" माझी फजिती - गाडीचा किस्सा "

Submitted by गारम्बीचा बापू on 30 June, 2012 - 23:44

" गाडीचा किस्सा "

कामावरून संध्याकाळी आलो , हात पाय धुवून कपडे बदलून ,चहा पाणी पिऊन बसलो होतो, मित्राचा फोन आला , मला बोलला खाली ये , मी बोललो अरे घरी ये वर, चहा घेऊन जाउया , तर म्हणाला चहा बाहेर घेऊया ये लवकर , प्रफुल सोबत जातोय सांगून बाहेर पडलो, खाली येऊन बघतोय तर काय, मित्राने नवी कोरी गाडी घेतली होती, Wagon R, मस्त बायपास हायवे ला जाऊन मस्त मोकळ्या हवेत बसून ढाब्यावर चहा प्यायलो, माझी नजर सारखी त्या गाडी कडे जात होती, गाडी मनात भरली, ठरवलं गाडी घ्यायचीच, मनातून एकदम खुश, शोरूम ला जाऊन किंमत काढायची सुरवात केली, पण बजेट खूप कमी होते, डाऊन पेमेंट चे पैसे होते माझ्याकडे, पण विचार केला, हाउसिंग लोन पण आहे, झेपायचं नाही, मग ठरवलं जुनी गाडी घ्यायची, बजेट होतं ७०,००० रुपये, गाडीचा शोध झाला सुरु, माझ्या शेजारी आर.टी.ओ एजंट रहात होता, त्याने एक गाडी सुचवली, एक केरलावाला माणूस होता, त्याच्या दारात एक पांढरी मस्त चिकनी ZEN उभी होती, गाडी बघून घेतली, चालवायला मला न्हवती येत, भावाला बोलावला, संध्याकाळी ७ वाजता पैसे देऊन गाडी ताब्यात घेतली, आयुष्यातली पहिलीच ४ चाकी गाडी, टी पण आपल्या मालकीची , जम खुश होतो , गाडी फिरवायला गेलो , एका ट्रक ला ओवरटेक करत असताना गाडीचा टायर पंचर झाला, मग गाडी बाजूला लावली, वाजले होते संध्याकाळचे ९ , गाडीत स्टेपनीच न्हवता, आयला, ज्याक पण नाही, केरला वाल्याला फोन केला, " गाडी में स्टेपनी नही, ज्याक नही ?" माझी खस्कली, मग तो स्कुटर वर सगळं सामान घेऊन आला , गाडीचा पंचर काढून घरी आलो, गाडी परत घ्यायला तो केरला वाला तयार होता, भाऊ पण बोलला देऊन टाक परत आणि पैसे घे , पण गाडी दिसायला चिकनी असल्यामुळे तिचा मोह काही सुटेना, आणि त्यात आयुष्यातली पहिलीच गाडी होती.

