Submitted by अभय आर्वीकर on 19 June, 2012 - 11:27
तुला कधी मिशा फुटणार?
पाखरेही एकी करतात जरासे पंख फुटल्यावर
पण तुला कधी मिशा फुटणार? सांग माणूस म्हटल्यावर
पंचम स्वरात बोलणे तुझे, गैरवाजवी नसेलही
पण; मुजोरीची किंमत काय? पुरेसे नाक कटल्यावर
काही औषध उरले नाही, मित्रा तुझ्या स्वभावाला
मिळणार केव्हा शांती तुला! माझे डोळे मिटल्यावर?
राखेशिवाय दुसरे आता अन्य काय उरले येथे?
अवश्य धावून तू आलास खरा; पण आग विझल्यावर
तुझ्याशी वाद घालणे असा माझा उद्देश नसतोच
तरी वेळ येते कधीकधी, डोक्यात भूत शिरल्यावर
तुमची चर्चा चालू ठेवा, अशी, जशी वाटेल तशी
मी मात्र शब्दांना माळेत गुंफतो मला स्फुरल्यावर
निष्कारण वार केलास तू म्हणून फणा उचलला, पण;
जा तुला मी ’अभय’ देतो तू आता मागे हटल्यावर
- गंगाधर मुटे
------------------------------------------------------
गुलमोहर:
शेअर करा
बरी जमलीय पण आय थिन्क लय नाही
बरी जमलीय
पण आय थिन्क लय नाही आहे हिला
मात्रावृत्तात असली म्हणून काय......... लय हवीच ना ?
की मलाच लयीत वाचता येत नाही आहे ?
लय असेल तर खुलवून सान्गाल का मुटे सर ?
त्या शिवाय मजा नाही येणार हो ही गझल वाचायला .............सो विल्ल यू प्लीज टेल मी प्लीज !!
छान पण काही शब्दांच्या जागा
छान पण काही शब्दांच्या जागा अचुक दिल्या किंवा काही पुर्णत: गाळलेच तर लय हरवणार नाही.
ऑर्फी : पयले खुद करनेका शीखो
ऑर्फी :
पयले खुद करनेका शीखो उसके बाद हमारेको सिखाव!!
वैवकु यांच्याशी पूर्णपणे
वैवकु यांच्याशी पूर्णपणे सहमत..
वैवकु आता ही रचना गझल या
वैवकु
आता ही रचना गझल या विभागातून कविता या विभागात हलवली आहे.
आता या रचनेबद्दल आपले काय मत आहे?
गंगाधर मुटे | 21 June, 2012 -
गंगाधर मुटे | 21 June, 2012 - 01:27 नवीन
वैवकु
आता ही रचना गझल या विभागातून कविता या विभागात हलवली आहे.
आता या रचनेबद्दल आपले काय मत आहे?>>>
मीही मत देतो, कोणाला का विचारले असेना....
... खालील 'दोनोळ्यां'मधील विचार 'बरे' आहेत.
राखेशिवाय दुसरे आता अन्य काय उरले येथे?
अवश्य धावून तू आलास खरा; पण आग विझल्यावर
तुमची चर्चा चालू ठेवा, अशी, जशी वाटेल तशी
मी मात्र शब्दांना माळेत गुंफतो मला स्फुरल्यावर
निष्कारण वार केलास तू म्हणून फणा उचलला, पण;
जा तुला मी ’अभय’ देतो तू आता मागे हटल्यावर
-'बेफिकीर'!
बेफी, या दोनोळी बद्दल आपले मत
बेफी,
या दोनोळी बद्दल आपले मत जाणून घ्यायला आवडेल.
