Submitted by वैभव फाटक on 2 July, 2012 - 03:28
लाख दु:खे उंबऱ्याशी ठाकली
त्यात तू पेटी सुखाची झाकली
वादळाला जिंकले तेव्हाच मी
नाव पाण्यातून जेव्हा हाकली
दु:ख की आनंद व्हावा, ऐकुनी ?
"थोरली कन्या नको, द्या धाकली"
भार जेव्हा आठवांचा जाहला
मी नव्याने कात तेव्हा टाकली
वाहिली नाहीत ऐसी रोपटी,
रोपटी जी, वेळ येता वाकली
वैभव फाटक ( २४ जून २०१२)
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वा वा मस्त वैभवराव खूप आवडली
वा वा मस्त वैभवराव
खूप आवडली गझल
सहीच...... भार जेव्हा
सहीच......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भार जेव्हा आठवांचा जाहला
मी नव्याने कात तेव्हा टाकली
वाहिली नाहीत ऐसी रोपटी,
रोपटी जी, वेळ येता वाकली
हे सुरेख्..........आवडले..........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भार जेव्हा आठवांचा जाहला मी
भार जेव्हा आठवांचा जाहला
मी नव्याने कात तेव्हा टाकली>>>
चांगला शेर आहे
धन्यवाद वैवकु,योगुली आणि
धन्यवाद वैवकु,योगुली आणि बेफिजी.