दुसऱ्या दिवशी नेरूळ मार्केट ला जाऊन नवीन ४ टायर आणि ४ ट्यूब घेतल्या, सगळे टायर ट्यूब बदलले , २०,००० खर्च, गाडी टकाटक, गाडी ची सर्विसिंग करून घेतली , संध्याकाळी गाडी ताब्यात मिळाली , दुसऱ्या दिवशी गाडी घेऊन बायको सोबत बाजारपेठेत गेलो, अरुंद रस्ता , एकेरी त्यात गर्दी होती, आयला गाडी लागली डुगडुग करायला, पेट्रोल तर होते गाडीत, गाडी पडली बंद, मागून मोटरसायकल वाले खूप होर्न मारायला लागले, बायको वैतागली, पण माझ्या कडे बघून ती पण गांगरली , मी पण सोल्लीड गोंधळून गेलो होतो, काही लोक माझ्या खिडकीपाशी येऊन उपदेश देत होते, काही बडबड करत होते, काही माझ्याकडे बघून हस्त होते, बायकोला रिक्षात बसवून घरी पाठवली , जाता जाता बोलली फोन करा नंतर, किती प्रेम असतं बायकोचं आपल्यावर ते संकटकाळीच समजून येतं . समाजातील ५-६ शुभचिंतक माझ्या मदतीला धावून आले, गाडीला धक्का मारून गाडी बाहेर काढली, मी घामाघूम झालो होतो, सर्विस सेंटर वाल्याला फोन केला , मारली त्याची , त्याला बोललो काय सर्विसिंग केलीस? त्याची २ माणसं मोटारसायकल वर आले , मी त्याची मोटारसायकल घेऊन घरी गेलो, ते दोघे काहीतरी ३ तासांनी ती गाडी कशीबशी चालू करून त्याच्या ग्यारेज ला घेऊन गेले.
मी दुसऱ्या दिवशी सकाळी ग्यारेज ला गेलो, तो म्हणाला हिचा पेट्रोल चा पम्प खराब झाला आहे, फिल्टर फाटला आहे, आयला, मग पम्प बदल बोललो, तर त्याने त्या ZEN मध्ये AMBASSADOR चा पंप बसवू दिला, गाडी पहिल्या पेक्षा जोरात धावायला लागली, मी पण खुश, आईला घेऊन डॉक्टर कडे निघालो तर खूप पेट्रोल चा वास यायला लागला, गाडी बाजूला लावली , बोनेट उघडून बघतोय तर काय पेट्रोल ची धार लागली होती, त्या ाने जो पंप बसवला होता त्याच्या पाईप ला क्लिप लावलीच न्हवती, मग तारेने बांधला , त्याला जाम शिव्या दिल्या .

असचं एकदा गाडी शायनिंग मारायला कंपनीत घेऊन गेलो होतो, येताना ४ मित्र बसले गाडीत, गाडी शहरात शिरली , अपना बाजार जवळ आली , आणि टेप मधून धूर निघायला लागला, गाडी फटाफट बाजूला घेऊन बंद करून , टेप काढला खेचून आणि दिला बाहेर फेकून . जाम घाबरलो साला आग लाग्लायची वेळ आली होती एवढा धूर अचानक यायला लागला होता .
साला रोज रोज काही न काही व्हायचं रोज , वैतागलो गाडीला अक्षरशह .

एकदिवस मोठा किस्साच झाला ,जावई बापू बायको ला घेऊन सासरवाडीला गेले, म्हणजे मी, मस्त दुपारचं जेवण झालं, बोकडाचं मटन , मस्त ताव मारला, बाजूला कोणाचं तरी गावात लग्न होतं, खूप पाहुणे फिरत होते, मी संध्याकाळी ४ वाजता निघालो, सगळे गाडी जवळ आले सोडायला, सगळे म्हातारे कोतारे, तरणे , बच्चे सगळेच, बसलो गाडीत बायको शेजारी बसली, आणि मनात अजिबात शंकाच आली नाही, गाडीला स्टार्टर मारला, गाडी कशाला चालू होते, आईशप्पत इज्जतीचा पंचनामा, ९ - १० वेळा स्टार्टर मारला तरी पण नाही, शेवटी ब्याटरी डाऊन होईल म्हणून गप्प बसलो, ते गावात लग्नाला आलेले पाहुणे पण टकामका बघायला लागले, बायको माझ्याकडे अशी रागाने बघत होती, त्यात अर्धा गाव बघत होता ..... मला अशी लाज वाटत होती ना, काय सांगू.
धक्का मारून गाडी चालू झाली, धक्का मारायला माझे २ मेहुणे आणि त्यांचे २ मित्र . गाडी चालू झाल्या झाल्या अशी काय पळवली ना, थांबायला डायरेक्ट घरी आलो , कारण वाटेत बंद पडली तर धक्का मारेल तरी कोण ?

त्या दिवशी ठाम निर्धार केला गाडी विकायची , पण हि गाडी माझ्या महाड शहरात एवढी प्रसिद्ध झाली होती , कि साला कोण घ्यायलाच तयार नाही, ७०,००० ला गाडी घेतली, २० हजार टायर ट्यूब, १० हजार अक्कल खात्यात , एकूण गाडी पडली १ लाख .
घ्यायला गिराईक बोलायचा ३० हजार , अशी काय चीड यायची ना गिऱ्हाईकाची पण करणार काय ?

