Submitted by kaaryashaaLaa on 16 September, 2008 - 11:57
तर वृत्त म्हणजे काय असतं त्याची प्राथमिक माहिती मिळाली आपल्याला.
आता थोडं गझलच्या व्याकरणाकडे वळू या.
गझल ही एकाच वृत्तात लिहीलेल्या किमान पाच द्विपदींनी बनलेली रचना असते.
म्हणजे प्रत्येक 'कडवं' हे दोन ओळींचं असतं. या द्विपदींना 'शेर' म्हणतात.
अर्थात, वृत्ताबरोबरच त्यांना इतरही काही नियम पाळावे लागतात.
एक पटकन एका दृष्टीक्षेपात माहिती देणारं कोष्टक आधी बघू. आणि मग शंका असतील तर सविस्तर चर्चा करू. कसं?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कार्यशाळे
कार्यशाळेचे नियम इथे जाहीर केले आहेत.
वा वा! छान
वा वा! छान छान. तक्ता बघुनच समजलं की हो!
पण एक छोटिशी अडचण, ही सगळी उर्दु नावं लक्षात ठेवणं जरा अवघड जाईल असं वाटतंय.
म्हणजे असं की, एखाद्या गजलेबद्दल चर्चा चालू असेल आणी समजा कुणी पटकन विचारलं की "उला मिसर्यातला काफिया बघुन सांगा की अलामत काय आहे आणि काफिया बरोबर आहे का?" तर खिशामध्ये तक्ता शोधत बसावं लागेल की हो!
पण हळू हळू हे सगळे शब्द कार्यशाळेत वापरुन सवय होउन जाईल आपोआप असं वाटतंय. कार्यशाळेत मजा येतेय मलातरी भरपुर. बरंच काही नविन समजतंय.
वापरून सवय
वापरून सवय होऊन जाईल अविकुमार.
आणि हो, काफिया आणि अलामत हे सानी (म्हणजे दुसर्या) मिसर्यात (म्हणजे ओळीत) येतात.
हे पण पान
हे पण पान वाचलं मी.
समजतंय हळू
समजतंय हळू ह्ळू
एक बाळबोध
एक बाळबोध प्रश्ण!
निरिक्षणावरुन असे दिसते की उला अन सानी मिसर्यात "अक्षरान्ची" सन्ख्या समान दिसते सगळीकडे!
असाच नियम हे का? की "वृत्तात" बान्धणी केल्यावर आपोआपच अक्षरान्ची सन्ख्या नक्की होते?
वृत्तातली बान्धणी कम्पलसरी हे का?
टेबल छानच!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
limbutimbu, "वृत्त
limbutimbu,
"वृत्तात" बान्धणी केल्यावर आपोआपच अक्षरान्ची सन्ख्या नक्की होते >> हे एकदम बरोबर.
आणि गझला वृत्तात बांधणे कंपलसरी आहे
==
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
kaaryashaalaa08@maayboli.com