वांड — TOO GOOD !!!
भावा — DUDE !!
काटा किर्र्र — AWESOME !!!
जाग्यावर पलटी —– OH MY GOD!!
नाद खुळा — BRILLIANT !!
शुन्य मिनीटात आवर — BE QUICK !!
रिक्षा फिरवू नकोस — DON’T WASTE TIME !
लई भारी — TOO GOOD !
जगात भारी —- BEST !!
नाद नाही करायचा — DONT CHALLENGE !!
निवांत — RELAXED !
तानुन दे— GO TO SLEEP !
इस्कटलेला — STUPID !
नाद खुळा… गणपती पुळा — OH MY GOD !!
डोक्यावर पडलायास का ??? — HAVE U GONE MAD ??
चक्कित जाळ — GREAT !!
आबा घुमिव !!! —- COME ON !!!
वडाप —- CROWD !
काय मर्दा — HI DUDE !
तर्राट पळालास ब— YOU WERE TOO FAST !
काय गुढघ्यावर पडलास काय ?? — ARE U MAD ??
तरतरित — FRESH !
घसघषित — TOUGH !!
शाळा करने — PLOT A SCHEME !
पेट्लास की — YOU ARE ON FIRE ! / IN FORM
कीशात नाही आना, आणि मला बाजीराव म्हना..! —- YOU ARE NOT QUALIFIED ENOUGH TO DO IT!
चिरकुट — SIMPLE !
घुमिव की पिट्टा! — Come on ! .. you can do it !!!
चहात दही ! — STRANGE COMBINATION
खटक्यावर बोट.. जाग्यावर पलटी ! — OH MY GOD !!
एकशरे काढ़लास काय ? — ARE YOU SICK ?
आम्बा पाडला — FOOLED SOMEONE SUCCESSFULLY !
लई झाक — TOO GOOD !
हुडक आता बसून — DO IT ONYOUR OWN !!
पुडया सोडू नकोस – DON’T LIE SO MUCH !!
***************************************
तुमच्याकडे आणखी असतील तर सांगा.
वडाप - तांदळाचे वडे वगैरे
वडाप - तांदळाचे वडे वगैरे असलेले सुग्रास जेवण (कोकणी)
हे फेसबुकवर सातारचे शब्द
हे फेसबुकवर सातारचे शब्द म्हणून पण पाहिले. नक्की कुठले समजायचे.
धीरज सातार, कोल्हापूर,
धीरज सातार, कोल्हापूर, सांगली, जयसिंगपूर, मिरज.. हेच शब्द आहेत सगळे.
धन्यवाद द़क्षिणा. म्हणजे
धन्यवाद द़क्षिणा. म्हणजे थोडक्यात पश्चिम महाराष्ट्राची भाषा.
म्हणजे थोडक्यात पश्चिम
म्हणजे थोडक्यात पश्चिम महाराष्ट्राची भाषा.>>> पश्चिम महाराष्ट्राची न्हाइ ओ पच्चीम म्हाराष्ट्र म्हणा..
पश्चिम महाराष्ट्राची न्हाइ ओ
पश्चिम महाराष्ट्राची न्हाइ ओ पच्चीम म्हाराष्ट्र म्हणा.. >>मायबोलीवर शक्य तेवढे शुध्द लिहायचा प्रयत्न करतो नाहीतर प्रतिसादात पण कोणीतरी लिहायचे "तेवढ्या शुध्द लेखनाच्या चुका टाळा,मायबोलीवर नवीन आहात वाटते."
धीरज कोल्लापुरात कोण काय
धीरज कोल्लापुरात कोण काय म्हणतयं त्याचा इचार लोकं करत न्हाइती.
पण जरा भेळ्मिसळ झालिय हे खरं
वडाप म्हणजे सहा आसनी रिक्षा
वडाप म्हणजे सहा आसनी रिक्षा असे पेपरमध्ये वाचले होते.
वडाप म्हणजे सहा आसनी रिक्षा
वडाप म्हणजे सहा आसनी रिक्षा असे पेपरमध्ये वाचले होते>> अर्धवट माहिती दिलीये पेपरवाल्याने..
अहो एसटी किंवा सिटीबसला जी काही समांतर वाहतुक व्यवस्था चालते ती म्हणजे वडाप..
त्यात सहा आसनी रिक्षा, जीप अशी अनेक वाहने येतात..
ओ..मस्त!! झणझणीत्..काटाकिर्र
ओ..मस्त!!
झणझणीत्..काटाकिर्र शब्दावली..
अस होय. बर झाले सांगितलेत
अस होय. बर झाले सांगितलेत झकासराव.
कोल्हापूर सांगली भागात
कोल्हापूर सांगली भागात 'मुलाला किंवा मुलीला' असे न म्हणता मुलग्याला मुलगीला असे म्हणतात.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/6864
लै भरकटु नगा... हाय ... असलं अगूदरप्स्नच हाय. वाइच बसुन वाचुन काडा आता.
खुळा - व॓डा हानतूच बग तुला -
खुळा - व॓डा
हानतूच बग तुला - मारतो