दुसऱ्याच आठवड्यात मला बाहेरगावी नोकरीचे नक्की झाले होते, माझ्या बिल्डिंग मध्ये खाली राहणारे एक काका म्हणाले काय रे , तुझी गाडी विक्तोएस , मी खुश झालो, काका चागले सर्विस रिटायर्ड झाले होते , पैसा पण होता , पण परत विचार आला, हि गाडी घेऊन उद्या ते मला शिव्या घालतील , जसा मी त्या केरला वाल्याला घालतोय, पण नाईलाज होता , गाडी कोणाच्या तरी गळ्यात बांधाय्चीच होती , एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या गळ्यात बांधण्या पेक्षा त्यांच्या गळ्यात बांध्याला काही जास्त वाटलं नाही , गाडी विकली ५५ हजारला , मोठा बांबू लागला , मोठे नुकसान १ महिन्यात , पण ती गाडी ठेऊन पण रोज नुकसानच होत होतं.
काकांनी गाडी दसऱ्याच्या दिवशी ताब्यात घेतली .

मागच्या दिवाळीला घरी गेलो होतो , गाडी बिल्डींगच्या खाली कोपरयात उभी होती , तिरक्या नजरेने बघितलं , गाडीवर हिरवी शेवाळ आली होती , काय ते सगळं मी समजून गेलो, आत्ता काका समोर येताना दिसले कि मी दुसरीकडे कल्टी मारतो . कानाला खडा लावला, जुनी गाडी बाप जन्मात घेणार नाही.
बाहेर नोकरी करत असल्यामुळे आत्ता वर्षातून एकदाचं घरी जातो, म्हणून जास्त तारांबळ होत नाही.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अगदिच हास्यास्पद लिखाण आहे. शुद्धलेखन तरी तपासायचे प्रकाशित करण्याअगोदर. बाकी "शिव्या" तुम्हाला एकसे एक येतात ह! छान लगे रहो.

पण हि गाडी माझ्या शहरात एवढी प्रसिद्ध झाली होती , कि साला कोण घ्यायलाच तयार नाही,

कोणत्या शहरात ही गाडी इतकी प्रसिद्ध झाली आहे?

हास्यास्पद काय आहे ? माझी फजिती झाली ,त्याची कथा आहे ...........
तुम्हाला आवडली तर बघा , नाहीतर सोडून द्या

मि. तुशार घाग उर्फ कळीचानारद तुम्हाला एक फु.स.

सर्व माबोकरांप्रमाणे तुम्ही सुद्धा इथे लिहू शकता, नाही कुणी म्हटलेले नाही. परंतु आपण काय लिहीतो, कशावर लिहीतो, ते नक्की कोणत्या सदरात मोडते याचा विचार करुन लिहीत जा.

इथे नवीन लेखकांचे स्वागत जरी असले तरी त्यात किमान जरा तरी शुद्ध भाषा असावी, परिछेद असावा, व्याकरण थोडे तरी समजेल असे असावे. याच बरोबर आपण गल्लीतल्या लोकांसमोर नव्हे तर आंतरराष्ट्रिय स्तरावर सर्व मायमराठी वाचकांसाठी लिहीत आहोत याची शुद्ध ठेवावी.

तुमच्या लेखात नको तेवढ्या शिव्या आहेत, अशुद्ध भाषा आहेच. मायबोली म्हणजे आपली सर्वसामान्यांची बोली आहे, शिवीगाळीची नव्हे.

प्रत्यक्ष नारदमुनींची फजीती झाल्यावर शुध्द्लेखण काय खाक तपासता? नुसत्या चहाचा पहील्या दोन ओळींना पारभोळ लावला तेवढा पुरेसा नाही का? DesiSmileys.com

मायबोली म्हणजे आपली सर्वसामान्यांची बोली आहे, शिवीगाळीची नव्हे.
वाचकहो भाषा म्हणजे काय!भावना पोहोचवण्याचे माध्यम.त्यात शुध्द अशुध्द चा प्रश्न येतोच कुठे

एकदिवस मोठा किस्साच झाला ,जावई बापू बायको ला घेऊन सासरवाडीला गेले,

म्हनजे कोन कुनाला घेऊन गेलं ?