'अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०१३' हे सिडनी येथे मार्च २०१३ मधे संपन्न होत आहे. या संमेलनाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड मधील मराठी मंडळी मोठ्या संखेने एकत्र येतात. नवीन-जूना मित्रपरीवार, मनसोक्त गप्पाटप्पा, बहारदार सांस्कॄतीक कार्यक्रम यांची तर रेलचेल असतेच पण त्याबरोबर असते अस्सल मराठमोळं जेवण; आपल्या माबोच्या भाषेत 'खादाडी'!
हौसेनौसेनं मग तयारी चालू होते. बायकांची एकमेकांत फोनाफोनी होते, अन कपाटात जीन्सच्या गठ्याखालील नऊवारी गालात हसते. कुणाकडून नथेचा आकडा मागवला जातो तर कुणाकडून आंबाड्याची जाळी. पुरूषमंडळी झब्यासाठी कोल्हापूरी चपला वा मोजेडीचा बंदोबस्त करतात. पोट्यासोट्यांसाठी धोती वा परकर-पोलकं येतं आणि बघता बघता मनामनांत 'मराठी वारं' वाहू लागतं.
संमेलनाच्या निमित्ताने तीन दिवस थोरामोठ्यांसाठी भरगच्च कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहेत ज्यात चर्चासत्रे, साहित्य, संगीत, नाटक ई. चे सादरीकरण होईल. भारताबाहेर ज्या ज्या देशात अश्याप्रकारचे कार्यक्रम होतात तेथील आपले अनूभव व त्याबाबत चर्चा या धाग्यावर करू या. एखाद्या लक्षात राहीलेल्या कार्यक्रमाबद्दल येथे जरूर लिहा...
अरे व्वा! चंबू हे छान काम
अरे व्वा! चंबू हे छान काम केलस
आता इथे संमेलनाच्या वेबसाईटच्या आणि त्या संदर्भात इतर काही लिंकाही टाकशिल का प्लिज.
मस्तच!
मस्तच!
संमेलनाच्या वेबसाइटची
संमेलनाच्या वेबसाइटची लिंक.... http://www.aams2013.org.au/
माझ्या मित्रांचा एक गट एका
माझ्या मित्रांचा एक गट एका छोट्या (१०-१५मिनीटे) बालनाटीकेच्या शोधात आहे. कूणी काही सूचऊ शकेल का?
अरे वा छानच, हे संमेलन
अरे वा छानच, हे संमेलन ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड मधील मराठी मंडळीसाठी मोठी पर्वणीच म्हणायची.....:)
चंबु लिंकसाठी धन्स रे.......
मस्तच मज्जा येनार !!! आलेच
मस्तच मज्जा येनार !!! आलेच .....
चंब्या, अरे, अ ऑ म सं चा लोगो
चंब्या, अरे,
अ ऑ म सं चा लोगो तू बनवलायस ते सांगितलस का सगळ्यांना?
ऐका हो ऐका...
ह्यासाठी अनेकांनी प्रवेशिका भरल्या होत्या. चंब्यानं नंबर पटकावलाय...
अभिनंदन, रे....
अरे वा वा !!! अभिनंदन !!!!
अरे वा वा !!!
अभिनंदन !!!!
अरे वा वा!!! चंबु, अभिनंदन!!
अरे वा वा!!!
चंबु, अभिनंदन!! बोलला नाहीस परवा!
धन्यवाद दाद!
दाद.... सांगणारच
दाद....
सांगणारच होतो..
धन्यवाद.. लवकरच टाकतो इथेही.
महिन्यातून दोनदा सदस्यांतर्गत
महिन्यातून दोनदा सदस्यांतर्गत संमेलनाचे वार्तापत्र प्रकाशित केले जाते. या वार्तापत्रात माझे लोगो विषयी मनोगत प्रसिद्ध करण्यात आले..
संमेलनाचे शिर्षकगीत
संमेलनाचे शिर्षकगीत तयार....
http://youtube.com/watch?v=Ago430xSBMM
अरे वा! छानच झालय! पण झी
अरे वा! छानच झालय!
