Submitted by नानुभाऊ on 9 July, 2012 - 13:46
तू दिलेले प्रेम म्हणजे भास होता शेवटी !
छानशी सुरवात आणी त्रास होता शेवटी !
तू दिलेला हा दुरावा आपलासा वाटला
तोच केवळ एक माझा खास होता शेवटी !
तू दिलेली साथ सुटली..आजही नाही पटत
बोललो नव्हतो तरी विश्वास होता शेवटी !
तू दिलेले पत्रही हमखास गंधाळायचे
अक्षरांना वेदनेचा वास होता शेवटी !
तू दिलेले गीत मी गातो अताशा एकटा
द्वंद्वगीताचाच तो आभास होता शेवटी !
तू दिलेल्या आठवांना आजही सांभाळतो
गुंतला प्रत्येक माझा श्वास होता शेवटी !
तू दिलेला शब्द होता तूच नाही पाळला
तो तुझा त्रागा विनासायास होता..शेवटी!
तू दिलेले सर्व काही तू म्हणावे 'आपले'
हीच वेडी आस, माझा ध्यास होता शेवटी !
- नानुभाऊ
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मयुरेश.. धन्स रे
मयुरेश.. धन्स रे
व्वा नानुभाऊ....दमदार!
व्वा नानुभाऊ....दमदार!
धन्यवाद कणखरजी
धन्यवाद कणखरजी
Pages