मित्रहो,
आपण सुरू केलेली गण, मात्रा, वृत्त आणि गझलच्या व्याकरणाची चर्चा समजायला थोडी सोपी जावी, आणि व्याकरणाव्यतिरिक्त गझल लेखनाची जी वैशिष्ट्यं असतात, त्यांच्याशी तुमची ओळख व्हावी म्हणून आपण काही संपूर्ण गझल उदाहरणादाखल पाहणार आहोत.
बाजार
- वैभव जोशी
भावनांचा मांडला बाजार नाही
शब्द माझा एवढा लाचार नाही
मी स्मशानी राहतो आता सुखाने
फक्त त्या जागीच भ्रष्टाचार नाही
घाव मी सारे जरी साहून गेलो
सोसला मजला फुलांचा वार नाही
का बरे यावे तुझ्या त्या राउळी मी?
मानतो अस्तित्व पण आकार नाही
मी कसे सांगू मला विसरू नको तू
तेवढाही राहिला अधिकार नाही
आपल्या हाती कसा आला तराजू?
ही असे प्रीती सखे, व्यापार नाही
छप्पराला दोष मी द्यावा कशाला?
भिंत आहे, पण तिचा आधार नाही
माणसे मोजू कशी गावातली या?
राहिला येथे कुणी दिलदार नाही
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
------
आता आपल्या झालेल्या अभ्यासावरून काही गोष्टी आपल्या लक्षात येतील.
गझलचा मतला म्हणजे पहिला शेर बघा.
१. यातला दोन्ही ओळींत येणारा सामायिक शब्द आहे - 'नाही'.
हा आपला रदीफ आहे. (हाच कार्यशाळेसाठी दिलेला रदीफ आहे.)
२. रदीफ च्या आधी येणारे, यमक साधणारे 'बाजार' आणि 'लाचार' हे जे शब्द आहेत, त्यांनी ठरवला या गझल चा काफिया.
३. काफियामधलं यमक साधणारं अक्षर 'र'. त्या आधी येणारी जी अक्षरं आहेत, जा (बाजार) आणि चा (लाचार), त्यांच्यात काय सामायिक आहे? तर ही दोन्ही आकारांत अक्षरं आहेत.
म्हणजेच या गझलची अलामत आहे 'आ'.
४. गझलचं वृत्त.... तुम्ही ओळखणार?
या चार गोष्टींनी, म्हणजे वृत्त, रदीफ, काफिया आणि अलामत यांनी - गझलची 'जमीन' निश्चित झाली.
आता यापुढचे सगळे शेर ही 'जमीन' पाळतील. सगळ्या ओळी याच वृत्तात असतील. सगळे सानी मिसरे (शेरातली दुसरी ओळ) 'नाही' या रदीफने संपतील.
त्या 'नाही' च्या आधीचे काफियाचे शब्द आ ही अलामत पाळतील आणि 'र' ने संपतील. जसे भ्रष्टाचार, आकार, वार, दिलदार, इ.
ह्या सगळ्या झाल्या तांत्रिक बाबी.
आता थोडं अर्थाकडे बघू.
१. गझलचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे असतं, की गझलचा प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते.
म्हणजे काय?
कोणत्याही एका शेर चा पूर्ण अर्थ लागणं हे त्या आधीच्या वा नंतरच्या शेरवर अवलंबून नसतं. खरंतर, कित्येकदा एका गझलमधले निरनिराळे शेर निरनिराळ्या विषयांवरही असतात. हा गझल आणि इतर कविता/गीतांमधला सर्वात महत्त्वाचा फरक आहे.
बघा बरं या गझल मधले शेर या कसोटीला उतरतायत का.
आता आणखी एक गझल पाहू या.
निवेदन
- सुरेश भट
वागणे माझे जगाशी ठीक नाही!
हे मला मंजूर, मी सोशीक नाही!
बोलणे माझे जरा ऐकून घे तू
मी खुळा नाही, तर्हेवाईक नाही!
शब्दही नाहीत नक्षीदार माझे,
बोलणे माझे तसे बारीक नाही!
