८-१० छोटी वांगी
२ वाट्या कांदा (किसून किंवा बारीक चिरुन)
२ छोटे चमचे तिखट
१ छोटा चमचा धणेपूड
दालचिनी, लवंग, वेलची यांची पूड प्रत्येकी अर्धा चमचा
४ छोटे चमचे खसखस- वाटून
१ छोटा चमचा हळद
१ छोटा चमचा वाटलेला लसूण
१ छोटा चमचा वाटलेले आले
१ वाटी दूध
अर्धी वाटी दही
अर्धी वाटी खवा (मावा पावडर चालेल)
पाव वाटी काजूचे तुकडे (ऐच्छिक)
२ छोटे चमचे साखर
मीठ
१ वाटी तेल
दीड वाटी पाणी
वरुन घालण्यास कोथिंबीर, पुदीना(ऐच्छिक)
- एक मोठे भांडे, कढई वा पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये २ चमचे तेल घालून गरम होऊ द्यावे.
- वांगी धुवून, पुसून त्यांना + अशी चीर देऊन ती या तेलात थोडी परतून घ्यावी. बाहेर काढून ठेवावी.
- याच भांड्यात उरलेले तेल घालावे.
- गरम झाल्यावर त्यात २ वाट्या कांदा घालून चांगले परतावे, मग खवा (मावा पावडर) घालून परतावे. खाली लागू देऊ नये.
- यानंतर त्यात हळद, आले-लसूण पेस्ट, मीठ, तिखट, साखर, लवंग-दालचिनी-वेलची पूड घालावी.
- वाटलेली खसखस व काजूचे तुकडे घालून परतावे.
- मग एक वाटी दूध आणि अर्धी वाटी दही(फेटून एकजीव केलेले) घालावे.
- १-२ मिनिटे परतावे.
- नंतर वांगी घालावीत आणि ४-५ मिनिटे परतावे.
- मग यात दीड वाटी गरम पाणी घालून झाकण देऊन वांगी शिजवावी.
- वरुन चिरलेली कोथिंबीर, पुदिना घालून वाढावे.
- चपाती, नान, बासमतीचा भात याबरोबर छान लागते. ग्रेव्ही दाटच असते.
-लवंग-दालचिनी इ. मसाल्याचे जिन्नस आख्खे घेऊन खसखशीबरोबर थोड्या दुधात वाटून घेऊ शकता.
- वांग्याऐवजी बटाटा वापरुन पाहू शकता.
ही जरा "वेळखाऊ", "साग्रसंगीत", "कटकटीची" रेसिपी असली तरी "वेगळी" आणि "यम्मी" आहे.
पार्टीसाठी चांगली वाटते.
वा .. फोटो छान आहे .. फामर्स
वा .. फोटो छान आहे ..
फामर्स मार्केटमध्ये चांगली (बिया कमी, गर जास्त) अशी वांगी मिळत आहेत .. करून बघेन ..
वांगी आणि खवा, दूध, दही, मावा इ. कॉम्बिनेशन बघून टण्याच्या आईने दिलेली एक रेसिपी आठवली .. अजूनही हे काँबिनेशन ऑड वाटते ..
भारीये रेसिपी, उद्याच करुन
भारीये रेसिपी, उद्याच करुन बघणेत येईल
मस्त! फोटो कातिल
मस्त! फोटो कातिल
हे बैंगन पाकिस्तानी आहे का?'
हे बैंगन पाकिस्तानी आहे का?'
यम्मो!! कसला तोंपासु फोटो
यम्मो!! कसला तोंपासु फोटो आहे!!
रेशिपी पन लै भारी
श्री
वांगी पाकिस्तानी आहेत... तु खाऊ नकोस
वेळ्खाऊ वेका लोकांचं काम
वेळ्खाऊ वेका लोकांचं काम कठिण करून ठेवलंय जनू ...:)
मस्त यम्मी दिसतंय...
घरात वांगं आणलं कीच कटकट पण बटाट्याला चानस द्यवा काय ?
मस्त आहे प्रकार,
मस्त आहे प्रकार, लालू.
वांग्याकरता खवा, काजू, खसखस वाचून गहिवरूनच आलं.
अरे व्वा!!! वेगळा प्रकार
अरे व्वा!!! वेगळा प्रकार आहे.. निश्चित करुन बघयाला हवा..!!
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स शप्
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
शप्पथ सांगतो की वांगे नाही खात, पण हे चित्र पाहून मनःपूर्वक दाद द्यावीशी वाटली
कातिल! आत्ताच मसालेदार जेवण
कातिल!
आत्ताच मसालेदार जेवण झालय तरी तोंपासु!
एकदा पाहुण्यांवर प्रयोग करणार!
अवांतर - माहितीचा स्त्रोत : व्हई. हे काय र्हायते?
सही! नक्की करणार! वत्सला,
सही! नक्की करणार!
वत्सला, "वही" चा बोलीभाषेतला अवतार.
