पुन्हा स्लो शटर.

Submitted by मनीष कदम on 20 July, 2012 - 07:51

१.अरे बघतोस काय नाच!
IMG_7808.jpg
२.पृथ्वी स्वत; भोवती फिरते हे दर्शवणारे तार्‍यांचे छायाचित्र. ह्या प्रचि प्रायोगिक तत्वावर आहेत. अजुन परिणाम कारक प्रचि काढायच्या आहेत.
IMG_222.jpg
३.
IMG_444.jpg

गुलमोहर: 

कॅमेरा ट्रायपॉडवर लाउन शटर स्पिड B मोड वर ठेउन अ‍ॅपरचर full open करणे आणि iso १०० ते २०० ठेवणे. कॅमेरा full wide करुन शटर बटण १५ ते २० मिनीटे दाबुन ठेवणे.

कॅमेरा ट्रायपॉडवर लाउन शटर स्पिड B मोड वर ठेउन अ‍ॅपरचर full open करणे आणि iso १०० ते २०० ठेवणे. कॅमेरा full wide करुन शटर बटण १५ ते २० मिनीटे दाबुन ठेवणे. >>>

यापेक्षा पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे बिनाशर्त मान्य करून टाकावं, झालं Wink

<<<यापेक्षा पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे बिनाशर्त मान्य करून टाकावं, झालं >>>
खुप खुप आभार इतक्या छान प्रतिसादा बद्दल.

आयडिया भारीच आहे........ मस्तच.
आणि ललिताच्या <<< यापेक्षा पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे बिनाशर्त मान्य करून टाकावं, झालं >>>> या कॉमेंटला टोप्या उडवल्या - हॅट्स ऑफ.....

आयडिया भारीच आहे. अफलातुन.
यापेक्षा पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे बिनाशर्त मान्य करून टाकावं, झालं >>> काय लले. बाकी मला पण असेच बंपर झाले ते वाक्य. तुला सहमत Wink

सुरेख फोटो.
पुढल्या वेळि उत्तर दिशा, ध्रुवतारा फ्रेमच्या मध्यावर घेऊन पहा, आणि वेळ थोडा वाढवा, ३० - ३५ मिनिटं. नंतर
फोटो माबो वर टाका. Happy

दुसरा तिसरा छान.
एक सजेशन, स्टार ट्रेल्स शूट करण्याअगोदर काही ब्लॅक फ्रेम्स क्लिक करा (जेणेकरून नॉईज येणार नाही). म्हणजे लेन्स कॅप न काढता ३० सेकंद एक्स्पोज करा. १० ब्लॅक फ्रेम्स पुरेशा आहेत. मग कॅप काढा. आणि मग स्टार ट्रेल्स शूट करा. कॅमेरा continuous drive mode वर ठेऊन.

पुलेशु..