एसएमएस वाचताय... थांबा

Submitted by विजय आंग्रे on 18 July, 2012 - 04:18

एसएमएस वाचताय... थांबा

मोबाईल वाजला... एसएमएस आलाय, वाचताय, जरा थांबा. तो एसएमएस नक्की ओळखीच्याच व्यक्तीने पाठविलाय ना! नसेल तर पुढे पुढे वाचत जाऊ नका. तसाच डिलीट करा. नाहीतर संपूर्ण वाचायचा प्रयत्न केलात, दिलेल्या लिंकवर क्लिक केलात किंवा अटॅचमेंट डाऊनलोड केलात तर तुमच्या मोबाईलला हानी पोहचू शकते. तुमच्या मोबाईलची सेटिंग बिघडेल, एखादा कायरस मोबाईलमध्ये शिरेल किंवा एखादा कॉल किंवा एसएमएस तुम्हाला न सांगताच पाठविला जाऊ शकतो. त्यामुळे अनोळखी नंबरवरून आलेला एसएमएस वाचताना जरा जपून काहीही होऊ शकते आणि आयटी ऍक्ट अंतर्गत तुमच्या हातून नकळत गुन्हाही घडला जाण्याचा धोका आहे त्यामुळे मोबाईलधारकांनो जरा जपून.

तुम्हाला बक्षीस लागले आहे, तुमचा मोबाईल नंबर आमच्या गोल्ड प्लॅनमध्ये निवडला गेलाय अशा आशयाचे एसएमएस येणे नवीन नाही. पण आता या एसएमएसची जागा दुसर्‍या तर्‍हेच्या एसएमएसने घेतली आहे. ‘तुमची सविस्तर वैयक्तिक माहिती पहायची असले तर खाली दिलेल्या वेबसाईट लिंकवर क्लिक करा! मित्राने तुमचा नंबर दिलाय, फ्री सॉफ्टवेअर पाठवलाय. अटॅचमेंटवर क्लिक करून डाऊनलोड करा. सॉफ्टवेअर सहजासहजी आणि मोफत मिळत असेल तर कोणाला नको. शिवाय आपण न देताच आपली माहिती वेबसाईटवर गेलीच कशी हे पाहण्याची उत्सुकता पण तेवढीच असते. त्यामुळे आपण लिंकवर क्लिक करतो, अटॅचमेंट डाऊनलोड करतो आणि फसतो. लिंकवर क्लिक केल्यास श्तै सारखा वायरस मोबाईल जॅम करू शकतो. अटॅचमेंट मध्ये असलेले हिडन (लपवलेले) सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईलमधील डेटा ट्रान्सफर करू शकतो. मोबाईलच्या फंक्शनची सेटिंग हे सॉफ्टवेअर बिघडवू शकते.

आपण आकर्षित होऊ, एसएमएस वाचताना उत्सुकता वाढावी अशा रितीने ते बनविले जातात. त्यामुळे एसएमएस कुणी पाठवलाय, त्यात कोणती लिंक किंवा अटॅचमेंट आहे का? त्याची विश्‍वासार्हता तपासा नंतरच डाऊनलोड करा. अनोळखी व्यक्तीने पाठवलेला एसएमएस वाचताना जरा जपूनच. नकळत तुमच्या हातून कोणता गुन्हा घडणार नाही याची दक्षता घ्या.’’

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किरण ..... Biggrin

वायरस च्या जागी कायरस लिवलंय हो. Happy

पण धन्यवाद.

हल्ली काही काही चॅनेलवर नट-नट्या ओळखा टाईपचे प्रोग्रॅम्स चालू असतात त्यात चुकूनही भाग घेऊ नका. ते अँकरबाई किंवा बुवा आपल्याला भाग घ्या आणि एक लाख नाहीतर पन्नास हजार घरी बसल्या बसल्या मिळवा असं अत्यंत बडबड करून सांगत असतात. खाली नंबर दिलाय तो लावून लाईनवरच रहा असं सांगतात. अधून मधून ते काही फोन घेतही असतात पण उत्तरं हमखास चुकीची असतात. समोर ढळढळीत अर्धा गोविंदा आणि अर्धा सलमान दिसत असतो आणि लोकं त्यांना सनी देओल, अभय देओल असं कोणीही समजत असतात.

यात मेख अशी आहे की, फोन लँडलाईन वरून केलेले चालत नाहीत. मोबाईलवरूनच करायचे असतात. तुमचा फोन ते घेईपर्यंत होल्ड करून ठेवायचा म्हणजे मोबाईल कंपनीची भर. आपलं उत्तर बरोबर आहेच त्यामुळे अजून जरा वेळ लाईनवर राहिलं तरी चालेल पण एका फटक्यात पन्नास हजार मिळतील अशी सायकॉलॉजी तयार होते. पुढे मोबाईलचं बिल आलं की डोळे पांढरे होत असतील. Happy

ओक

@ मामी.....

"पुढे मोबाईलचं बिल आलं की डोळे पांढरे होत असतील."

~ माझ्या मोबाईलने हा फटका खाल्ला होता. पण त्यावेळी भाच्याच्या हाती मोबाईल असल्याने त्याने 'कॅटरिना' ओळखली आणि झटदिशी एसएमएस त्या ठराविक नंबरला केला. आता ती कैफ बया इतकी स्पष्ट दाखविली होती पडद्यावर की दहातील नऊ येडे तिला एका क्षणात ओळखतील. पण जणू काय आपण ट्रॉयची हेलेनच दाखवित आहोत अशा आविर्भावात ती व्हीजे सतत बडबडत होती.

भाच्याने पाठविलेले उत्तर अर्थातच हवेत विरून गेले. मात्र तिकडे एसएमएस गेल्यावर मोबाईलच्या स्क्रीनवर त्याचे चार्जेस आले चक्क रुपये पन्नास. नशीब माझे भाच्याच्या हालचाली पाहून मी तत्परतेने त्याच्याकडून मोबाईल काढून घेतला....५० चा फटका मात्र कायमचा लक्षात राहिला.

@ विजय आंग्रे ~ थॅन्क्स फॉर धोक्याची सूचना. अजून तरी असे काही अनोळखी एसएमएस आलेले नाहीतच, तरीदेखील इथून पुढे नक्की काळजी घेऊनच ते पाहायचे की नाही हे ठरविता येईल.

अशोक पाटील

एसेमेस? काल कोणत्यातरी चॅनेलवर मी मुद्दाम दहा मिनिटं थांबून हा प्रकार पाहिला. ते फोन करून लाईनीवरच रहा, कधीही तुमचा कॉल आम्ही घेऊ शकतो वगैरे सांगत होते. म्हणजे तितक्या मिनिटांचं बिल येणार. लोकांना ठकवण्याचे उद्योग आहेत.

आमचा उपाय ठरलेला,,,अनोळखी मेसेज वाचायचेच नाहीत... त्यांना डि.लिट. पदवी देऊन टाकायची. Happy

आपला मोबाईल क्रमांक DND (Do Not Disturb) मध्ये नोंदवणे केव्हाही श्रेयस्कर!
DND नोंदणीसाठी 'New message' मध्ये जा आणि 'START 0' असे type करून '1909' वर पाठवा. DND नोंदणी पूर्ण होण्यासाठी ७ दिवस लागतील. त्यानंतरही UCC (Unsolicited Commercial Communication) आल्यास त्याची याच (1909) या क्रमांकावर तक्रार नोंदवता येते.