
करायला अगदी सोप्पा असा हा केक कालच करुन पाहिलाय
हा मी तव्यावर केला होता.. मस्त झाला!
साहित्य: हाईड अँड सिक बिस्किटांचे दोन मध्यम पुडे, पारले जी बिस्किटांचा चा साधा एक पुडा,आठ चमचे साखर, दीड कप दूध, खाण्याचा सोडा किंवा कोणाताही फ्लेवर नसणारा इनो फ्रुट सॉल्ट्चा एक छोटा(४ रु.) चा सॅशे.
कृती: हाईड & सिक ची अणि पारले जी ची बिक्सिटे एकत्र करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्यावित.
आठ चमचे साखर घालून मिक्स करावीत आणि इनो सॉल्ट त्यावर टाकावे. खाण्याचा सोडा असेल तर तो चहाचा एक चमचा अथवा पोह्यांचा अर्धा चमचा या प्रमाणात टाकावा. त्या नंतर दूध घालत हळूहळू हाताने ढवळावे. बिस्किटात चॉकलेट असल्याने हे मिश्रण जरा चिकट होते. खूप वेळ ढवळू नये. इनोचे मिश्रण थोडेसे फसफसते.(खूप नाही)
केकच्या भांड्याला आतून तूप लावून हे मिश्रण तव्यावर ठेऊन अर्धा तास गॅसवर अगदी मंद आचेवर ठेवावे. अगदी छान स्पाँजी चॉकलेट केक तयार होतो.
मस्त आहे रेसिपी .करायला सोपा
मस्त आहे रेसिपी .करायला सोपा आहे केक, नक्की करेन .सगळ्यांचे फोटो पण मस्त एकदम् तोंपासु .
दुसर्यांदा काल केला हा केक.
दुसर्यांदा काल केला हा केक. बिस्किटांच्या चुर्यात दूध घालून ढवळत असताना सुटलेल्या वासानेच ५० कॅलरीज वाढल्या. मायक्रोवेव्हमध्ये अगदी एकेक मिनिटाचे टाइम लावून चेक केले (कारण याआधी मावेत केला होता तेव्हा जास्त शिजल्याने हार्ड झाला होता आणि आताच्या नव्या मावेच्या पॉवर सेटिंगचा नीट अंदाज आलेला नाही)
चार मिनिटांनंतर मस्त स्पाँजी दिसत होता पण ड्रायही होता. कापला तेव्हा खूपच भुसभुशीत झाल्यासारखे अखंड तुकडे(!) पडले नाहीत, भुगा होत होता. पण आता सकाळी पाहिला तर मस्त हवा तसा मॉइस्ट व हवा तसा फर्म झालाय. कापायची घाई केली नाहीतर फोटू काढता आला असता.
हा मी केलेला केक. एकदम मस्त
हा मी केलेला केक. एकदम मस्त झाला होता. धन्यवाद के अंजली
लतांकूर छान दिसतोय केक. भरतजी
लतांकूर छान दिसतोय केक. भरतजी फोटो हवा होता.
सिनी करुन बघा केक लवकर.
करुन पाहीला.. मस्त झाला.. आणि
करुन पाहीला.. मस्त झाला.. आणि लगेचच संपला देखिल..
धन्यवाद .. के अंजली ..
Dear k. Anjali, माझी हि
Dear k. Anjali,
माझी हि पहिलिच पोस्ट आहे.
केक करुन पाहिला.
मस्त झाला. घरि सगळ्यान्ना आवड्ला.
Thanks for easy receipe.
majhya nandekadun farmaish ahe tichya bday la aslach cake banvaycha ahe.
Thanks again.
आज पुन्हा भावाच्या वादि
आज पुन्हा भावाच्या वादि निमित्त मावेमध्ये हा केक केला. पण डिमोल्ड करताना टुटला
थोडा भुसभुशित झाला आहे, पुन्हा आकारात येत नव्हता. कसातरी आकारात आणुन नीट सेट होण्यासाठी वरुन चॉकलेट सिरप घातले आहे.
आईकडे केक घेऊन जाईपर्यंत भाऊ कामाला गेला होता तर आता मी हा केक संध्याकाळ्पर्यंत बाहेरच ठेऊ की फ्रिजमधे?
गेल्यावेळेस फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे दाताला चिकटत होता पण बाहेर ठेवल्यास खराब नाही ना होणार किंवा कापताना चुरा नाही ना होणार?
