Submitted by वैभव फाटक on 21 June, 2012 - 02:41
दोस्त दोघे एक मी अन एक तू
मी किती करतो गुन्हे पण, 'नेक' तू
लष्कराची भाजताना भाकरी
विस्तवावर हात थोडे शेक तू
पाहुया मासा अता जातो कुठे ?
फक्त पाहुन वेळ, जाळे फेक तू
का तुझी प्रत्येक मैफिल बेसुरी ?
सूर आळव अंतरी दिलफेक तू
पर्वतांवर जायचे आता तुला
पार केल्या टेकड्या कित्येक तू
( वैभव फाटक - १८ जून २०१२ )
http://vaibhavphatak12.blogspot.in/2012/06/blog-post_18.html
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
खयाल नेक आहेत गझल छान
खयाल नेक आहेत
गझल छान झलीय
आवडली.
छान
छान
छान उत्तम
छान
उत्तम
बढिया!!
बढिया!!
छान!
छान!
वैवकु, अरविंद काका,
वैवकु, अरविंद काका, क्षयज्ञ,रणजित,गणेश
सर्वांचे आभार..