ऐकले पाल्हाळ मी रामायणाचे
शंबुकाची गोष्ट पाल्हाळीक नाही
काळजी नाही मला त्या विठ्ठलाची
संतहो, मी तेवढा भावीक नाही!
श्वास हा माझा कृपा नाही कुणाची
लेखणी माझी कुणाची भीक नाही!!
-----
गझलचे शेर हे संवादात्मक - वाचकाशी / श्रोत्याशी समोरासमोर बसून गप्पा मारल्यासारखे सहजसोप्या भाषेत असावेत असा संकेत आहे.
वरील गझलेतले शेर या दृष्टीने आवर्जून अभ्यासण्यासारखे आहेत. आशयपूर्ण, वृत्तबद्ध, आणि तरीही किती सहज आणि सोपी भाषा वापरली आहे पहा!
आता असं करू, 'नाही' हा रदीफ असलेली काही वृत्तांची उदाहरणं बघू.
(ही सगळी उदाहरणं सुरेश भटांच्या गझलांची आहेत.)
१. अद्यापही सु-याला माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही
वृत्त - गा गा ल गा ल गा गा, गा गा ल गा ल गा गा
म्हणजेच गा गा ल गा ल गा गा X २
काफिया - सराव, घाव, इ. ह्यात ’व’ हे काफियातील न बदलणारे अक्षर.
अलामत - काफियातील न बदलणा-या ’व’ ह्या अक्षराआधीच्या अक्षराचा स्वर. इथे ’आ’ ही अलामत आहे.
म्हणजे ह्या गझलेत नाव, गाव, निभाव असे काफिये येतील
२. कालची बातमी खरी नाही
हाय! स्वर्गात भाकरी नाही
वृत्त - गा ल गा ,गा ल गा, ल गा गा गा
काफिया - खरी, भाकरी. ह्यात ’री’ हे न बदलणारे अक्षर.
अलामत - ’अ’
म्हणजे ह्या गझलेत पुढे नोकरी, ओसरी, उशीवरी अशी यमके येतील.
आता देत आहोत त्या ओळीचे वृत्त, काफ़िया आणि अलामत ओळखा पाहू...
१. वागणे माझे जगाशी ठीक नाही
हे मला मंजूर - मी सोशीक नाही
२. कधी झालो तुझा मी हे मला माहीतही नाही
तशा मी वेगळ्या नोंदी कधी ठेवीतही नाही
३. जसा मला वाटला तसा हा प्रवास नाही
अजून कोणीच सोबती आसपास नाही
४. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही
तुम्ही गझल लिहीताना यापैकीच एखादं वृत्त वापरलं पाहिजे असं बंधन अर्थातच नाही.
पण हे काही पर्याय असू शकतात ज्यांचा विचार करायला हरकत नाही.
>>घाव मी
>>घाव मी सारे जरी साहून गेलो
सोसला मजला फुलांचा वार नाही
आपल्या हाती कसा आला तराजू?
ही असे प्रीती सखे, व्यापार नाही
सहीच!
गा ल गा गा * ३
मस्तच.. भटा
मस्तच..
भटांची गझल आठवली ह्या वृत्तात - ग ल ग ग | ग ल ग ग | ग ल ग ग
कोणत्या स्वप्नास आता दोष देऊ?
जीवनाला मीच नामंजूर होतो !
तेवते आहेस तू पूजेत कोठे
एकदा मीही तुझा कापूर होतो !
असे शब्द होते त्याचे..
उपासा, ग ल ग
उपासा, ग ल ग ग असे नाही
गा ल गा गा अस आहे ते
गालगागा*३ बरोबर का?
छप्पराला दोष मी द्यावा कशाला?
भिंत आहे, पण तिचा आधार नाही >>>>>क्या बात है!! वा!
माझ्या
माझ्या मनात ही गजल वाचताना काही प्रश्न निर्माण झाले होते त्याची उत्तरे तुमच्या खालच्या उतार्यात मिळाली
---
कोणत्याही एका शेर चा पूर्ण अर्थ लागणं हे त्या आधीच्या वा नंतरच्या शेरवर अवलंबून नसतं. खरंतर, कित्येकदा एका गझलमधले निरनिराळे शेर निरनिराळ्या विषयांवरही असतात. हा गझल आणि इतर कविता/गीतांमधला सर्वात महत्त्वाचा फरक आहे.
