Submitted by पुरंदरे शशांक on 16 July, 2012 - 23:15
मुंगळा डोंगळा कित्ती कित्ती काळा
भर्भर घरभर कुठे बाबा चाल्ला ?
काटकीसारखे पाय तुझे कित्ती कित्ती नाजुकसे
एवढे सारखे चालून चालून दुखत नाहीत ते कसे?
इकडेतिकडे बघतोस काय, खाऊ हवा केव्हढा ?
बारीकसा कण जरी ओढतोस जणू रणगाडा
कधी कसा शिस्तीत रांगेत बरा अस्तोस
आज कसा एकटाच घरभर उनाडतोस
भांडलास वाटंत मित्रांशी, गट्टी फू त्यांच्याशी ??
घेऊन जा साखरदाणे, कर बट्टी दोस्तांशी .......
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
शशांक.. खूपच गोड आहे ही कविता
शशांक.. खूपच गोड आहे ही कविता सुद्धा.. तुझ्या कवितांचं पुस्तक पब्लिश झालंय का???
म्हंजे तुझ्या अश्या अनेक गोडगोड कविता एकत्र संग्रही ठेवता येतील..
गोड!.. मस्त!
गोड!.. मस्त!
अय्यो, कसली गोड ! शशांक, सगळे
अय्यो, कसली गोड !
शशांक, सगळे सांगताहेत. ते बालकवितांच्या पुस्तकांचं जरा घ्याच बरं मनावर.
'ते बालकवितांच्या पुस्तकांचं
'ते बालकवितांच्या पुस्तकांचं जरा घ्याच बरं मनावर.' -------- एकदम बरोबर आहे....... खरच....... तुमच बाल कविता असलेल एक पुस्तक असायलाच हव........................
ही पण कविता खूप छान आहे............
गोड्.......गोड ........ गोड
गोड्.......गोड ........ गोड कविता.......
साखरदाण्याइतकी गोड !
साखरदाण्याइतकी गोड !
छान कविता. नातवाला शिकविन.
छान कविता. नातवाला शिकविन.
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार.........
कित्ती गोड! माझा लेक लहान
कित्ती गोड!
माझा लेक लहान असताना एकदा मुंगळ्यांची एक मोठी रांग अगदी शिस्तीत चालली होती. तर हा म्हणतो," आई बघ सगळे मुंगळे ट्रीपला चाललेत."
खूप छान ! आवडली !
खूप छान ! आवडली !
छान आहे कविता ! माझी
छान आहे कविता !
माझी बोबडगुंडी लेक त्याला घुमळा म्हणते