प्लीज लवकर सांगा आईला निरोप द्यायचा आहे. सध्या केक गरम आहे म्हणुन तिने बाहेर ठेवलाय, थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवणार आहे.
(No subject)
करुन पाहिन नक्की.
करुन पाहिन नक्की.
निल्सन बाहेर केक ठेवलात तर
निल्सन बाहेर केक ठेवलात तर लगेच खराब होणार नाही. ठेवलात तरी चालेल.
संपूर्णा... धन्यवाद
सुटसुटीत आणि खरच सोप्पा..मी
सुटसुटीत आणि खरच सोप्पा..मी बर्बन आणि पार्लेजी चा अवन मधे केला. अगदी २० मिनिटात मॉइस्ट केक तयार. मी आजिबात साखर टाकली नाही. बिस्किटांची साखर पुरली.

धन्यवाद अंजली.
मस्त रेसिपि. नक्की करुन
मस्त रेसिपि. नक्की करुन पाहिन.
मस्त दिसतोय केक , ट्युलिप !
मस्त दिसतोय केक , ट्युलिप !
व्वा! मस्त केक ट्युलिप!
व्वा! मस्त केक ट्युलिप!
हा चवीला खरेच चांगला लागतो का
हा चवीला खरेच चांगला लागतो का बाहेरच्या चॉकलेट केकसारखा?
की नुसता भुसभुशीत गोड मिट्ट? ते बिस्किटांचे मिश्रण इतके चांगले लागते?
मला डार्क चॉकलेट केक खूपच आवडतो. पण अपेक्षाभंग नको म्हणून हा केला नाहीये.
ट्युलिप, तुम्ही डीटेल मध्ये
ट्युलिप,
तुम्ही डीटेल मध्ये सांगाल का की बर्बन्चे किती बिस्किटे घ्यायची?
आणि स्टेप ने रेसीपी लिहाल का ज्याने असे वेरीएशन केलेय?( बर्बन किंवा ओरीओ वापरून)
मला नक्की प्रमाण हवेय.
घरी बर्बन आणि ऑरीओ दोन्हीचे पुडे आहेत पडून. किती साईजची दोन पुडे ते नीट लिहा. दोन पॅकेट्स काय साईजचे? किंवा टोटल किते बिस्किटे?
प्लीज लिहा कोणीतरी!
धन्यवाद.
डॅफोडिल्स, तुमची पण नीट कृती
डॅफोडिल्स,
तुमची पण नीट कृती लिहा ना..
तुमचा केक छान लुशियस दिसतोय.
मी पार्लेजी चा १.९९ oz चा एक
मी पार्लेजी चा १.९९ oz चा एक पुडा आणि बर्बन चे ७ oz चे २ पुडे घेतलेले(-१ बिस्कट, जे पोटात गेले). दोन्ही बिस्किटे एकत्र करुन मिक्सरमधून बारीक केली.(बर्बन क्रीम सहित). इनो अगदी छोटा पुडा असतो तो सगळा टाकला या मिश्रणात. मग दूध टाकले, दुधाचे प्रमाण असे नाही, इडली पिठसारखी कन्सिस्टेन्सी केली. मग डॅफोडिल्स ने
लिहील्याप्रमाणे ३२५ फॅ. ला २० मिनिटे बेक केले. अगदी मऊसूत केक तयार. ४ तासांनी सुद्धा तेवढाच मऊ होता.साखर आजिबात नाही टाकली, बिस्किटांची साखर पुरली. शिवाय चॉकलेट सीरप(चोकोलेट वितळवुन टाकलेले) असल्यामुळेही असेल, आजिबात फिका वाटला नाही.
त्याआधी मी हा केक एकदा मावे मधे केलेला, पण तो थोडा वेळाने कडक झाला होता. अवन मधे पर्फेक्ट झाला.
तुमच्याकडे बिस्किटं औंसात
तुमच्याकडे बिस्किटं औंसात मिळतात का? आता हे ग्रामात करावे लागेल ना!
धन्यवाद ट्युलिप
धन्यवाद ट्युलिप
केक छान दिसतोय. करुन पाहिन
केक छान दिसतोय. करुन पाहिन नक्की.
