Submitted by कु. कमला सोनटक्के on 7 July, 2012 - 11:52
घरगुती कामासाठी चाम्गला प्रिंटर कोणता?
साधारणपणे १००-२०० प्रिंट दर महिना अपेक्षित आहे.
इंक जेट की टोनर.. किमती कशा असतात?
इंक जेटात फक्त काळी शाई भरून वापरता येतो का? फक्त काळी शाई रिफिल करुन प्रिंटर चालतो का?
टोनर प्रिंटरमध्ये स्वस्त मॉडेल कोणते?
डॉलर रुपया बोंबलल्यामुळे सगळी काँप्युटर मशिनरी ५००-१००० ने महाग झाली आहे. ५८०० चा टोनर प्रिंटर आता ६७०० झाला आहे..
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कॅनोन 2900 लेझरजेट
कॅनोन 2900 लेझरजेट
लेझर प्रिंटर म्हणजे काय? इंक
लेझर प्रिंटर म्हणजे काय? इंक जेट म्हणजे काय?
डॉट मॅट्रिक्स प्रिंटर म्हणजे रिबिन वाला का? तो पोस्टात/ ब्यांकेत असतो तो का? त्यात इकडून तिकडे खड खड करत काहीतरी फिरत असते तोच का? तो हल्ली वापरत नाहीत का? तो घरी वापरायला कसा आहे? रिबिन्वाला म्हणजे कमी कटकटीचा असेल ना?
प्रिंटरचे विविध प्रकार , रिफिलच्या पद्धती यावर फुल क्वेश्चन सोडवा... ८ गुण
शिकवणी घेतो. जरा धीर धरा.
शिकवणी घेतो. जरा धीर धरा.
कॅनोन 2900 लेझरजेट +१
कॅनोन 2900 लेझरजेट +१
घरगुती कामासाठी (महीना २००
घरगुती कामासाठी (महीना २०० प्रीन्टस): - LaserJet Printer घ्या. किंमत जरा जास्त असणार(च), पण तुमच्या कामाचं स्वरूप देखिल लक्षात घ्या. Printing फक्त B/W असेल तर LaserJet Printer खरंच चांगला. hp मधे 1020 किंवा 1007, Canon मधे 2900 उत्तम. ईतर Brands च्या वाटेला देखिल जाऊ नका; कारण, तुम्ही 'कोल्हापुरा'त रहाताय (संदर्भ- तुमची वि.पु.), माझा अनुभव अत्यंत 'घाणेरडा' आहे...
Dot Matrix Printer मधे 'रीबीन' वापरली जाते, कामाच्या वेळी खूप आवाज करतो, अपेक्षीत Printing Quality मिळणार नाही.
Color Printingचं काम असेल तर, DeskJet/ InkJet Printer घ्या... इथेही hp किंवा Canon मधे उपलब्ध असलेली Models तपासून निर्णय घ्या...
LaserJet/ DeskJet/ InkJet मधे Re-Fill उपलब्ध असते, पण ते व्यावसायीक इसमा कडुन(च) करुन घ्यावे, घरात 'उपद्व्याप' करायचा प्रयत्न करु नये.
कॅनन आय पी १२०० कसा आहे?
कॅनन आय पी १२०० कसा आहे? आजकाल प्रिंटरमध्ये २ मिलिचे का कार्टिरेज असतात? ते बदलून १० मिलि चे टाकता येतात का?
समजा २ मिलि चा असेल तर घरी रिफिल करता येते का?
घरी रिफील वगैरे करू नये
घरी रिफील वगैरे करू नये प्रिंटर खराब होतो. एच पी चे प्रिंटर्स ही चांगले आहेत.
हॉरिबल ! हे सगळ्या इंक जेट
हॉरिबल !
हे सगळ्या इंक जेट प्रंटरमध्ये होते का?
