श्वासनि:श्वास मातीचे
http://www.youtube.com/watch?v=jWxFqS-H_l4&feature=plcp
अंगणात निरुद्देश पाय लांबवून बसण्यात किती सुख असतं.
अंगणावरच्या आकाशाचे रंग सतत बदलत असतात.ऋतुप्रमाणे.प्रहराप्रमाणे.आपल्यालाच बहुधा वेळ नसतो.सकाळीच अंगण ओलांडून जाणे आणि अंधारताना परत येणे एवढेच अवतारकार्य असते आपले.
पण एक दिवस असाही उजाडतो की कुठेही जाण्याचे कसलेच प्रयोजन नसते आपल्याकडे.कुठलीच पळवाट अंगणापासून आपल्याला दूर बोलावत नाही.
अंगणात निरुद्देश पाय लांबवून बसण्यात किती सुख असतं.
आपण विचार करतोय आयुष्याचा,उद्देशांचा,स्वप्नांचा ज्यांच्यामागून आपण रोज फरफटत जात असतो.विचार हरवलेल्या श्रेयांचा अन काळांचा.
आपण विचार करतो मग अंगणाचा अन आकाशाचाही..या संपूर्ण क्षणात सामावलेल्या जाणिवांचा.
वर हा आकाशाचा निळा तुकडाही आता तापून पोलादी रंगाचा होईल्.पहाटवार्याच्या उरल्यासुरल्या झुळुका झळांमध्ये परिवर्तित होतील.आयुष्यासारख्याच.
पण आज असे होत नाहीय.आपले लक्ष्यही नसताना आज झुळुकांमध्ये एक ताजेपणाची लहर मिसळलीय्,आणि हवेतही एक सुगंध.का आपण गतकालरंजनाच्या आवर्तात खेचले जातोय?
आपल्या पावलांवर ऊन शिवाशिवी खेळतंय.कारण गोड सावळ्या सावल्या उन्हाला घेरताहेत्.उबदार आणि शीतल संवेदना आलटून पालटून.जसे सुखातले दु:ख. दु:खातले सुख.
एखादे जुने गाणे अर्धवट आठवावे अशी आपली हुरहुरती मनोवस्था आहे ?की हे नवेच काही आकाराला येतेय? अचानक स्तब्ध होऊन आपण ऐकतोय..
आपण आणि आसमंत एकाच गाण्याची लकेर झालोय.पावसाचे गाणे.
कारण अंगणाचे नि:श्वास आकाशात मिसळले आहेत.मातीचे श्वासनि:श्वास मळभ बनून आले आहेत..
भारती बिर्जे डिग्गीकर
सुंदरच लिहीलंय!
सुंदरच लिहीलंय!
सुंदरच लिहीलंय! >>> +१ गाणे
सुंदरच लिहीलंय!
>>>
+१
गाणे ऐकतेय. छानच आहे हे पण!
वा सुंदर लिखाण.
वा सुंदर लिखाण.
ग्रेट लिहिलंय......
ग्रेट लिहिलंय......
धन्स
धन्स बागेश्री,निंबुडा,जागू,शशांकजी..थोडीशी अडनिडी ,पावसाची असूनही कमी निसर्ग सौंदर्याची, कमी भावुकतेची रचना..
shvaas-nishvaas maateeche
shvaas-nishvaas maateeche aale maLabh abanUn... kitee suMdar kalpanaa an kite taakadavaan... shabdarachanaa. bhaaratee, hyaa ekaa oLeevar thaaMbalech... aaNi ajUn thaaMbUn aahe.
>>आपण आणि आसमंत एकाच गाण्याची
>>आपण आणि आसमंत एकाच गाण्याची लकेर झालोय.
क्या बात है....
असं आजकाल फार क्वचित अनुभवाला येतं... पण जेव्हा-केव्हा येतं तेव्हा खूप छान 'विश्रांती' मिळते....
धन्स दाद, चैतन्य . दाद, तुझं
धन्स दाद, चैतन्य . दाद, तुझं अंगण आणि आभाळ वाचून ही स्मरली.
खूप पूर्वी जेव्हा वांद्र्याच्या घरातून समुद्र अन चेंबूरचे डोंगर दिसत तेव्हाची ही रचना.
