तू दिलेले.....

Submitted by नानुभाऊ on 9 July, 2012 - 13:46

तू दिलेले प्रेम म्हणजे भास होता शेवटी !
छानशी सुरवात आणी त्रास होता शेवटी !

तू दिलेला हा दुरावा आपलासा वाटला
तोच केवळ एक माझा खास होता शेवटी !

तू दिलेली साथ सुटली..आजही नाही पटत
बोललो नव्हतो तरी विश्वास होता शेवटी !

तू दिलेले पत्रही हमखास गंधाळायचे
अक्षरांना वेदनेचा वास होता शेवटी !

तू दिलेले गीत मी गातो अताशा एकटा
द्वंद्वगीताचाच तो आभास होता शेवटी !

तू दिलेल्या आठवांना आजही सांभाळतो
गुंतला प्रत्येक माझा श्वास होता शेवटी !

तू दिलेला शब्द होता तूच नाही पाळला
तो तुझा त्रागा विनासायास होता..शेवटी!

तू दिलेले सर्व काही तू म्हणावे 'आपले'
हीच वेडी आस, माझा ध्यास होता शेवटी !

- नानुभाऊ

गुलमोहर: 

आवडलीच Happy

तु दिलेले प्रेम म्हणजे भास होता शेवटी
छानशी सुरवात आणि त्रास होता शेवटी !
>>>> वाह!

तु दिलेला हा दुरावा आपलासा वाटतो
तोच आता एक माझा खास होता शेवटी !
>>
हा प्रचंड आवडला Happy

तु दिलेले पत्र ते हमखास गंधाळायचे
अक्षरांना वेदनेचा वास होता शेवटी !
>>>
वा!

तु दिलेले सर्व काही तु म्हणावे 'आपले'
हीच वेडी आस, माझा ध्यास होता शेवटी !
>>>
मस्त

तु दिलेले प्रेम म्हणजे भास होता शेवटी
छानशी सुरवात आणी त्रास होता शेवटी !

तु दिलेले गीत मी गातो अताशा एकटा
द्वंद्वगीताचाच तो आभास होता शेवटी !>>> वा

तु दिलेला हा दुरावा आपलासा वाटतो>> वाट'ला'
तोच केवळ एक माझा खास होता शेवटी !

तु दिलेली साथ सुटली?..आजही नाही पटत>>> प्रश्नचिन्ह त्यागा - टिंबे मात्र तशीच
बोललो नव्हतो तरी विश्वास होता शेवटी ! ( वाटला विश्वास हा विश्वास होता शेवटी) Happy

तु दिलेले पत्र ते हमखास गंधाळायचे>>> 'पत्रही'
अक्षरांना वेदनेचा वास होता शेवटी !>>> व्व्वा व्वा

तु दिलेल्या आठवांना आजही सांभाळतो>>> आपल्या त्या आठवांचा श्वास घेतो आजही
गुंतला प्रत्येक माझा श्वास होता शेवटी !>>> वा

तु दिलेला शब्द होता तूच नाही पाळला>>> तू दिलेला शब्द तू केव्हाच नाही पाळणे
तो तुझा त्रागा विनासायास होता..शेवटी!>>> व्व्वा व्व्वा व्वा अप्रतीम

तु दिलेले सर्व काही तु म्हणावे 'आपले'
हीच वेडी आस, माझा ध्यास होता शेवटी !>>> हम्म्म्म

शुभेच्चा

सुचवण्यांबाबत लहान तोंडी मोठा घास - कृ गै न

-'बेफिकीर'!

मनःपुर्वक धन्यवाद बेफिजी.... Happy

सुचवण्यांबाबत लहान तोंडी मोठा घास - कृ गै न >>. का उगि टींगल करता गरीबाची Happy

बदल केले आहेत.. पुनःश्च धन्यवाद... Happy

छान गझल ... मतला विशेष आवडला

तु दिलेली साथ सुटली..आजही नाही पटत
टाकला विश्वास पण विश्वास होता शेवटी !...... क्या ब्बात क्या ब्बात..... बेफि आणि मी स्वतःच आनंदून घेत आहोत असे समजावे Happy

पु.ले.शु!!!