---
धन्यवाद.
--
भावनांचा मांडला बाजार नाही
शब्द माझा एवढा लाचार नाही
गालगागा *३
बरोबर आहे का?
मंजुघोषा
मंजुघोषा आहे ना हे वृत्त?
गालगागा * ३
संघमित्रा
गालगागा
बरोब्बर,
बरोब्बर, चिन्नू, उपास, श्यामली, अश्विनी आणि संघमित्रा.
उपास, गुरू हा 'गा' (दीर्घ उच्चार म्हणून) असा लिहीतात.
अजून एक
अजून एक शंका, प्रत्येक शेर वेगवेगळ्या विषयावर असला तरी मूड सारखाच असायला हवा ना? नाहितर गजलची वाटच लागेल. उदा. एखादी गजल पूर्णपणे उदास तर उदासच किंवा अधीरता दाखवणारी तर अधीरच असली पाहिजे ना?
अश्विनी, अस
अश्विनी,
असाही आग्रह नसतो खरंतर. पण अगदीच विरोधी धाटणीचे शेर लागोपाठ आले तर रसभंग होण्याची शक्यता असते हे खरं आहे.
शिवाय गझल 'गाता येण्यायोग्य' व्हायला हवी असेल तर तुम्ही म्हणताय तसा मूड सांभाळलेला चांगला असतो.
(याच संदर्भात आपल्या परीक्षक मंडळात एक संगीतकारही असणार आहेत याची आठवण करून द्यायला हवी.)
जन्मत:
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
हा शेर अप्रतिम. पूर्ण गझल खूपच छान आहे.
माझी जोड:
तू माग कितीही, असेन तेथून देतच राहीन
जीवनातील संदर्भ सर्वच संपले, असे काही नाही !!
अलकाताई,
अलकाताई, तुम्ही लिहीलेल्या ओळी आवडल्या. अर्थ सुंदर आहे.
पण त्या गझलच्या नियमांत बसण्यासाठी त्यांच्यावर अजून थोडे संस्कार करावे लागतील.
हे नियम काय असतात यांची चर्चा आपण या दुव्यांवर करतो आहोत :
http://www.maayboli.com/node/3607
http://www.maayboli.com/node/3623
http://www.maayboli.com/node/3625
शामली,
शामली, गुरुवर्य धन्यवाद.. ग च्या ऐवजी गा का म्हणायचे लक्षात आले..
प्लीज लघु
प्लीज लघु गुरु आणि वुत्त कसे लिहायचे, कसे ओळखायचे तेही लिहा ना... उदाहरणासहीत. कळले तर मीही मग विद्यार्थी होईल ह्या शाळेचा.
गझलेत
गझलेत निसर्ग नसतोच का? निसर्ग येत असलेल्या गझलेची काही उदाहरणं देउ शकाल आपण?
बी,
बी, लघु-गुरु कसे ओळखायचे हे अनेक उदाहरणं देऊन समजावले आहे की.
पूर्ण गझल कार्यशाळा हा ग्रूप आधी शांतपणे वाचून काढ. वर स्वातीनी लिंक्स दिल्या आहेत.
आणि 'निसर्ग' नसतो असे काही नाही, तुम्हाला सुचतील त्या कल्पना लिहू शकता, कोणत्याही विषयावर.. फक्त गजलेच्या मीटरमधे बसणार्या हव्या.
-----------------------------------------------
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!
गझल
गझल पाठवायची अंतिम मुदत काय आहे?
कारण इतके दिवस 'जमीन' सापडत नव्हती.. काल सापडली... आता लिहीतो आहे...
आणि गुर्जी, मलाही सामील करून घ्यावे....
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||
पूनम,
पूनम, धन्यवाद.
बी, तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली ना? कार्यशाळेतले दुवे वाचून पहा. तरीही काही शंका असतील तर आम्ही आहोतच.