पाखरेही एकी करतात जरासे पंख फुटल्यावर
पण तुला कधी मिशा फुटणार? सांग माणूस म्हटल्यावर
पाखरेही एकी करतात जरासे पंख
पाखरेही एकी करतात जरासे पंख फुटल्यावर
पण तुला कधी मिशा फुटणार? सांग माणूस म्हटल्यावर>>>
दोन्ही ओळी स्वतंत्ररीत्या अतिशय सुंदर
एकमेकांशी संबंध जाणवला नाही
असायला हवा असा आकृतीबंधाचा हेकाही वाटत नाहीये
बाकी -
पाखरे 'पंख फुटल्यावरच' एकी करतात की कसे हे अभ्यासायची माझी पात्रता नाही कारण जन्मल्यापासून शहरात वाढलो. पण पाखरे तेव्हाच मैत्री करत असतील असे शहरात वाढून तरी वाटत नाही. (येथे 'हाहा' चा स्मायली दिला असता, पण जरा अधिक गंभीर असल्याने दिला नाही) ( स्मायली हा शब्द पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी?)
माणूस म्हंटल्यावर मिशा फुटायला हव्यात ही अपेक्षा अरुंधती कुलकर्णींना ऐकवून बघा. त्यांना पटली तर अख्ख्या मायबोलीला पटेल.
मला काहीही आणि 'कोणीही' पटते
-'बेफिकीर'!
बेफी, मला तशी शंका होती की
बेफी,
मला तशी शंका होती की त्या ओळींचा भावार्थ/गुढार्थ तुमच्या लक्षात आला नसावा,
मराठी भाषेची ढब लक्षात घेतली तर अर्थ कळायला फारसे श्रम पडू नये.
मी अर्थ सांगणार नाही कारण अर्थ स्पष्ट व्हायला त्या दोन ओळी पुरेशा आहेत.
एकी च्या ऐवजी थवे असा शब्द ठेवून बघावा, अर्थाकडे लवकर पोचाल.
कुणी तरी विस्तृत अर्थ लिहिण्याची मी वाट पाहतो आहे.
एकी च्या ऐवजी थवे असा शब्द
एकी च्या ऐवजी थवे असा शब्द ठेवून बघावा, अर्थाकडे लवकर पोचाल.>>>
अहो एवढे कळतेय तर तुम्हीच थवे लिहा की?
कविता म्हणजे काय कोडेय का काय?
च्यायला हल्ली जो उठतो तो ग्रेस होतो
स्वतः काय लिहिले आहे हे स्वतःला समजल्यानंतर हे खालील विधान करत जावेतः
<<<गंगाधर मुटे | 21 June, 2012 - 01:38
बेफी,
या दोनोळी बद्दल आपले मत जाणून घ्यायला आवडेल.>>>
<<<कविता म्हणजे काय कोडेय का
<<<कविता म्हणजे काय कोडेय का काय?>>>
नाही ते कोडे नाही. दोन ओळी मिळून एक अर्थपूर्ण विधान तयार होते.
'एक' अर्थपूर्ण विधान करायला
'एक' अर्थपूर्ण विधान करायला 'दोन' ओळी का लागतात मग?
( )
>>>>'एक' अर्थपूर्ण विधान
>>>>'एक' अर्थपूर्ण विधान करायला 'दोन' ओळी का लागतात मग?>>>
पाखरेही एकी करतात जरासे पंख फुटल्यावर पण तुला कधी मिशा फुटणार? सांग माणूस म्हटल्यावर
मग असे वाचा/ { {
मग असे वाचा/ {:) {>>> मग असेच
मग असे वाचा/ {:) {>>>
मग असेच लिहा की?
दोन दोन ओळीत लिहायचा प्रपंच नेमका कशासाठी?
( )
<<<<दोन दोन ओळीत लिहायचा
<<<<दोन दोन ओळीत लिहायचा प्रपंच नेमका कशासाठी?>>>
मायबोलीच्या पेजची रुंदी कमी आहे म्हणून. नाही तर अख्खी कविता/गझल एकाच ओळीत लिहिण्यात मला काहीही अडचण नाहीये. [ ]
मुटे, मी आणि तुम्ही कधीही न
मुटे,
मी आणि तुम्ही कधीही न भेटलेले मित्र आहोत. वाद मायबोलीवर आणि एकमेकांच्या कवितेवर. तुमचे वयही मोठे.