व्हई मंजी पाककृतींच्या
व्हई मंजी पाककृतींच्या कात्रणांचा / उतरवून घेतलेला साठा. माझ्या आईकडे अशी वही आहे जी बायबल या नावानं प्रसिद्ध आहे.
फोटो फारच तोंपासु आहे.
फोटो फारच तोंपासु आहे.
पाकड्यांचा पदार्थ का खाताय?
पाकड्यांचा पदार्थ का खाताय? जाहीर निषेध.
वांग ,,,खवा,,, दुध सगळ अजब
वांग ,,,खवा,,, दुध सगळ अजब कॉम्बो आहे तरी फोटो पाहुन ट्राय कराव वाटत आहे
अरे बापरे, वांग्याला इतके
अरे बापरे, वांग्याला इतके नटवायचे? नटमोगरा सारखे.
इकडच्या वांग्याना सजवले तरी चवीत मार खातात. वांग्याएवजी मटण घालून करणार. मग एक दोन जिन्नस इथे तिथे कमी ज्यास्त काढले की कमी कटकटीचे,सोप्पं शाही मटण असे म्हणता येइल.
छानच आहे रेसिपी. कमी मसालेदार
छानच आहे रेसिपी. कमी मसालेदार असूनही चविष्ट लागत असतील.
फोटो मस्त!! वांग्याऐवजी पनीर
फोटो मस्त!!
वांग्याऐवजी पनीर घालून करून पाहणार
मस्त आहेत फोटो. मी आधी फोटो
मस्त आहेत फोटो. मी आधी फोटो बघून मग रेसेपी वाचत असतो. चार चमचे खसखस घातली तर लोक पेंगणार नाहीत का लोला?
मस्त फोटो. मला अख्खी वांगी
मस्त फोटो. मला अख्खी वांगी खायला जीवावर येतं तेव्हा कदाचित तुकडे करुन बघेन.
>>वांग्याकरता खवा, काजू, खसखस वाचून गहिवरूनच आलं.>> खरंय.
( इथले मेजॉरिटी लोकं त्यात
( इथले मेजॉरिटी लोकं त्यात वांगं सोडून दुसरं काहीतरी घालायचा विचार करताहेत )
मी वांगं घालूनच ही रेसिपी करेन हं लोला. फोटो सॉलिड टेंप्टिंग आहे
एकदम शाही रेसिपी आणि फोटो (
एकदम शाही रेसिपी आणि फोटो ( नेहेमीप्रमाणे ) सुरेखच
पनीर किंवा चिकन घालून करुन बघणार.
धन्यवाद. या ग्रेव्हीसोबत
धन्यवाद.
या ग्रेव्हीसोबत बटाटा, पनीर चालेल. दूध आणि मांसाहार म्हटलं की काही लोक "तौबा तौबा" करतात पण यात मटण-चिकन पळेलच. (तश्या रेसिपीज आहेत, हव्या तर देईन.)
मला तर 'वांगे' म्हटल्यावरच गहिवरुन येते. किती बहुगुणी! साधी हळद, मीठ-मिरचीची भाजी असो, भरीत असो, झणझणीत भरली असोत, काप असोत की अशी शाही डिश. सगळीकडे चवदार लागणार आणि शोभून दिसणार. भाकरीबरोबर साधा मेनूत असो वा पार्टी मेनू.
वांगे अमर रहे!
वांग्याकरता खवा, काजू, खसखस
वांग्याकरता खवा, काजू, खसखस वाचून गहिवरूनच आलं.>>मामी+१
मस्तच आहे फोटो आणि रेसिपी.
मस्त पाकृ आणि फोटो. करून
मस्त पाकृ आणि फोटो. करून बघणेत येईल.
साधारण अशाच शाही ग्रेवीतली वांगी खायला मिळाली होती. त्यातली वांगी वेगळी शॅलोफ्राय करून घातल्याचं कळलं. (नो वंडर अफाट चव होती.)
>>यातली वांगी वेगळी शॅलोफ्राय
>>यातली वांगी वेगळी शॅलोफ्राय करून घातल्याचं कळलं
तेच केलंय की.
वांगी तेलात शिजवून घ्यायची
वांगी तेलात शिजवून घ्यायची अशा अर्थानं वाचा. गरम पाणी घालून नाही.
भारी रेस्पी आणि फोटो! करणेत
भारी रेस्पी आणि फोटो! करणेत येईल.
लोला, रेसिपी आणि फोटो भारी..
लोला, रेसिपी आणि फोटो भारी.. नेहमीप्रमाणेच
साधी हळद, मीठ-मिरचीची भाजी असो, भरीत असो, झणझणीत भरली असोत, काप असोत की अशी शाही डिश >> वांगी आवडतातच त्यामुळे नक्की करणार
मान्य आहे पण एक पाककृती
मान्य आहे पण एक पाककृती राहिली. कुठल्याही मातिच्या मडक्यात वांगी करुन बघा. सोबत लसणीच्या पाकळ्यात घाला. वांगी मातिच्या गाडग्यात जशी शिजतात तशी इतर कशातबीन नाई.
Pages