अंजली तुला मनापासुन खूप खूप
अंजली तुला मनापासुन खूप खूप धन्यवाद. आजच हा केक केला. अगदी १० मिनीटात मिश्रण बनवणे ते केक मावेत भाजणे ही प्रक्रीया झाली. मुलीला शाळेसाठी टिफीन मध्ये दिल्याने मुलगी प्रचंड खुश. तुला तिने थॅन्क्स कळवलेत. वरती ज्यांनी मावे चा उपयोग करुन इथे लिहीले आहे त्यांना सर्व मुलींना पण थॅन्क्स. मावेत हाय पॉवर वर ४ मिनीटात झाला. माझा IFB चा कन्व्हेक्शन आहे.
मी हाईड आणी सिक ची २० बिस्कीटे आणी पार्ले जीची १५ बिस्कीटे घेतली. वर लिहील्याप्रमाणे १ चहाचा कप दूध घेतले. साखर अडिच चमचे घेतल्याने किंचीत अगोड झाला तरी चवीला मस्त होता. त्यात वरचे प्लेन इनो घातले. सोडा वा बेपा वापरली नाही. वेळ नसल्याने फोटो काढला नाही. पुढच्या वेळी नक्की काढेन. परत एकदा धन्यवाद गं!
रश्मी
रश्मी
पुढल्या वेळेला फोटो नक्की टाक. साखरेचे प्रमाण थोडे वाढवायला लागेल. मग आपल्याला हवा तसा गोड होतो,
(No subject)
Dearest K Anjali
I made the cake twice as per your recipe on Myboli. It was amazing. When I saw the cake after 30 mnts my joy got no boundaries. It was spongy and chocolaty. The confidence I have gain by your receipe has no words to explain. Thank you is just a small word for you . It is much more than Thank you. Thank you very much to you and my other Mybolikar Sakhya
रविवारी हा केक केला होता.
रविवारी हा केक केला होता. फोटो काढलेला, पण डिलीट झाला. आतापर्यंतच्या चार प्रयत्नांतला हा पर्फेक्ट जमलेला, म्हणून प्रमाण नोंदवून ठेवतोय.
पुड्याचा आकार, किंमत या गोंधळातून वाट शोधण्यासाठी सगळा धागा पुन्हा वाचण्याऐवजी गुगल केलं.
१५ पार्ले जी बिस्किटं आणि १२ हाइड & सीक बिस्किटं घेतली.
(हाइड & सीक बिस्किटांचा आकार (शेप)बदललाय का माहीत नाही, पण मला मिळालेली बिस्किटं उशीच्या आकाराची होती. आणि दोन पुड्यांत मिळून १२च होती. ती सगळी घेतली. गुगल करून मिळालेलं प्रमाणात १५: १५)
एक कप दूध @रूम टेंपरेचर , २ टेस्पू पिठीसाखर, एक सॅशे इनो.
ग्रीज केलेल्या भांड्यात पाच मिनिटे फुल पॉवरवर मायक्रोवेव्ह.
पूर्ण गार झाल्यावरच सुरी चालवायची.
> हाइड & सीक बिस्किटांचा आकार
> हाइड & सीक बिस्किटांचा आकार (शेप)बदललाय का माहीत नाही, पण मला मिळालेली बिस्किटं उशीच्या आकाराची होती. आणि दोन पुड्यांत मिळून १२च होती. ती सगळी घेतली. > चॉको रोल आणला असेल. https://m.indiamart.com/proddetail.php?i=13356866333 . बिस्कीट पूर्वीसारखीच आहेत. हे नवीन प्रोडक्ट आहे. प्रत्येक रोलसाठी एकेक सेपरेट पॅकिंग असते.
नाही. प्रत्येक रोलसाठी वेगळे
हं तीच असतील. पण प्रत्येक रोलसाठी वेगळे पॅकिंग नव्हते. एका पुड्यात सहा बिस्किटे होती. ते वेगवेगळं पॅकिंगवालं पण खाल्लंय. त्याचंच पॅकिग बदललंही असेल, कारण यातलं एकही बिस्किट खाल्ल नाही, सगळी केकयज्ञात स्वाहा केली.
वॉव सगळ्यांचे केक्स yummy
वॉव सगळ्यांचे केक्स yummy दिसत आहेत माझा १ प्रश्न आहे माझ्याकडे cake चे ते पातळ भांडे आहे ते डायरेक्ट तव्यावर अर्ध्या तास ठेवले तर कामातून नाही जाणार का? मी असा केक same रेसिपी ने कूकर मध्ये केला होता पण मॉइस्ट झाला होता.
काय मस्त दिसतायत सगळे केक.
काय मस्त दिसतायत सगळे केक.
Pages