पण झी वाल्यांची लिंक का दिली? व्यवस्थित दिसत नाहीये आणि ती निवेदिका आणि निवेदन एकदम वाईट आहे!
संमेलन समितीने केलेल्या चित्रीकरणाची लिंक असल्यास देणेचे करावे!
हो चंबू मी पण बघितल हे गाणं,
हो चंबू मी पण बघितल हे गाणं, फार फार छान आहे.....
आणि वत्सला सगळ्या लिंक अश्याच आहेत
मुळ गाणे आणि गाण्यासंबंधित
मुळ गाणे आणि गाण्यासंबंधित माहिती इथे लवकरच टाकणार आहे, अर्थात संबंधितांची परवानगी घेऊन. चित्रिकरणाच्या बाबतीत सांगायचे झाले तर या एकाच गाण्यावर चार वेगवेगळ्या ठिकाणी चित्रिकरण होतेय, माझ्या हातात जसे येतील तसे टाकतो..
अरे कोण कोण येणार आहे
अरे कोण कोण येणार आहे संमेलनाला ???? आपण सगळे तेथे भेटूया का ?
आम्ही नाही येणार पण संमेलनाला
आम्ही नाही येणार पण संमेलनाला आणि गटगला शुभेच्छा!
मी असणारै. भेटूयाच. जुलियाबाई
मी असणारै. भेटूयाच.
जुलियाबाई येतायत उद्घाटनाला प्रमुख पाहुण्या म्हणून असं ऐकून आहे.
हो.. जुलियाबाईंना आवतान तर
हो.. जुलियाबाईंना आवतान तर दिलंय म्हणतात...
मागे बोलल्याप्रमाणे संमेलनाचे
मागे बोलल्याप्रमाणे संमेलनाचे शिर्षक गिताचे बोल आणि लिंक देत आहे...
राजन रिसबूड यांच्या शब्दांना कौस्तूभ दातार यांनी दिलेली चाल आणि अनय इनामदार यांच्या संगीतावर प्रतीभा इनामदार, संजीव मेहेंदळे व साथीदारांनी गायलेले हे गीत..!
अगदी अप्रतीम ! ! यापेक्षा अजुन काय बोलायचे..!
पूर्ण गाणे इथे ऐका...
http://www.youtube.com/watch?v=2p9xeETnYJs&feature=youtube_gdata_player
Juliabaai rahateel na
Juliabaai rahateel na tovar??? kaalchyaa ghaTanevarun kinva ekuNach tyanchya suru asalelyaa kheLakhanDobarun!
आणि आजपासून संमेलन सुरू....
आणि आजपासून संमेलन सुरू....
अरे वा!! झाले का सुरू? शरद
अरे वा!! झाले का सुरू? शरद पाठक माझा आत्तेभाऊ, त्यामुळे संमेलनासाठी त्याने (म्हणजेच त्याच्या टीमने) घेतलेले कष्ट माहीती आहेत. संमेलन दणक्यातच होणार!
जे हजर असतील त्यांनी इथे फोटो
जे हजर असतील त्यांनी इथे फोटो टाकले तर बघायला आवडतील आणि जे प्रत्यक्ष हजर नाहीत त्यांनाही आनंद लुटता येईल.
संमेलनाकरता मनापासून
संमेलनाकरता मनापासून शुभेच्छा!
संमेलनाकरता मनापासून
संमेलनाकरता मनापासून शुभेच्छा! >>>> +१००....
Chambu, shalaka, tumachya
Chambu, shalaka, tumachya karyakramana shubhecchaa! Chambu, lekilahee sang!
परदेशात आपण खेळीमेळीने,
परदेशात आपण खेळीमेळीने, प्रेमाने, स्वयंसेवक वृत्तीने ही संमेलने करतो. शिवाय आपण काही ही संमेलने फायद्यासाठी करत नाही, जो खर्च येईल त्यापैकी बराचसा स्वयंसेवकाच्या खिशातून होतो, मग थोडी वर्गणी काढावी लागते.
