता घोषित केलं

भारताचे पाच मुष्टियोद्धे आपापल्या गटात अंतिम सोळात पोचले आहेत.
मेरी कोमला रिंगणात यायला अवकाश आहे.

विकास कृष्णला पंचांनी १३-११ असे विजयी घोषित केल्यावर AIBA ने, अमेरिकन संघाच्या तक्रारीची दखल घेत, हा निर्णय बदलून अमेरिकेच्या एरॉल स्पेन्सला विजयी घोषित केले.
सामन्याचा निकाल घोषित करताना रेफरीने विकास कृष्णाऐवजी एरॉलचा हात उंचावला होता!
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या २० वर्षीय विकासला ऑलिंपिकसाठी तिसरे मानांकन आणि पहिल्या फेरीत बाय मिळाली होती.
सुमीत सांगवानच्या सामन्यात स्कोर १५-१४ असताना, निकाल १५-११ असा घोषित केला गेला होता.

सेमिजच्या दोघांनाही ब्रांझ मिळतं ना बॉक्सिंग मध्ये ? > बरोबर पराग... देवेंद्र आता क्वाटरला पोहचलाय

देवेंद्र खरच डेंजर खेळतो... त्याचा आवेश जबरदस्त असतो.

''फ्लाय' गटात मेरी कोम क्वार्टर्स मध्ये गेली.
जबरदस्त खेळते ती. पदक मिळेल न मिळेल पण तिला खेळतांना बघून वाटतं हातचं काहीही राखून न ठेवता ती अगदी सर्वस्व पणाला लाऊन खेळतेय.

आज रात्री १० वाजता इंग्लिश वेळेनुसार भारतात रात्री २:३०
मेरी कॉमची भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी ६:३०

मेरी कोम जिंकली.. १५ - ६ अशी धडक्यात जिंकली... अजून एक पदक निश्चित...

आता जर विजेंदर जिंकला तर अजून एक पदक निश्चित... आणि देवेंद्रोची पण एक लढत बाकी आहे पदक निश्चित होण्यासाठी.. दोघांनी आपापल्या लढती जिंकाव्या..

सोनेरी दिवस लवकरच येतील >>>> खरच खरच !!! आमेन ! तीनही बॉक्सर्सना शुभेच्छा !!

सुशील कुमारची लढत व्हायची आहे ना अजून ?

Pages