मिलिंद सोमण - माझे सहकारी-स्नेही यांनी अशा मूलत: कविता असलेल्या काही रचनांना गीतरूप दिले होते त्यातली ही एक.गाण्यातलं फीलगुड थोडं कमीच असेल तिच्यात, कविता वाचण्याची आवड असेल तर ती आवडण्याची शक्यता जास्त.
आश्चर्य म्हणजे या रचनेला २००५ चं अल्फा गौरव पुरस्कार मिळाला सर्वोत्कृष्ट गीत म्हणून. ! चक्रावून गेले मीच. असंही घडतं कधीकधी.
खूपच सुंदर. >> आपण आणि आसमंत
खूपच सुंदर.
>>
आपण आणि आसमंत एकाच गाण्याची लकेर झालोय.पावसाचे गाणे.
कारण अंगणाचे नि:श्वास आकाशात मिसळले आहेत.मातीचे श्वासनि:श्वास मळभ बनून आले आहेत.. >>
खूप मस्त लिहिलंय.
अरे देवा ! भारती....ही कमालच
अरे देवा ! भारती....ही कमालच झाली म्हणतोय मी.... इथे आपली ओळख होऊन बराच कालावधी लोटलाय पण मला हा वर्षापूर्वीचा तुमचा "अल्फा गौरव पुरस्कार" मिळालेला गौरव माहीत नव्हता, ना हा धागा वाचनात आला. कमालच आहे तुमची की तुम्ही कधी याचा उल्लेखही केला नाही.
श्वासनि:श्वास मातीचे....मुंबईत राहूनही ही कल्पना तुम्ही मनी वसविलीत [जिथे शेतातील माती दिसणार तरी कुठली ?] आणि जणू काही शहरी जीवनापासून शेकडो मैल दूर राहून निसर्गसौंदर्यात मग्न झालेल्या व्यक्तीने ही रचना तेथील अनुभवाच्या जोरावर केली आहे अशी जी प्रतिमा कागदावर आणली ती आनंदित करून गेली आहे.
स्वप्नीलच्या आवाजाने आणि श्री.मिलिंद सोमण यांच्या संगीतरचनेने तुमच्या शब्दाला जो आकार दिला आहे तो श्रवणीय झाला आहे.
अभिनंदन....भारती.
अशोक, हा पुरस्कार मीही विसरून
अशोक, हा पुरस्कार मीही विसरून गेलेय. ठरवून काहीच केले नाही ,तो एक सुखद अपघात होता.'चंद्रस्वप्न एकले' हे त्या अल्बमचे नाव होते,ज्यातल्या आठही रचना माझ्याच होत्या. संगीतकाराचाही हा पहिलाच प्रयत्न असे असल्याने या प्रयोगात काही कसर अवश्य असेल, पण तरीही खूप आनंददायक अशी ही निर्मिती, त्या निमित्ताने झीच्या भव्य पुरस्कार सोहळ्यात स्वप्नवत सहभाग झाला अन मराठी चंदेरी दुनियेचं एक थरारक दर्शनही.आपण नेहमी म्हणतो की पुरस्कारांमध्ये वशिलेबाजी असते तर कधीकधी तसे नसतेही असे स्वानुभवावरून मी म्हणू शकेन.
अंगणात निरुद्देश पाय लांबवून
अंगणात निरुद्देश पाय लांबवून बसण्यात किती सुख
असतं.
आपण विचार करतोय
आयुष्याचा,उद्देशांचा,स्वप्नांचा ज्यांच्यामागून
आपण रोज फरफटत जात असतो.विचार
हरवलेल्या श्रेयांचा अन काळांचा.
आपण विचार करतो मग अंगणाचा अन
आकाशाचाही..या संपूर्ण क्षणात
सामावलेल्या जाणिवांचा.>>>>>> __/\___
मस्त लिहेलस ... आवडल
मिलिंद सोमण - माझे सहकारी-
स्नेही >>>> हे कधीपासून ग
झाई उर्फ जस्मिन , तुला एकच
झाई उर्फ जस्मिन , तुला एकच मिसो माहितेय. हे आमचे साधेसुधे मिसो एक कार्यतत्पर सहकारी जे आता दुबईला असतात सहपरिवार.. त्यांचा पेज थ्रीशी काही संबंध नाही अन त्यांचे मराठीही अतिशय चांगले आहे .