आनंदयात्री, २६ तारखेपर्यंत पाठवू शकता. तुमचं नाव नोंदवून घेत आहे.
==
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
kaaryashaalaa08@maayboli.com
कार्यशाळा,
कार्यशाळा, मी इथे येवून रोज वाचतेय. मगच मी तीन शेर पुर्ण करेन. हो पण हे वाचून मला हे कळले ते बरोबर का चूक ते सांगा.
रदीफ म्हणजे the word that we use for our gajhal or the gajhal based on certain theme(I mean express our thoughts) using that word. right? मग तोच शब्द वापरून तुम्हाला आपल्याला काय सांगायचे आहे ते लिहायचे. बरोबर?
पण मला एक प्रश्ण आहे, गझल लिहिताना ही spontaneous नसतेच का कधी? कारण हे सर्व रूल लक्षातच ठेवून मगच गझल लिहिलि जाते का? म्हणजे उदाहरणर्थ, ती एक हिंदी गझल, तुमको देखा तो खयाल आया .. जिंदगी धूप तुम घना साया. हे इतके विचार करून लिहिलेय?
मला वाटले एका सुंदर मुलीला पाहून spontaneous जे वाटले ते लिहीलेय.(मनात एक असाच विचार आला, आमच्यासारखे ढ असे सर्व रुल्स फॉलो करत गझल लिहिपर्यन्त नी देइपर्यन्त तो मुलगा लग्न करून मोकळा होइल दुसर्या मुलीशी. )
कवीला एखादा भाव express करायचा असेल तर तो मग ह्या रुल्स वर बेस्ड असा फेरफार करतो का गझलेत मगच ती गझल म्हणून ठरू शकते का?
सॉर्री हो, खूपच ढ आहे मी ह्या बाबतीत. मी इथे येवून मराठी गझल पण असते हे पहिल्यांदा एकले. नाहीतर मला फक्त जगजीत सिंघच्याच हिंदी गझल माहीती होत्या.
काय करेन ह्या सर्व print काढून नीट तेबलावर बसून समजून घेइन नी matrix च बनवेन की कसा ओळीमध्ये हे असे laptop वर वाचता डोक्यात घूसत नाही.
पण एवढे वाचून ते काफीया प्रकार नीट कळला नाही.(मी ते print out काढतेच नी स्वता लिहून काढल्याशीवाय लक्षाण येणार नाही).
दुसरा प्रश्ण हा की, ते गा ल गा काय आहे नक्की? म्हणके तुम्ही मात्रा explain केल्यात पण ते गा ल गा च रूल कसा follow करायचा? म्हणजे प्रत्येक ओळ मोजायची का कीती मात्रा आहेत नी मग कसे कळणार की ते 'गा ल गा' वर based आहे म्हणून.
इथे बाकीची बरीच हसतील पण मला नाही येत तर नाही येत. पण मी शिकायचा प्रयत्न करतेय.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कधी आवडे चकली, कधी आवडे चिवडा
करंजी मात्र मी कधीच खात नाही
लाडू आवडे मात्र, ते कीतीही खा
बेदाणा हा त्या
मी ना मागे
मी ना मागे जवून सर्व लिन्क्स वाचून 'गा' कुठे म्हणतात नी 'ल' हे समजून घेते. तसे पोस्ट लिहिल्यावर वरचे वाचून जरा जरा समजतेय की गा नी ल काय आहे ते
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
कधी आवडे चकली, कधी आवडे चिवडा
करंजी मात्र मी कधीच खात नाही
लाडू आवडे मात्र, ते कीतीही खा
बेदाणा हा त्या
मी सुरेश
मी सुरेश भट म्हणून टाईप केले youtube मध्ये तर मला ही गझल मिळाली.
http://www.youtube.com/watch?v=wsbmaA7IUBw&feature=related
http://www.youtube.com/watch?v=du1ksIinaGk&feature=related
http://www.youtube.com/watch?v=Ix-N5ZdeRf0
त्या वरच्या क्लीप मध्ये मी ही गझल एकली हिंदी
आप काटोसे बचके चलते है
मैने फुलोसे जख्म खाये है
लोग औरोसे बचके चलते है
मैने अपनेही आजमये है.