घरी रिफील वगैरे करू नये प्रिंटर खराब होतो
मला माझा क्याम्प्युटरवाला म्हणाला, १० मिलि चे कार्टिरेज बसवा आणिमि तुम्हाला १०० मिलिची बाटली देतो, तुम्ही घरात रिफिल करा. म्हणून.
७००० रु चा प्रिंटर... ७००
७००० रु चा प्रिंटर... ७०० रुपयाचं कार्टिरेज......
त्या वरच्या विडिओ मधला, लिवर फाटून किंवा अॅब्डॉमिनल अॅओर्टा रप्चर होऊन पोटात रक्त भरलेल्या मुडद्यागत झालेला प्रिंटर पाहून आता प्रिंटर घेण्याची इच्छाच डळमळीत झालेली आहे. )
( त्यामुळे सरळ काही दिवस ७ रु चा उपाय योजलेला आहे... सात रुपयाची सी डी घेणे, त्यात सगळे राइट करुन कॅफेमधून प्रिंट काढून आणणे.
)
तरीही इथे डिस्कशन सुरु ठेवणे. इतराना उपयोगी पडेल. शाई कशी वाचवावी यावर एक धागा आहेच.
Canon LBP 2900 comes with
Canon LBP 2900 comes with Full Toner (1500 pages capacity) and the Toner can be refilled (RS. 500)
लेटेस्ट मध्ये कोणता प्रिंटर
लेटेस्ट मध्ये कोणता प्रिंटर चांगला? एचपी आणि कॅनन मध्ये कन्फ्युज आहे. थोडा ऑफिस युज आणि केव्हातरी फोटो प्रिंटसाठी पाहिजे. ४ कार्टिरेज वाल्यांमध्ये एक कार्टिरेज संपलं तरी प्रिंट देता येत नाही अस ऐकलं, हे खरंय का? मग २ कार्टिरेज वाले चांगले की ४ वाले? दुकानांपेक्षा ऑनलाईन (फ्लिपकार्टवर) किंमत कमी दिसतेय. ऑनलाईन कुणी घेतलाय का प्रिंटर इथे? वायरलेस चांगला की विथ वायर वाला? आफ्टर सेल्स सर्वीस कोणाची चांगलीय.? कॄपया मार्गदर्शन करा... धन्यवाद.
कोणीच का उत्तर देत नाहीय?....
कोणीच का उत्तर देत नाहीय?....
कमलाबाई मायबोलिवरुन गेल्या.
कमलाबाई मायबोलिवरुन गेल्या.
आम्ही पीसी असेंबल्ड करुन
आम्ही पीसी असेंबल्ड करुन देतो. असेंबल मध्ये अधिक पैसे वाचतील फक्त सगळे पार्टस घेतांना नीट निरखून / पारखून बसवतो. सोबत २ वर्षांची वॉरंटी पण आहे रिपेअरींगकरता अतिशय पैसे मोजावे लागत नाहि, घरी येऊन रिपेअरींग करतो. आपल्याला पीसी घेऊन त्यांच्या सर्विस सेंटरला जावं लागतं नाहि वगैरे वगैरे.
santosh karande.
मोबाइल नंब्रर- ७२०८६४३४६४
mumbai.
मला नवीन प्रिंटर घ्यायचा आहे.
मला नवीन प्रिंटर घ्यायचा आहे. प्रिंटर, स्केनर ( मोबाईल वर अर्धचंद्र छापता येत नाही) आणि झेरॉक्स (हे आपोआप छापलं गेलं) सगळं एकत्र पाहिजे. कोणते पर्याय आहेत सुचवा प्लीज.
माझ्याकडे hp deskjet 2131 आहे
माझ्याकडे hp deskjet 2131 आहे. दोन वर्षं झाली असतील. आधीचाही एचपीचा 3 in 1 होता.
हा वापरायला आणखी सोपा आहे.Scanning fast आहे.
फोटोकॉपी मी क्वचित वापरतो. नव्या ब्रँडेड कार्ट्रीजच घेतो.
वजनाला आणखी हलका आहे.