पण गझल तिसर्याच प्रवृत्तीची असते हे तुम्ही मान्य करत नसता आणि तुमचे ते 'मान्य न करणे' हा एके दिवशी मोठ्ठा विषय होऊन बसतो. आणि खरे तर त्यापेक्षा गझल करणे सोपे असते. चांगले चांगले खयाल, प्रत्यक्ष आयुष्य, शेती, वयानुसार दर्दभर्या अनुभुती, दिलदार स्वभाव हे सगळे (गझल म्हणून प्रकाशित करायची असेल तर) गझलेत टाकताना काही किमान निकषांना आपले माना की राव
हा माझा तुमचा शेवटचा थट्टेखोर संवाद
-'बेफिकीर'!
प्रतिसादांसह वाचली. आवडली
प्रतिसादांसह वाचली.
आवडली कविता आणि प्रतिसाद सुद्धा,
मुटे सर आपण ही रचना गझल
मुटे सर
आपण ही रचना गझल विभागातून इथे स्थलांतरीत केलीत हे पाहून मला माझी अशीच एक गझल मी अजून तिथेच ठेवली आहे हे आठवले .
आपण मोठ्या मनाने काळजावर दगड ठेवून ती हलवली असणार!!..... मी आपल्या त्या मनोवास्थेची वेदना समजूनघेवू शकतो आहे (मी तुमच्या इतका धाडसी नाही . समजूतदार तर मुळीच नाही मी. मी जरा हट्टी आहे.....नादान म्हणा हवा तर...... .)
तरी मला निरीक्षणाअंती हे जाणवले की आपल्या अशा रचनेवर प्रतिसाद तरी येतात ..माझ्या त्या रचनेच्या नशिबात तेही नव्हते.....यातून ; सूज्ञ वाचक आपली दखल घेतात व आपणास नेहमीच नकळतपणे असे मार्गदर्शन मिळत राहते.... इतकेच लक्षात घेण्याजोगे आहे
तथा आपण कुणावरही वैयक्तिक आकस ठेवू नये ही विनन्ती ............
असो
माझ्या त्या रचनेची लिंक देतो. जमल्यास मत कळवावे. .........विपूत कळवावे ..........प्रतिसादात देवूनये(उगाचच एका सदोष गझलसदृश्य रचनेचे 'उत्खनन केल्यासारखे होईल ना.........म्हणून !!)
http://www.maayboli.com/node/34530
कळावे
आपला नम्र
वै व कु
<<< आपण मोठ्या मनाने काळजावर
<<< आपण मोठ्या मनाने काळजावर दगड ठेवून ती हलवली असणार!! >>>
छ्या..! कसले मोठे मन, कसले काळज अन कसला दगड?
अहो, १२ कोटी पेक्षा जास्त मराठी भाषिकांच्या प्रदेशात एखाद्या रचनेला दहा-पाच लोक कविता म्हणतात किंवा गझल म्हणतात यावर त्या रचनेचे भविष्य ठरवावे, असे एक कवी म्हणून मला कालही वाटत नव्हते, आजही वाटत नाही आणि उद्या वाटण्याची शक्यता नाही.
केवळ तुमच्या मनाला शांती मिळावी म्हणून मी गझल विभागातून कविता विभागात हलवली.
ती माझी रचना आहे, एवढे माझ्यासाठी पुरेसे आहे. मग त्याला तुम्ही गझल म्हणा की कविता, हा तुमचा प्रश्न आहे. मला त्याने काहीही फरक पडत नाही.
----------------------------------------------------
पाखरेही एकी करतात जरासे पंख फुटल्यावर
पण तुला कधी मिशा फुटणार? सांग माणूस म्हटल्यावर
या दोनोळीचा अर्थ लागतो काय? हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला.