एकदम भावले.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कधी आवडे चकली, कधी आवडे चिवडा
करंजी मात्र मी कधीच खात नाही
लाडू आवडे मात्र, ते कीतीही खा
बेदाणा हा त्या
मनस्विनी, क
मनस्विनी,
कारण हे सर्व रूल लक्षातच ठेवून मगच गझल लिहिलि जाते का? >>
'आजही मी लावलेले दार नाही' ह्या लेखन धाग्यात काल मी गझलाची वृत्तबद्धता आणि आशय ह्यावर एक प्रतिसाद दिला आहे. तो जरूर वाचावा. त्यात खालील ओळी आहेत.
नंतर नंतर आपल्या कल्पना वृत्तातच उतरतात असा कसलेल्या गझलकारांचा अनुभव आहे. ह्या दृष्टीने वैभव ने मायबोलीच्या पहिल्या गझल कार्यशाळेत "बोलता बोलता गझल" अशी एक पोष्ट टाकली होती. ती जरूर वाचावी.
~ संयोजक समिती
==
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
kaaryashaalaa08@maayboli.com
लाडू आवडे
लाडू आवडे मात्र, ते कीतीही खा
बेदाणा हा त्या
हा काय प्रकार आहे? पुढे सुचत नाही आहे का?
कधी आवडे चकली, कधी आवडे चिवडा
करंजी मात्र मी कधी, चा़खत नाही
लाडू आवडे मात्र, ते कीतीही लाटा
बेदाणा त्या पंक्तीत कधी, एकटा बसत नाही
पुरणपोळीला लागती नेहमी तुपाच्या धारा
मोदक मात्र सर्वांशीच जमवून घेईल असे मात्र नाही !
(....!!!!)
ही आपली वात्रटिका. पण गझलविषयी तुमच्या विचारांशी मी पूर्ण सहमत आहे, एवढेच नाही, माझ्या मनातलेच लिहिलात, त्याबद्दल धन्यवाद. भावनाना असे बान्धून टाकणे बरे नाही; आपसूकच शब्द खाली उतरले तर ठीकच आहे. नाही का?
>>>> भावनाना
>>>> भावनाना असे बान्धून टाकणे बरे नाही; आपसूकच शब्द खाली उतरले तर ठीकच आहे. नाही का?
अलका,
कविता, गझल लिहीणं हा आनंदाचा भाग असतो. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण काही जणांना आपोआपच वृत्तबद्धच रचना सुचतात.
आपल्या नेहमीच्या बोलण्यातही जो नाद, जी लय असतेच, ती काहींना लगेच जाणवते, काहींना नाही. (मी वर दिलेला 'बोलता बोलता गझल' हा दुवा मुद्दाम वाचा.)
थोड्याश्या प्रयत्नाने ती कोणालाही सहज जाणवू शकते. आणि एकदा जाणवायला लागली की त्यातली गंमत और असते.
एकदा गझल लिहून पाहिली की इतरांच्या गझल 'वाचाव्यात' कश्या, हे ही लक्षात येतं. त्यामागची प्रतिभा, रियाज, अभ्यास हे जास्त चांगल्या प्रकारे समजतं.
या कार्यशाळेतून आपण इतकं जरी शिकलो तरी एका मोठ्या आनंदाचं दालन आपल्यासाठी खुलं होईल त्यामुळे.
मी पूर्वीही सांगितल्याप्रमाणे - आपण कवी मंडळी मुळात शब्दांचे प्रेमी असतो. त्यांचा अर्थ तर कळतोच आपल्याला, थोडं नादाकडेही लक्ष देऊन पहा.
निदान जे मनापासून प्रयत्न करत आहेत, त्यांना उत्तेजन देता आलं नाही, तरी त्यापासून परावृत्त तरी करू नका. त्याने नक्की काय साधतं?
तुम्हाला जर तुमच्या भावना बांधल्या गेल्यासारखं वाटत असेल, तर तुमच्या प्रवेशिकेचं काय करायचं हे इथे लिहीण्याऐवजी आम्हाला मेलवर कळवा.