पण भारतातून कुणाला बोलवाल तर नीट चौकशी करून बोलवा. पुष्कळ भारतीयांची अशी समजूत असते की आपल्याला परदेशात अगदी राजा सारखे वागवले पाहिजे. मी फक्त गाडीतूनच जा ये करणार, रस्ता क्रॉस करायला सुद्धा गाडीतूनच. तुमचा मेन्यू काही पण असला तरी मला पाहिजे तेंव्हा मी मागितले तर मला बटाटेवडा, चायनीज असे जेवण मिळाले पाहिजे. काही लोकांनी तर संमेलन आटोपल्यावर इकडे तिकडे भटकायचे पैसे सुद्धा संमेलनालाच लावले.
नि वर भारतात जाउन आपली बदनामी केली.
थोडक्यात आपण ज्या भावनेने हे करतो ती भावना त्यांना माहित नसते, ते स्वतःच्याच मस्तीत कायम. असल्या माणसांचे कशानेहि समाधान होत नाही.
अंदाजाप्रमाणेच संमेलन खुप
अंदाजाप्रमाणेच संमेलन खुप दणक्यात झाले..
बस्के : खरंय! शरद पाठक हे खरच एक अफलातून व्यक्तीमत्व आहे. एका वेळी शंभर कामे करत असतांना सुध्दा चेहर्यावरचे स्मित कायम. कामाचा डोंगर उपसलाय त्यांनी...दिवस-रात्र कामे केलीत त्यांनी, त्यांच्या सहकार्यांनी. खरच चकीत व्हायला होते शरददाचा काम करण्याचा आवाका पाहून.
अजय : लवकरच संमेलनाची सविस्तर माहीती / फोटो टाकण्याचा प्रयत्न करतो.
हर्पेन, शशांक, वत्सला... धन्स!
झक्की अगदी खरं बोलताय... इथे काय काय प्रोब्लेम ला सामोरे जावे लागते ते ज्याला त्यालाचे माहीत. मागच्या तीन महीन्यांपासून प्रत्येक शनिवार- रविवार कसा येतो आणि कसा जातो हे कळालेच नाही.
सम्मेलन! कस्लं डोंगराएव्हढं
सम्मेलन!
कस्लं डोंगराएव्हढं काम... पण काय दणक्यात झालं म्हणून सांगू.
शरद पाठक आणि त्यांच्या टीमचं कौतुक करावं तितकं कमीच. अगदी सगळ्याच फ्रंन्ट्सवर परिक्षा बघणारा प्रत्येक क्षण.... पण नुस्तं निभावून नेलं नाही तर, जिंकलेत.
चंब्या ते फोटू-बिटू टाकेल.. मी एकदम बाद आहे त्या बाबतींत. एकूणात कार्यक्रम सुंदरच झाले.
चिल्ल्या-पिल्ल्यांचे कार्यक्रम सुरु आहेत... आई-वडील, आज्जी-आजोबा अगदी डोळ्यांत प्राण आणून कौतुक बघतायत... सगळेच टाळ्या वाजवीत ताल धरतायत, शिट्ट्या...
हे सगळं ह्याची देही-ह्याची डोळा अनुभवणं हा एक अतिशय उबदार अनुभव आहे. कस्साच शब्दांत मांडता येई ना... असा. सांस्कृतिक(??) जपणूक, कला-गुणांचा वारसा, मायबोलीशी नाळबंध... हे सगळं इतरवेळी बोलताना फार धिसंपिटं, गुळगुळीतपणे वापरतो आपण.
पण असं काही बघितलं की जाणवतं आपल्याला जो काय त्याचा अर्थं म्हणून अभिप्रेत आहे त्याचं बोट धरून आई-वडिलांनी केलेला हा निव्वळ कर्मयोग.
त्या आई-वडिलांचे, वडिलधार्यांचे शतशः आभार.
मज्जा... आली हे खरच.
Pages