देऊळ
बालपणीच्या आठवांचे,
देऊळ होते विठुरायाचे.
शीतल सरितेच्या तीरावरचे,
जणू मांगल्याची प्रतिमा भासे.
देऊळाच्या सभोवताली,
आम्रतरू अन वनराई .
सारवलेल्या अंगणातुनी,
सडा रांगोळी रोजच होई
एकतारीच्या सुरा मधुनी,
विठ्ठल गीते कुणी गाई.
भक्त जनांचा थवा भजनातूनी ,
तिन्ही त्रिकाळ रंगुनी राही .
कधी पथिक येउनी तेथे ,
विसावा घेती खांबाशी.
तर कोणी मनोगत अपुले,
सांगे विठोबा रखु मायेशी
पण आज , न तेथे उरले,
जुने देऊळ वा राऊळ ते .
कुणा धनिकाने रूप तयाचे,
पालटविले देवालया ' ते
जुने खांब जाऊनी तेथे,
रत्नजडीत खांब आले .
मिणमिणते जाऊनी काजवे,
लखलखित दिपमाळा चमके .
नक्षीदार गोपुर तयाचे ,
कळस , अन वर ध्वजा शोभे
देवालयाची शान पाहुनी,
मन क्षणभर हर्षुनी गेले .
पण एकच खंत मनात राहे,
शीतल सरितेच्या तीरावरचे ,
' ते ' न , वदता "विठ्ठल " नामे ,
प्रचलित झाले "धनिक " नावें .
देऊळ
Submitted by वैशाली अ वर्तक on 16 July, 2012 - 05:34
गुलमोहर:
शेअर करा
वैशालीजी आपली खंत योग्य
वैशालीजी आपली खंत योग्य आहे.
सुंदर कविता.
अगदी मनाला भिडणारी कविता.
अगदी मनाला भिडणारी कविता.
vibhagraj ,bharti dhanyvad
vibhagraj ,bharti dhanyvad
छानच आहे कविता, कैक वर्षे
छानच आहे कविता,
कैक वर्षे झालीत अशी देवळे पाहुन, आताशा जास्त दिसत नाहीच अशी देवळे.
सुंदर निर्मिती . . . .
धन्यवाद परब्रम्हजी,
धन्यवाद परब्रम्हजी,
छान.
छान.
धन्यवाद अनघाजी,
धन्यवाद अनघाजी,