धन्यवाद शामजी Happy
तुम्हा दोघांचाही दुसर्या ओळी मस्त आहेत मुळ ओळी पेक्षाही.. खरच क्या बात! Happy
असेच मार्गदर्शन करत रहावे... लोभ आहेच तो व्रुद्धींगत व्हावा! Happy

योगुली धन्स Happy

तु दिलेला हा दुरावा आपलासा वाटला
तोच केवळ एक माझा खास होता शेवटी !

तु दिलेले गीत मी गातो अताशा एकटा
द्वंद्वगीताचाच तो आभास होता शेवटी !

>>>> हे विशेष करुन आवडले. Happy

अजुन येउदे.

तु दिलेला हा दुरावा आपलासा वाटला
तोच केवळ एक माझा खास होता शेवटी !

तु दिलेली साथ सुटली..आजही नाही पटत
बोललो नव्हतो तरी विश्वास होता शेवटी !

तु दिलेले पत्रही हमखास गंधाळायचे
अक्षरांना वेदनेचा वास होता शेवटी !

तु दिलेले गीत मी गातो अताशा एकटा
द्वंद्वगीताचाच तो आभास होता शेवटी !

तु दिलेला शब्द होता तूच नाही पाळला
तो तुझा त्रागा विनासायास होता..शेवटी!

तु दिलेले सर्व काही तु म्हणावे 'आपले'
हीच वेडी आस, माझा ध्यास होता शेवटी !

>>> पहिल्याच प्रयत्नात अपेक्षा वाढवल्या आहेस केतन!! Happy

बादवे, प्रत्येक शेराच्या सुरूवातीचा 'तू' र्‍हस्व का आहे?? तो तू असाच हवाय ना?

बादवे, प्रत्येक शेराच्या सुरूवातीचा 'तू' र्‍हस्व का आहे?? तो तू असाच हवाय ना?
>>
तो तू असाच हवा.. एडीटतो
>>

Angry काल तुला किती वेळा मी हेच सांगितलं होत तर ऐकलं नाही Angry
मला गझलेतलं काही कळत नाही तरी एक प्रश्न
तु च तू केल्यावर मात्रा बदलणार नाहीत का?
र्हस्व च दिर्घ अस काही? Uhoh

नानुभाऊ : मस्तच बरका आम्हीतर बुवा तुमचे फॅन झालो अगदी

रिया:मात्रा बदलतील मान्य!.... पण नानूने निवडलेल्या वृत्तासाठी 'तू' असेच हवे.
भाषिक अंगाने विचार करताही 'तू' असेच बरोबर आहे .

धन्स मयुरी Happy

वैवकु : स्पेशल धन्स.. मात्रांचं गणित अजुन नाही सोडवता येत हो Sad

जमावं हळुहळु... मार्गदर्शन राहुदे.... Happy

===============
अवांतर:
रिया:मात्रा बदलतील मान्य!.... >>> बाकी तुमचा प्रतिसादात कोणाचातरी स्पष्ट प्रभाव जाणवतोय हो... फक्त बोल्ड करायचं राहिलं बहुधा! Wink

नानु... मस्तच रे....
छान गझल... Happy

तू दिलेला हा दुरावा आपलासा वाटला
तोच केवळ एक माझा खास होता शेवटी !>>> व्वा...!

Happy

तू दिलेले पत्रही हमखास गंधाळायचे
अक्षरांना वेदनेचा वास होता शेवटी !

मतला आणि हा शेर आवडला. गझल छान!!!

नानू जोमदार मतला आणी जोरदार सुरवात ... मस्त झक्कासचकी राव
(नाव छोटे लक्षण मोठे ) नानू तुझा भाव वधारणार भाऊ

Pages