Submitted by निलेश बामणे on 24 June, 2012 - 02:57
पाऊस
पाऊस मला नको वाटतो
ती मज सोबत नसताना
पाऊस मला हवा वाटतो
तिज जवळ छत्री असताना
पाऊस मला नको वाटतो
रस्त्यावर चिखल नसताना
पाऊस मला हवा वाटतो
गरम चहा पित असताना
पाऊस मला नको वाटतो
मी आनंदी नसताना
पाऊस मला हवा वाटतो
ती दुःखातच असताना
पाऊस मला नको वाट
मुसळ्धार तो नसताना
पाऊस मला हवा वाटतो
अंगाला झोंबत असताना
पाऊस मला नको वाटतो
मज झोप येत नसताना
पाऊस मला हवा वाटतो
मज काव्य स्फुरत असताना
कवी- निलेश बामणे.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
कवीतेला तुम्चे नाव का दिले
कवीतेला तुम्चे नाव का दिले
जरासा बदल..... निलेश मला नको
जरासा बदल.....
निलेश मला नको वाटतो
ती मज सोबत नसताना
निलेश मला हवा वाटतो
तिज जवळ छत्री नसताना
निलेश मला नको वाटतो
रस्त्यावर चिखल नसताना
निलेश मला हवा वाटतो
गरम चहा पित असताना
निलेश मला नको वाटतो
मी आनंदी नसताना
निलेश मला हवा वाटतो
ती दुःखातच असताना
निलेश मला नको वाटतो
मुसळ्धार तो नसताना
निलेश मला हवा वाटतो
अंगाला झोंबत असताना
निलेश मला नको वाटतो
मज झोप येत असताना
निलेश मला हवा वाटतो
मज काव्य स्फुरत असताना
पावसाची वाट लावून टाकली, आता
पावसाची वाट लावून टाकली,
आता पडतोकी नाही ते देवच जाणे.
कमलाजी माझ्या कवितेची लावलेली
कमलाजी माझ्या कवितेची लावलेली वाट ही छान आहे ! धन्यवाद !
???? मी काय केले?? तो
???? मी काय केले?? तो प्रतिसाद प्रसिक यांचा आहे.
कवितेची लावलेली वाट ही छान
कवितेची लावलेली वाट ही छान आहे >>>>>>>>>>>
त्यापेक्षा तुम्ही कवितेचीच लावलेली वाट बरी वाटली.................
माफ करा कमलाजी ! माझ्या
माफ करा कमलाजी ! माझ्या कवितेला काय तुमचे नाव देणार ?
अहो ते तरी त्यांचे कुठे नांव
अहो ते तरी त्यांचे कुठे नांव आहे? त्यांचे नांव आता त्यांनाही आठवत नसेल
अरे
अरे निलेशा........................वरती जे "निलेश बामणे" हे जे नाव शिर्षक म्हणुन दिले आहेस तिथे कवितेचे नाव "पाउस" हे अपेक्षित आहे.............कळल............खाली तुझे नाव येणारच आहे......... म्हणुन शिर्षका मधे स्वतःचे नाव नाही कविता कथा यांचे नाव लिहायचे असते...............
त्यांचे बरोबर आहे उदयन,
त्यांचे बरोबर आहे उदयन, शीर्षक असे जेथे दिलेले आहे तेथे 'गुलमोहरातील साहित्यप्रकाराचे शीर्षक' असे मुळीच दिलेले नाही आहे.
येरे येरे पावसा>>. येरे येरे
येरे येरे पावसा>>.
येरे येरे निलेश बामण्या
तुला देतो चांदण्या
चांदण्या झाल्या खोट्या
निलेश खेळतो गोट्या.
कोणाला काहीच कसं वाटत नाही
कोणाला काहीच कसं वाटत नाही पावसाचा बामण आणि बामण्याचा पाऊस करायला आरे निर्बुध्दांनो हे तर दोघांचे

लटांबळ आहे. म्हणुन वर बामण्या आन् खाली त्याचा पाऊस आहे.
हातोडा, मायबोलीवर पुन्हा
हातोडा, मायबोलीवर पुन्हा स्वागत
माफ करा कमलाजी ! माझ्या
माफ करा कमलाजी ! माझ्या कवितेला काय तुमचे नाव देणार ?
कवितेला नाव कवितेचेच द्या.. तुमचेही नको की माझेही नको. वर मोठ्या काळ्या अक्षरात तुमचे नाव आहे तिथे कवितेचे नाव लिहा... त्याच्या खाली निळ्या लहान अक्षरात तुमचे नाव येतेच.
हातोडा.... १० तास ....
हातोडा.... १० तास .... जामोप्याचा आय डी आहे काय?
येरे येरे निलेश बामण्या तुला
येरे येरे निलेश बामण्या
तुला देतो चांदण्या
चांदण्या झाल्या खोट्या
निलेश खेळतो गोट्या.
मकोजीराजे ...........लै दिसात इत्का हास्लू नव्हतू बगा
लैलै आबारी हाये बगा
धन्नवाद.......... :हहगलो:.......
श्री निलेश हे आपल्या
श्री निलेश हे आपल्या सर्वांइतकीच डिग्निटी असणारी एक व्यक्ती आहेत. एखाद्या चुकीसाठी त्यांना हास्यास्पद ठरवून टवाळी करणे हे योग्य नाही.
आपण सर्व नाझे प्रिय मित्रच आहात. तरीही मी या कृत्यात भाग घेतलेल्या आपणा सर्वांचा निषेध करतो.
हे नक्की काय चाललय कलेल का
हे नक्की काय चाललय कलेल का मला ?