Submitted by जे.डी._भुसारे@y... on 17 June, 2012 - 06:10
लाखो चांदण्या नभात,
कोण उधळून देई.
उल्का तुटून येताना,
मज आठवते आई.
सडा शिंपण रांगोळी,
छान चितारली भूई.
कुंकू रेखताना कोणी,
मज आठवते आई.
थवा पक्षांचा नभात,
नक्षी गुंफण्याची घाई.
पक्षी एकांडा दिसता,
मज आठवते आई.
रात्र थकून झोपली,
कोण गातसे अंगाई.
तान्हा लुचे दिसताना,
मज आठवते आई.
तिन्ही सांजेच्या वेळेला,
का ग हंबरती गाई.
चिर निद्रेत झोपली,
मज आठवते आई.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
जबरदस्त
जबरदस्त
जे.डी भुसारेजी आईची आठवण करुन
जे.डी भुसारेजी आईची आठवण करुन दिलीत,
छान आहे.
आईची आठवण .... आवडली.
आईची आठवण .... आवडली.
गजरा माळतात, कुंकू रेखतात
गजरा माळतात, कुंकू रेखतात ,नक्षी काढतात , असे खास वापरण्याचे शब्द योग्य ठिकाणी वापरलेत तर कविता जास्त परिणामकारक होईल , गैरसमज नसावा. चांगल्या हेतूने सुचवत आहे.
रोहीत, किरण, विभाग्रज, उमेश
रोहीत, किरण, विभाग्रज, उमेश भिडे, शिल्पाजी
प्रतिसाद बद्दल अभरी आहे.
खूप छान!
खूप छान!
सुंदर कविता
सुंदर कविता
गणेश, श्यामली प्रतिसादाबद्दल
गणेश, श्यामली
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
>>गजरा माळतात, कुंकू रेखतात
>>गजरा माळतात, कुंकू रेखतात ,नक्षी काढतात , असे खास वापरण्याचे शब्द योग्य ठिकाणी वापरलेत तर कविता जास्त परिणामकारक होईल , गैरसमज नसावा. चांगल्या हेतूने सुचवत आहे.>>
शिल्पाजी नेमक तुम्हाला काय म्हणायचाय ते खरच लक्षात येत नही.
सहीये मस्त.........आईची
सहीये मस्त.........आईची आठवण.........
योगुली , प्रतिसादाबद्दल
योगुली ,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
सुंदर कविता
सुंदर कविता
वैशाली अ
वैशाली अ वर्तक,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
माझ्या कार्यालयात नव्याने
माझ्या कार्यालयात नव्याने नियुक्त झालेल्या तरुणीचा पहीला पगार हातात येण्यापुर्वीच त्या तरुणीच्या आईचे निधन झाले आणि त्यावेळेस मला वरील कविता सुचली.
खूपच छान, त्या मुलीच्या
खूपच छान, त्या मुलीच्या वाटेला जे दु:ख आलय ते कोणाच्याहि वाटेला येऊ नये पण तुम्ही आईचे योग्य वर्णन केले आहे.
कविता छान आहे . विक्रांत .
कविता छान आहे .
विक्रांत .
फारच हृदयस्पर्शी कविता.खूप
फारच हृदयस्पर्शी कविता.खूप आवडली.
मानसी विलास वैद्य ,विक्रांत
मानसी विलास वैद्य ,विक्रांत प्रभाकर, भारती बिर्जे डि...
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
अफाट!! तिन्ही सांजेच्या
अफाट!!
तिन्ही सांजेच्या वेळेला,
का ग हंबरती गाई.
चिर निद्रेत झोपली,
मज आठवते आई.
ग्रेट समारोप!
रसप, धन्यवाद.
रसप,
धन्यवाद.
छानच आहे.....!
छानच आहे.....!
सुरेख! शब्द छान गुंफले आहेत.
सुरेख! शब्द छान गुंफले आहेत.
अगदी गहिवरुन आलं वाचताना,
अगदी गहिवरुन आलं वाचताना, खुपच ह्रुदयस्पर्शी कविता..