
करायला अगदी सोप्पा असा हा केक कालच करुन पाहिलाय
हा मी तव्यावर केला होता.. मस्त झाला!
साहित्य: हाईड अँड सिक बिस्किटांचे दोन मध्यम पुडे, पारले जी बिस्किटांचा चा साधा एक पुडा,आठ चमचे साखर, दीड कप दूध, खाण्याचा सोडा किंवा कोणाताही फ्लेवर नसणारा इनो फ्रुट सॉल्ट्चा एक छोटा(४ रु.) चा सॅशे.
कृती: हाईड & सिक ची अणि पारले जी ची बिक्सिटे एकत्र करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्यावित.
आठ चमचे साखर घालून मिक्स करावीत आणि इनो सॉल्ट त्यावर टाकावे. खाण्याचा सोडा असेल तर तो चहाचा एक चमचा अथवा पोह्यांचा अर्धा चमचा या प्रमाणात टाकावा. त्या नंतर दूध घालत हळूहळू हाताने ढवळावे. बिस्किटात चॉकलेट असल्याने हे मिश्रण जरा चिकट होते. खूप वेळ ढवळू नये. इनोचे मिश्रण थोडेसे फसफसते.(खूप नाही)
केकच्या भांड्याला आतून तूप लावून हे मिश्रण तव्यावर ठेऊन अर्धा तास गॅसवर अगदी मंद आचेवर ठेवावे. अगदी छान स्पाँजी चॉकलेट केक तयार होतो.
अरे वा.. करायला एकदमच सोपा
अरे वा.. करायला एकदमच सोपा दिसतोय.. करुन बघनार.. पन केक च भांडं नसेल तर..?
कृपया पाकृ ला सोप्या असं
कृपया पाकृ ला सोप्या असं विशेषण जोडु नये.. करुन बघायचा मोह होतो.. अन प्रयोग फसला की जगात काहिही सोपं नसतं याचा प्रत्यय येतो.
एकदा हा प्रयत्न फसलेला आहे..
दुध मोजायच्या कपाची साइज?? मिश्रणाची कन्सिस्टन्सी किती पाहिजे हे न कळणे.. इ. प्रकार मी केलेला प्रयोग फसायला कारणीभुत झाले होते.. तसही वर्षुच्या पुडिंगच्या सोप्प्या पाकृ नंतर कोणतीही सोप्पी पाकृ परत करायचा प्रयत्न केलेला नाहिये.. या पाकृ मुळे पुन्हा एकदा मोह होतोय हे नक्की
पण असा केक छान होतो हे नक्की (मैत्रिणीच्या आईची कृपा)..
दिपाली मलाही तो प्रश्न
दिपाली मलाही तो प्रश्न पडलेला. मग जाऊन घेऊनच आले केकच भांडं. त्यात चांगला होतो केक.
करुन पाहाच गं! कप म्हणजे नेहेमीचा चहाचा . मोठ्ठा मग नाही!
चिमुरे
सोप्पाच वाटेल तुला केक.
कृपया पाकृ ला सोप्या असं
कृपया पाकृ ला सोप्या असं विशेषण जोडु नये.. करुन बघायचा मोह होतो.. अन प्रयोग फसला की जगात काहिही सोपं नसतं याचा प्रत्यय येतो. >> +१०००
मी रूनी पॉटरने लिहिलेलं लेमन तिरामिसु सोप्पं वाटतंय म्हणून करून पाहिलं, पण फसलंच
अशा अनेक निष्फळ प्रयोगांमुळे पाकृ कौशल्यातील माझ्या आत्मविश्वासाला प्रचंड तडा गेलेला आहे....
पण के अंजली, ही पाकृ करून पाहीन. सोप्पी वाटतेय. धन्यवाद.
अरे वा..वाचून खुपच मस्तं
अरे वा..वाचून खुपच मस्तं वाटतयं. लिहील्याप्रमाणेच सोप्पा असेल असं दिसतंय तरी
करुन बघायचा मोह होतोय.
केकच्या भांड्याला आतून तूप
केकच्या भांड्याला आतून तूप लावून हे मिश्रण तव्यावर ठेऊन अर्धा तास गॅसवर अगदी मंद आचेवर ठेवावे. अगदी छान स्पाँजी चॉकलेट केक तयार होतो...>>>> केक तळाला लागुन चिकटणार नाही का? आणि मायक्रोव्हेव मध्ये पण करता येईल ना.
स्नेहश्री.. मंद गॅसवर
स्नेहश्री..
मंद गॅसवर केल्याने शक्यतो चिकटत नाही पण अर्ध्या तासाने सुरीने झाला आहे की नाही ते पहावे आणि गॅस बंद करावा. मायक्रो मध्ये मी केला नाही पण होईल असे वाटतेय.
झाकण ठेवायचे नाही ना?
झाकण ठेवायचे नाही ना?
दीपाली केकचं भांड नसेल तर
दीपाली
केकचं भांड नसेल तर Flat Bottom च्या कढईत करुन बघ. छान होतो.
प्रितीभुषण
मला वाटतं झाकण ठेवावं लागतं, मी तरी ठेवते थोडा वेळ सुरुवातीला.
मी गुरुवारी करुन पाहिला खुपच
मी गुरुवारी करुन पाहिला खुपच छान झाला होता.
प्रीती.. झाकण ठेवावे लागतेच.
प्रीती.. झाकण ठेवावे लागतेच. पण साधारण १५ मिनिटांनी ते उघडून दुसरे टाकावे कारण त्याला आतून खूपच बाष्प जमा होते.
धन्यवाद!
रुणुने केला की नाही अजून?
