Submitted by दाद on 20 July, 2012 - 01:49
टळटळत्या उन्हानं व्यायली सांज
सावल्यांच्या भरल्या गावात पोरकी होते तेव्हा...
हुरहुरते डोळे पुन्हा पुन्हा चतकोर प्रश्नं होतात, काळोख्या तिठ्यावर..
चवचाल, माणसाळल्या वाटाही
भिऊन वळतात...
त्याच त्या तिठ्यावर, कुणी काळोखशिवली जाणती वात
रोज मिणमिणते.. ’शुंभं करोती...’
म्हणुनच कदाचित माझ्या हिम-शुभ्रं स्वप्नांवर ओरखडाही नाही...
का... ती बहिरी आहेत?
-- शलाका
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
वाह!
वाह!
वा क्या बात है !
वा क्या बात है !
..
..
.
.
झेपली नै. परत वाचावी
झेपली नै. परत वाचावी लागेल.
सॉरी, पोरांचे प्रताप. मेसेज ३ दा पडला.
(No subject)
पुन्हा पुन्हा वाचली.. मग फील
पुन्हा पुन्हा वाचली.. मग फील केली. अशी कित्येक सावल्यांची असुरक्षित गावं एखाद्या जुन्या जाणत्या पणतीच्या आधारानं आजूबाजूला वसलीत नै ?
अरेच्चा ! शीर्षकाबद्दलच राहीलं कि.. एक दोन नकारात्मक प्रतिमांमधून भाव व्यक्त झालाय, त्यावर हा दुर्दम्य आशावाद उठून दिसतो. त्या आशावादावरच तर तग धरून असणारं हे जग आपल्या सुरक्षित काचेच्या जगापर्यंत पोहोचत नसावं.
क्या बात.! क्या बात.! क्या
क्या बात.!
क्या बात.!
क्या बात.!
खुप त्रास घेतले, पण सत्वाला
खुप त्रास घेतले, पण सत्वाला धरून जगण तेवढसं सोप कधीच नव्हत, ज्या सत्वाचा येवढा अभिनान बाळगला, ती सत्व आणि तत्व आजच्या भोंगळ संकृतीत जुनाट, पुरोगामी मानली जातात आहेत. साध्य परीस्थीतीत गलथानपणा, बिभ्तसपणा हे चोचले झाले आहेत, त्यांना संस्कृतीच स्थान दिल जात आहे. अशा परिस्थीतीतही आजही अशी काही लोक भेटतात ज्यांना पाहून प्रसन्न वाटत,सुचिर्भुत वाटतं... आणि त्यांच्या सानिध्य लाभल्यामुळे माझी स्वप्न आजही निष्कलंकीत आहेत.. माझ्या ह्या सुखाचं सारं सारं श्रेय त्याचंच, त्यांच्या संस्कारांचं त्यांच्या सानिध्याच... शुभं करोती ssअसंच ना..
का... ती बहिरी आहेत? म्हणताना कवितेची सगळी सुत्र वाचकाच्या हाती सोडुन तू तुझ्या विचारात पुन्हा गुंग..
रोज मिणमिणते.>> इथे नुसत "मिणमिणते" जरा खटकलं. ज्योत मिणमिणती आहे असली तरी दैप्तीमान आहे असा भास हवा होता, ती ज्योत (व्यक्ती) आता म्हातारी झाली आहे ती कधीही विझेल ह्याची भीती आणि खंत मिणमिणत्या शब्दाने नेमकी पकडली असली तरी...
.
खूप पोटेन्शिअल असलेली पण
खूप पोटेन्शिअल असलेली पण स्वतःच्या आत आत वळलेली अशी अभिव्यक्ती वाचताना माझा जुना फोटो पाहिल्यासारखं वाटलं..लिहित रहा..
आवडली कविता.
आवडली कविता.
कविता खूप आवडली. माझ्या
कविता खूप आवडली.
माझ्या आकलनानुसार, शरीरविक्रय करणार्या स्त्रीयांमुळे(“काळोख्या तिठ्यावर.. चवचाल, माणसाळल्या वाटा” याचा मला जाणवलेला अर्थ) समाजातील कुलीन स्त्रीया सुरक्षित जीवन जगू शकतात. अर्थात, ही जाणीव कुलीन स्त्रीयांना असतेच असं नाही; ("का ती बहिरी आहेत" या ओळीचं मी केलेलं इंटरप्रिटेशन.) असा आशय असावा.
शब्दांचा फापटपसारा न मांडता,
संयत, सुयोग्य, प्रभावी शब्दात आशय मांडण्याच्या धाटणीला सलाम.
अशा कविता वाचल्यावर म्हणावसं वाटतं :
"हातभर गद्याला न जमणारं
वीतभर कविता करून जाते
शब्दांच्या पलिकडलं
शब्दांतूनच सांगून जाते"
एक दर्जेदार कविता वाचल्याचं समाधान लाभलं.
उल्हास... जवळ जवळ स्पॉट ऑन
उल्हास... जवळ जवळ स्पॉट ऑन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शरीरविक्रय करणार्या स्त्रीयांमुळे समाजातील कुलीन स्त्रीया सुरक्षित जीवन जगू शकतात... अगदी असा अर्थ नाही. पण....
स्वत:ला काळोख शिवला असूनही मिणमिणत का असेना पण "जगाचं भलं कर देवा... शुभं करोती..." म्हणण्याचं मोठेपण असणार्या ह्या दिवलीच्या आशीर्वादामुळेच कदाचित माझी स्वप्नं सुखनैव आहेत...
पण... ह्या प्रार्थनेचे सूरही पोचू नयेत अशी बहिरीही...
खूप धन्यवाद, उल्हासदा (फोटोतल्या तुमच्या रुपेरी छटांमुळे बहुदा... दा)
उकाकांचे अभिप्राय हा एक
उकाकांचे अभिप्राय हा एक स्वतंत्र विषय आहे माबोवर माझ्यासाठी.
धन्यवाद दाद. उल्हासदा
धन्यवाद दाद.
अहो, या रूपेरी छटा वयाच्या पस्तीशी पासून गेली पंचवीस वर्षं सांभाळतोय..... ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
उल्हासदा (फोटोतल्या तुमच्या रुपेरी छटांमुळे बहुदा... दा) >>>
’दा’....!!! ..... एक वय सोडलं तर ’दा’ म्हणण्यासारखं माझ्यात काहीही नाही.
---------------------------------------------------------------------------------------------------
"उकाकांचे अभिप्राय हा एक स्वतंत्र विषय आहे माबोवर माझ्यासाठी." >>>
धन्यवाद किरण,
पण टेन्शन आलं मला हे वाचून ......