==
एका जन्माच्या पाठी दुसर्या जन्माची धास्ती
असणेही नश्वर येथे, नसणेही अक्षय नाही
kaaryashaalaa08@maayboli.com
एका
एका जन्माच्या पाठी दुसर्या जन्माची धास्ती
असणेही नश्वर येथे, नसणेही अक्षय नाही
अहा!...
मनु:स्विनी,
मनु:स्विनी,
तुझं उत्तर तूच दिलं आहेस खरंतर.
'तुमको देखा तो ये खयाल आया..' हे spontaneous वाटलं ना ऐकायला? ते ऐकताना ते वृत्तात आहे की नाही, रदीफ काय, काफिया काय हे नाही ना आठवलं?
म्हणजेच नियमांत बसतं म्हणून ते उत्स्फूर्त नसलंच पाहिजे - हा निष्कर्ष चुकीचा आहे की नाही?
==
एका जन्माच्या पाठी दुसर्या जन्माची धास्ती
असणेही नश्वर येथे, नसणेही अक्षय नाही
kaaryashaalaa08@maayboli.com
का. शा, हो
का. शा,
हो हो बरोबर, तुमचे पटले. खरे सांगू खूप अभ्यास आहे हा. त्यामुळे आता नस्ते प्रश्ण विचारायच्या एवजी आधी सर्व वाचून समजावून घेते. पण तुमचे कौतुक ज्यास्त आहे जो तुम्ही वेळ देताय नी करताय ते. आहे खरे interesting पण.
काल जेव्हा मी सुरेश भटांची ती क्लीप एकली रात्री, त्यात काय भाव होते.
रंग माझा वेगळा हे मी नीट पहिल्यांदा एकले. पण एक जाणवले, थोडेसे मुळचे talent असते खरे बाकी जे गझल लिहितात त्यांच्यात असे मला वाटले.
असो, भेटूच इथे.
त. टी: का. शा. = कार्यशाळा
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
का. शा. =
का. शा. = कार्यशाळा
नमस्कार आणि आपला काही गॅरसमज झाला असेल तर क्षमायाचना. कदाचित मला काय म्हणायचे होते, ते थोडेफार तुमच्या उत्तरात आहेच की, जसे की,
"कविता, गझल लिहीणं हा आनंदाचा भाग असतो. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण काही जणांना आपोआपच वृत्तबद्धच रचना सुचतात.
आपल्या नेहमीच्या बोलण्यातही जो नाद, जी लय असतेच, ती काहींना लगेच जाणवते, काहींना नाही. (मी वर दिलेला 'बोलता बोलता गझल' हा दुवा मुद्दाम वाचा.)
थोड्याश्या प्रयत्नाने ती कोणालाही सहज जाणवू शकते. आणि एकदा जाणवायला लागली की त्यातली गंमत और असते."
त्यामुळेच मला वाटते की एकदा वृत्त्बध्द रचना अवतरली, की ती गझल काय, कविता काय, रचना आहे, हे महत्वाचे; परन्तू माझा या बाबतीतला अभ्यास अल्पही नाहि, ही वस्तुस्थिती आहे; आवड आहे, जाण आहे आणि मन थोडेफार संवेदनाशील आहे, एवढेच. मी जेव्हा केव्हा जोड दिली आहे, त्यात सुचनेचा जराही हेतू नसून, सहभागी झाल्याचे आदान्-प्रदान आहे. क्षमस्व.
मस्तच!!!! आज
मस्तच!!!!
आज पर्यन्त ज्या खजन्याच्या शोधात होतो तो खजाना मला मायबोलीचे सदस्यत्व मिळाल्याननतर मिळाला.
दोस्त हो दुनियेस धोका मेलो तरी आम्हि दिला,जाउनिया नर्कात पत्ता कैलासाचा आम्हि दिला,हाय हे वास्तव्य आमुचे सर्वान्स कळाले शेवटी सारेच हे सन्न्मित्र आमुचे येथेच आले शेवटी.
-भाऊसाब पाटणकर्(मैफील)