<<पाखरेही एकी करतात जरासे पंख
<<पाखरेही एकी करतात जरासे पंख फुटल्यावर
पण तुला कधी मिशा फुटणार? सांग माणूस म्हटल्यावर
या दोनोळीचा अर्थ लागतो काय? हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला.>>
नमस्कार,
मला लागलेला अर्थ लिहीतो-
पाखराना पन्ख फुटण्यासाठी फार काळ लागत नाही. परन्तु ते सुद्धा लगेच एकी करतात. पन इथे लेखक प्रश्न करतात मानसाला, कि तु किमान मिशा फुटल्यावर तरी एकी कर पण ते ही शक्य वाटत नाही. म्हणून हा प्रश्न विचारला आहे. असे वाटते. एक आपला अन्दाज.
(धन्य)वाद नको
माणूस पण एकट्याने नाही जगू
माणूस पण एकट्याने नाही जगू शकत. मिशा फुटल्या काय आणि नाही काय.
पाखरांचा थवा म्हणजे एकी नव्हे. विचारुन बघा पोपटाला नाहीतर कावळ्याला.
या दोन ओळींचा अर्थ लावता येतो
या दोन ओळींचा अर्थ लावता येतो पण लावलेला हा अर्थ कसाही लावला तरी तो सौंदर्यपूर्ण ठरत नाही हे नक्की
या अर्थातून काही जीवनबोध घ्यावा असेही काहीच नाहीय त्यात हेही नक्की
शेर म्हणावा या योग्यतेची नाहीचय ही दोनोळी.....हेही नक्की !!
बर्डस् विथ सेम फीदर ऑल्वेस लाय टुगेदर !! .............अशी काहीशी म्हण आहे ती आठवते इतकेच !!
वैचारिक, अर्थ देण्याचा
वैचारिक,
अर्थ देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद.
पण आपण दिलेला अर्थ अपूर्ण आणि थोडासा असुसंगत वाटला मला.
--------------------------
vaaghoba,,
पाखरांचा थवा म्हणजे एकी नव्हेच. थवा म्हणजे सोप्या भाषेत कंपू म्हणता येईल.
म्हणून तर मी "एकी" हाच शब्द वापरलाय.
आणि लय किंवा वृत्त कायम राहिलेच पाहिजे असल्या अट्टाहासापोटी एकी या शब्दाला काहीही पर्यायी शब्द वापरण्याचा मोह सोडून दिला.
वैवकु, पहिल्यांदा अर्थ तर
वैवकु,
पहिल्यांदा अर्थ तर सांगा.
केवळ तुमच्या मनाला शांती
केवळ तुमच्या मनाला शांती मिळावी म्हणून मी गझल विभागातून कविता विभागात हलवली.>>>>>>>
-मी ती रचना तिथून हलवावी असा ब्र देखील बोललो नव्हतो
तुम्हालाच काय वाटलं कुणास ठावूक ?
वर मला विपूत येवून जाब विचारावा तसा प्रश्न केलात .............
मी उत्तर द्यायला आलो ,पाहतो तर काय तुमची फटफजिती झाली होती इथे
मी तुम्हाला बरं वाटावं म्हणून समजावणीच्या सुरात प्रतिसाद दिला
पण तुमचा भलताच गैरसमज झालेला दिसतोय सर ................
तुम्ही माझी थट्टा करत आहात का ते आधी "प्रामाणिक"पणे सांगा म्हणजे मी अर्थ सांगीन.............
हो............. मी सांगितलेला अर्थ पचवायची तयारी ठेवा. नंतर रडू नका............. आधीच सांगून ठेवतो
मी गय-बीय करणार नाही मग तुम्ही 'द' गंगाधर मुटे असा नाहीतर विठ्ठलपरब्रम्ह असा मी कुणाच्या बापाला घाबरत नाही ...........
हलके घ्या !
माझा मूड का ऑफ करताय सर?? मी तुमची इतकी इज्जत करतो राव ........!!
छे !!
मेन्दूचा भुगा करताय तुम्ही ....................
मी विसरणार नाही हे ...........कधीच नाही !!
हो अजून एक= ही रचना गझल विभागात हलवायला माझी हरकत नाही ,या पूर्वी नव्हती, यापुढेही नसणार आहे !!!!
आपला .................हो आपलाच !!
