एकादशी

Submitted by उमेश वैद्य on 29 June, 2012 - 04:18

एकादशी

पंढरीत आता पांडुरंग नाही
उगीच का करीता विठाई विठाई
दीन दुबळ्यांच्या हृदयी आश्रया
गेला तो कधीच निघोनिया

पाच कर्मेंद्रीये पाच ज्ञानेंद्रीये
आणिक हे मन एकादश
वाहून सोडीन चरणाचे ठाई
उरेल मग तो पांडुरंग

ऐशा विठठलाचे घडावे दर्शन
एरव्ही ती वारी वरपांग
उम्या म्हणे देवा ऐशी एकादशी
तैसी ती घडणे तुझ्या हाती

उ. म. वैद्य २०१२

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

उम्या म्हणे देवा ऐशी एकादशी
तैसी ती घडणे तुझ्या हाती>>>>>>>>

खूप दर्जेदार खयाल

मस्त वा वा

_/\_