श्रद्धा, माधवी आणि अन्कुरी
मायक्रोव्हेव मध्ये पण करता
मायक्रोव्हेव मध्ये पण करता येईल ना. >> हो.. मी नेहमी मावेतच करते हा केक.. मस्त होतो..
मस्त होतो मि केल आहे हा परवा
मस्त होतो मि केल आहे हा परवा सुंदर झाला
अरे वा मस्तच करुन बघावाच
अरे वा मस्तच करुन बघावाच लागेल
अंजू, केकचे भांडे म्हणजे
अंजू, केकचे भांडे म्हणजे काय?
ते नसल्यास, तव्यावर इतर कुठले पातेले/ भांडे चालेल?
सुरूवातीलाच झाकण ठेऊन १५ मिनी ने ते बदलावे, करेक्ट?
(करून पाहण्याचा मोह झाला, म्हणून इतके प्रश्न
)
केकच्या भांड्याएवजी कुकर चे
केकच्या भांड्याएवजी कुकर चे भांडे चालेल का?
किंवा इड्ली स्टीमर चालेल का?
बागेश्री... केकचे भांडे
बागेश्री... केकचे भांडे मागितल्यावर अॅल्युमिनियमचे भांडे मला दुकानदाराने दिले. पातळसेच आहे ते. आणि त्यातच छान झाला केक त्यामुळे मावेमध्ये करायचे अजून धाडस केले नाही

ते नसले तर कुकरचे अॅल्युमिनियमचेच भांडे चालेल. पण ते बहुदा जाड असते. पण स्टीलचे नको घेऊस.
आणि हो झाकण बदलावेच नाहीतर ते पाणी केकवर पडून केक ओलसर होतो. नक्की करून सांग मला
आर.एस्.टी. ईडली स्टीमर नका वापरु कारण त्याला खालून पण स्टीम लागेल, मग केक फुलून येणार नाही.. पण कुकरचे अॅल्युमिनियमचे भांडे चालेल.
मेधा, आर्या, स्मितू धन्स..
करेन मी. फोटु?
करेन मी.
फोटु?
करुन पाहिन नक्की. ़
करुन पाहिन नक्की. ़
आज हा केक करून पाहायचा होता
आज हा केक करून पाहायचा होता म्हणून रेसिपी उघडली.....पण भांड्याचं नवीनच कळलं...अॅल्युमिनियमचे भांडे नाहीये माझ्याकडे. मी कुकरच्या भांड्यात (स्टीलच्या) करणार होते. मावे बिघडलाय.
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने
जाड बुडाचं असेल तर स्टीलचं
जाड बुडाचं असेल तर स्टीलचं भांडही चालेल.
केला केला. मावेमधे केला.
केला केला. मावेमधे केला. ०.५ मिनिट मिक्सर ०.५ मिनिट दुध व सोड मिसळणे व ४ मिनिट मावे असे ५ मिनिटात गरम गरम केक तयार. मस्त. मउ, स्पाँजी, आहाहा.
साखर अजुन चालली असती असेल मला तरी वाटले. पण छानच झाला होता.
रुणू जाड बुडाचं असेल तर बघ
रुणू
जाड बुडाचं असेल तर बघ करुन स्टीलच्या भांड्यात..
आश, अंजली, मंजूडी,मोनालीप धन्स..
सोप्पा सोप्पा म्ह्णुन फोटो
सोप्पा सोप्पा म्ह्णुन फोटो कुणिच टाकत नाहीये
जमला बरं का. छान स्पॉन्जी
जमला बरं का. छान स्पॉन्जी झाला आहे. माझा विश्वासच बसत नाहीये
हा फोटु.
वरून आयसिंग करणार असू तर एवढी साखर पुरेशी आहे. नुसता खायचा असेल तर आम्हाला अजून साखर लागेल.
खर्याखुर्या सोप्या केकबद्दल धन्यवाद अंजली.
खुप छान प्रकार दिसतोय हा !
खुप छान प्रकार दिसतोय हा !
मस्तच दिसतोय गं रुणुझुणू....
मस्तच दिसतोय गं रुणुझुणू....:) शॉलिट..
वाsss!! मस्तच गं
वाsss!! मस्तच गं रुणू...
फोटोसाठी धन्स..
वेका आणि दा..
ठांकु छान टेस्टी झाला होता.
ठांकु
छान टेस्टी झाला होता. बिस्कीटे घातली आहेत ह्याची काहीच चिन्हे दिसत नव्हती नंतर.
स्टीलच्या भांड्यात करण्याला प्रोत्साहन दिल्याबद्दल मंजूडीला धन्यवाद.
ऐनवेळी सजावटीसाठी लेकाने स्वतः बनवलेलं क्लेचं सूर्यफूल आणून ठेवलं
(केकला क्लेचा स्पर्श होऊ नये म्हणून प्लॅस्टिकच्या कापलेल्या बाटलीवर क्ले लावला होता)
त्याखाली एक कागदी गुलाब पण दिला खोचून मग.
(केकला क्लेचा स्पर्श होऊ नये
(केकला क्लेचा स्पर्श होऊ नये म्हणून प्लॅस्टिकच्या कापलेल्या बाटलीवर क्ले लावला होता)
त्याखाली एक कागदी गुलाब पण दिला खोचून मग.>>>>
रुणूच्या केकचा फोटो बघून 'व्वाह!' असा प्रतिसाद टाईप करणार होते. आधी फोटो बघून मला वाटलं की हिने आयसिंगचंच फूल केलं आहे. रुणू थापाडी!
पण केक छान दिसतोय.
Pages