कहाणी ऐका एका वेश्येची
पुरुषांची वासना शमविणाऱ्या साधनाची
पशुंकडून ओरबाडले जाणाऱ्या एका स्त्रीची
कहाणी ऐका एका वेश्येची.....
बालपण सगळ चिखलातच गेल
आईच दुधपण बाटलीतूनच पिल
जगायचं रडगाण पण लवकरच कळल
कहाणी ऐका एका वेश्येची....
शाळा कसली माहीतच नाही
शिक्षणाचा तर मला गंधच नाही
भातुकलीचा खेळ ठाऊकच नाही
पशूंचा सहवास तर नवीनच नाही
कहाणी ऐका एका वेश्येची.....
संसार पडलाय उघड्यावर
सुहागरात्रही केली दुसऱ्याबरोबर
संसाराचा गाडा माझ्याच देहावर
कहाणी ऐका एका वेश्येची.....
रात्र-रात्र ज्यांनी आम्हाला जागविल
वेश्या-वेश्या म्हणून त्यांनीच हिणवल
समाजातील घाण म्हणून गावाबाहेर हाकलल
कहाणी ऐका एका वेश्येची....
तान्हुल्याला माझ्या मात्र मी घडविलं
नरकातून या बाहेर ढकललं
आमच आयुष्य असच गंजल
त्याच्या तरी आयुष्यात नंदनवन फुलविल
कहाणी ऐका एका वेश्येची....
या जगात वेश्या असूनही ४ वर्षांच्या चिमुरडीपासून ते ८० वर्षांच्या आजींवर देखील बलात्कार होतो. त्या जर नसत्या तर स्त्रियांना जगणे अशक्य झाले असते.....
या जगात वेश्या असूनही ४
या जगात वेश्या असूनही ४ वर्षांच्या चिमुरडीपासून ते ८० वर्षांच्या आजींवर देखील बलात्कार होतो. त्या जर नसत्या तर स्त्रियांना जगणे अशक्य झाले असते.....>>>>>>>>>>>>>>>
चिंतनीय!!!
फारच दुर्लक्षित केलेला अवघड विषय तुम्ही हाताळला आहे. तुम्हाला शक्य झालं तर एखादा लेखही लिहा या विषयावर.
सामाजीक विषय हाताळलाय
सामाजीक विषय हाताळलाय आपण,
पुढच्या लेखनाला शुभेच्छा!
खरेच या विषयाच्या याही पैलुचा
खरेच या विषयाच्या याही पैलुचा विचार व्हायला हवा.............
चिंतनीय!!!>>>>> +१
सामाजीक विषय हाताळलाय आपण,
पुढच्या लेखनाला शुभेच्छा! >>>>> + १
पुढच्या लेखनाला शुभेच्छा!
पुढच्या लेखनाला शुभेच्छा!