Submitted by वैवकु on 26 July, 2012 - 03:20
माये येणार येणार आता दुकाळ येणार
तुझ्या लेकराना जिणं पुन्हा नकुसं होणार
कर्जबाजारू नशीब कर म्हणतं पेरणी
गाभ धरणार कशी भेगाळलेली धरणी
माझ्या कष्टाचं बियाणं मी गं कुठं पेरणार
माये येणार येणार आता दुकाळ येणार
तहानल्या दाही दिशा माजलीया आणीबाणी
ऐन श्रावणात आटलंया धरणाचं पाणी
आता माणसातली गं माणुसकी आटणार
माये येणार येणार आता दुकाळ येणार
माझ्या हाकंssला धाव ना आई विठाई पाव ना
बरसव बरसव तुझा पावसाचा पान्हा
भुकेजल्या लेकराना तू गं कधी पाजणार
माये येणार येणार आता दुकाळ येणार
.....
.........
आता दुकाळ येणार माये.... दुकाळ येणार !!
......तुझ्या लेकराना जिणं पुन्हा नकुसं होणार!!
......जिणं नकुसं होणार पुन्हा ....नकुसं होणार!!
माये येणार येणार आता दुकाळ येणार !!
गुलमोहर:
शेअर करा
मस्त as usual.
मस्त as usual.
अप्रतिम.... आर्त आणि उत्कट..
अप्रतिम....
आर्त आणि उत्कट.. प्रचंड आवडली!
'पाव ना - पान्हा' हा यमक किंचित कमजोर वाटला..
बट विथ इट, कविता सुपर्ब आहे ! नि:संशय!
कविता छान. ती खरी होऊ नये
कविता छान.
ती खरी होऊ नये ,म्हणून प्रार्थना.
छानच.... भा. पो आटलंया
छानच.... भा. पो
आटलंया धरणाचं ऐन श्रावणात पाणी ???
कविता छान.>>>>नक्कीच. ती खरी
कविता छान.>>>>नक्कीच.
ती खरी होऊ नये ,म्हणून प्रार्थना.>>>>>माझी सुद्धा.
खरेपणाच्या दाहाची कविता.अशीच
खरेपणाच्या दाहाची कविता.अशीच असते/असावी कविता.
'ऐन श्रावणात आटलंया धरणाचं पाणी 'इथे एखादा शब्द कमी पडतोय असं सांगणंही निर्दयतेचं वाटतंय,पण सांगितलं पाहिजे.
सर्वांचे मना:पूर्वक
सर्वांचे मना:पूर्वक आभार
रणजीत ,शामजी, भारतीताई आपल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद
सर्व सूचनांवर मी विचार करतो आहे शक्य ते बदल लवकरच करीन
पुनश्च धन्यवाद
आपला कृपाभिलाषी
-वैवकु
___________
ती खरी होऊ नये ,म्हणून प्रार्थना.>>>>> अनुमोदन
छान आवडली
छान आवडली
आता माणसातली गं माणुसकी
आता माणसातली गं माणुसकी आटणार>> छान..
वैभव, कळकळीनं लिहीलीस, पोहोचतेय... आवडली कविता!
कविता फारच छान. ती खरी होऊ
कविता फारच छान.
ती खरी होऊ नये ,म्हणून प्रार्थना. >>>> +१००
रसप | 26 July, 2012 - 04:04
रसप | 26 July, 2012 - 04:04 नवीन
अप्रतिम....
आर्त आणि उत्कट.. प्रचंड आवडली!
अगदी बरोबर..
ती खरी होऊ नये ,म्हणून
ती खरी होऊ नये ,म्हणून प्रार्थना.
कविता छान.
अन्नदात्या बळीराजाचं पोरच
अन्नदात्या बळीराजाचं पोरच लिहू शकतं असं.. !!
सुंदर कविता! व्यथा खूप
सुंदर कविता!
व्यथा खूप आर्तपणे उतरली आहे.
सुंदर कविता
सुंदर कविता
स्मितू,बागे, शशान्क, देसले
स्मितू,बागे, शशान्क, देसले साहेब, वैशालीताई, किरण,शामली मनःपूर्वक धन्स
प्राजु विषेश आभार .............तुझी ती श्रावणावरची 'श्रावण्चिम्ब' कविता वाचूनच ही सुचलीय.
रीयल्ली ...खरंच !!
धन्स फॉर दॅट.........गं!!
व्व्व्वा !!!!
व्व्व्वा !!!!
धन्स सुप्रियातै!!
धन्स सुप्रियातै!!
"पसायदान" आहे
"पसायदान" आहे हे...!
छान...पाऊस आता नक्की पडणार.
अप्रतिम
अप्रतिम
धन्यवाद गणेशजी धन्यवाद
धन्यवाद गणेशजी धन्यवाद अनिलजी
आज अनेक दिवसानी वाचले तुमचे प्रतिसाद
क्षमस्व
अन्नदात्या बळीराजाचं पोरच
अन्नदात्या बळीराजाचं पोरच लिहू शकतं असं.. !!>> +100
वाह........!!! आर्त..
वाह........!!! आर्त..
खरंच अप्रतिम !
खरंच अप्रतिम !
आनंदराव धन्यवाद ......हे लेखन
आनंदराव धन्यवाद ......हे लेखन आवड्ल्याचे कळवल्याबद्दल (आणि वर आणल्याबद्दलही :))
स्वराली , सत्यजीत यांचेही आभार (क्षमस्व !!! मानायचे राहून गेले होते इतके दिवस )