स्वानुभवारुन असे सुचवेन की
स्वानुभवारुन असे सुचवेन की लेझर प्रिंटर घ्यावा. नेहमीचा नियमीत वापरला नाहीतर शाई वाळते व शाई महाग असते. लेझरला ती भिती नाही. आम्ही काळा-पांढरा घेतलाय, रंगीत महाग होता व गरज नव्हती म्हणुन.
मी पूर्वी HP चे घ्यायचो पण
मी पूर्वी HP चे घ्यायचो पण आता Epson चा घेतला, क्वालिटी चांगली आहे. वायफाय अडॅप्टर असेलला EPSON L31५० इंक जेट पाच महिन्यांपूर्वी घेतला. ३ इन १ आहे. आठवड्यातुन एकदा तरी एक कलर्ड प्रिंट आउट अथवा कलर फोटोकॉपी घ्यावी म्हणजे शाई वाळणार नाही. मध्यंतरी मी १५ - २० दिवस वापरला नाही. नंतर प्रिंट करायला गेलो तेव्हा प्रिंटरने Regenerating Ink cartridges की असा काहीतरी मेसेज दाखवून दोन चार मिनिटं काहीतरी केलं cartridges सोबत, आणि मग प्रिंटींग केलं सुरळीतपणे.
जर इंक जेट की लेजरजेट हे नक्की ठरलं नसेल तुम्ही एकदा Inkjet Vs LaserJet गुगल सर्च करून बघा मग ठरवा तुमच्या गरजे प्रमाणे.
बराच वापर होणार असेल तर इंक
बराच वापर होणार असेल तर इंक tank प्रिंटर घ्यावा, स्वस्त पडतो.
Reviews वाचून घ्या. Inkjet महाग पडतात.
अरे हो राजसी, माझा वर नमुद
अरे हो राजसी, माझा वर नमुद केलेला प्रिंटर Ink Tank च आहे.
माझ्या कडे एचपी लेसर १०२० असा
माझ्या कडे एचपी लेसर १०२० असा काही तरी नंबरचा आहे. आठ वर्षांपासून विनातक्रार सुरू आहे. खूप प्रिंट्स निघतात. लेक्समार्कचा ऑल इन वन आहे पण फक्त स्कॅनिंग साठी वापरतो.
एचपी लेसर १०२० >> एचपीचे एक
एचपी लेसर १०२० >> एचपीचे एक बेस्ट मॉडेल आहे हे.
कलर लेझर महाग असतात. त्या तुलनेत इंक टँक घ्यावेत. लेझर इतकी सुंदर क्वालिटी मिळणार नाही पण स्वस्तात मस्त कलर प्रिंट मिळेल
१. एचपीचा ऑल इन वन लेझर. पण
१. एचपीचा ऑल इन वन लेझर. पण हा फक्त काळ्या रंगात छापणारा परवडतो.
२. इंक जेट हवा असेल तर .. पण नकाच घेऊ. माझ्याकडचा एक नुसता इंकजेट पडून आहे अन दुसरा ऑल इन वन कार्ट्रीज नसेल तर स्कॅनही करू देत नव्हता म्हणुन पडून आहे. हवा असेल तर पाठवतो, पोस्टेज देऊन सोडवून घ्या अन वापरा. कार्ट्रिजचा खर्च प्रिंटरच्या किमतीपेक्षा महाग जातो.
३. रंगित छपाई बरीच असेल तर इंक टँक घ्यावा. तो ऑल इन वन घेतला तर १२ हजारापर्यंत जातो.
सध्या माझ्याकडे HP Laserjet M1136 MP, + Canon G1010 असे काँबो आहे. लेझर प्रिंटर काळ्यापांढर्या स्कॅन/झेरॉक्स व छपाइसाठी अन रंगीत इंक टँक प्रिंटर पेशंटच्या रंगीत रिपोर्ट्ससाठी.
https://www.ricoh.co.in
https://www.ricoh.co.in/products/b-w-laser-printers/sp-111