वै व कु
तुझ्याशी वाद घालणे असा माझा उद्देश नसतोच
तरी वेळ येते कधीकधी, डोक्यात भूत शिरल्यावर!!
<<< तुम्ही माझी थट्टा करत
<<< तुम्ही माझी थट्टा करत आहात का ते आधी "प्रामाणिक" सांगा म्हणजे मी अर्थ सांगीन.>>>>
नाही मी थट्टा करत नाही. मी अर्थ सांगा असे म्हटले त्याचा उद्देश असा की मी जे लिहिले, त्यात मला जे अभिप्रेत होते ते शब्दात उतरले किंवा नाही हे जाणून घ्यायची मला उत्कंठा आहे. जो अर्थ मला त्या दोन ओळीत दिसतो, तसा अर्थ वाचकांपर्यत पोचविण्यात माझ्या लेखणीला यश आले किंवा नाही, हे जाणून घेण्यात मला स्वारस्य आहे.
मला अभिप्रेत असलेला अर्थ त्या दोन ओळीतून प्रकट होत नसेल तर हा मथळा फसला असे म्हणावे लागेल.
मिशा फुटणे या बाबीचा एकी करणे
मिशा फुटणे या बाबीचा एकी करणे या बाबीशी काही संबंध नाही
(तुमच्या गावाकडे असा एखादा वाक्प्रचार /म्हण असेल तर जरूर कळवा)
-[बापाचा जोडा मुलाच्या पायात येवू लागल्यावर ते मित्र होतात असा एक भाषिक संदर्भ आठवतोय बस!!]
पक्षांनी पंख फुटल्यावर एकी करणे ..अशाप्रकारचे निसर्गनिरीक्षण मी तरी कुठे पाहिले नाही ऐकले नाही तसेच माणसांच्या मिशा फुटण्याबाबत म्हणेन .
एकूणच या दोन ओळी फसल्यात ................ निदान ९०-९५ टक्के महाराष्ट्र असेच म्हणेल असे मलातरी वाटते
दुसरी ओळ नक्कीच फसलीय
एकी करणे हा मुद्दा बाजूला राहून तुला मिशा कधी फुटणार असा प्रश्न विनाकारण महत्त्वाचा होवून बसतोय इथे तू एकी कधी करणार रे माणसा असे म्हणायला हवे ....तसे वाक्यरचनेतून सहज जाणवायला हवे...........इथे तसे काही होत नाही ...............आणि दोनोळी फसते !!!!!!!!
असो जास्त ताणत बसू नका
तुमचा अर्थ जसाच्यातसा सान्गा
काही का असेना अम्ही जसाच्यातसा ऐकून घ्यायचे ठरवले आहे
वैभवरावः जसाच्या तसा अर्थ
वैभवरावः
जसाच्या तसा अर्थ ओळींतून यायला हवा असेल तर मग कविता हवी तरी कशाला? रसिकाच्या ग्रहणशक्तीला कवितेने थोडेतरी ललकारले पाहीजे असे मला वाटते.
मुटेजींच्या ओळींचा अर्थ " थोडी मोठी होतात तशी पाखरेही शहाणी होतात, मग माणसा तुला केव्हा शहाणपण येणार? तू केव्हा भेदभावाविना एकत्र रहाण्याची परीपक्वता दाखवणार? " असा मी माझ्यापरीने घेतला होता.
थोडी मोठी होतात तशी पाखरेही
थोडी मोठी होतात तशी पाखरेही शहाणी होतात, मग माणसा तुला केव्हा शहाणपण येणार? तू केव्हा भेदभावाविना एकत्र रहाण्याची परीपक्वता दाखवणार? " असा मी माझ्यापरीने घेतला होता>>>>
.pradyumnasantu जी <<<मग (मराठी) माणसा तुला केव्हा शहाणपण येणार?असं तर म्हणायच नाही ना?
विभाग्रजजी: कवीला मराठी माणूस
विभाग्रजजी: कवीला मराठी माणूस अभिप्रेत दिसत नाही असे वाटते.
Pages