केळ्याचे गोड आप्पे, शेवग्याचे कबाब - शेफ विष्णू मनोहर यांच्या पाककृती

Submitted by चिनूक्स on 14 September, 2008 - 03:03

मायबोली गणेशोत्सवाकरता सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी दिलेल्या खास पाककृती
---------------------------------------------------------------
. केळ्याचे गोड आप्पे

गणपतीला नैवेद्यासाठी हे आप्पे करता येतील.

लागणारा वेळ :
१० मिनिटे

साहित्य :
केळी - ३
ओले खोबरे (खवलेले) - १ वाटी
जाड तांदूळ (भिजवलेले) - १ वाटी
दलिया - १ वाटी
गूळ - अर्धी वाटी
Eno - अर्धा चमचा

कृती :
सर्वप्रथम तांदूळ व दलिया दळून घ्यावे.
नंतर या मिश्रणात केळी, गूळ, खोबरे एकत्र करून शेवटी eno घालावे.
आप्पेपात्रात हे मिश्रण झाकण ठेवून ६-७ मिनिटे मोठ्या आचेवर गॅसवर ठेवावे.
काढताना बाजूने तूप घालून काढावेत.

वाढणी :
२ माणसांसाठी

---------------------------------------------------------------

१०. शेवग्याचे कबाब

शेवग्याच्या शेंगांची भाजी किंवा आमटी केली जाते. पण याच शेंगा वापरून केलेला हा अतिशय पौष्टीक पदार्थ. अतिशय झटपट होणारा.

लागणारा वेळ :
१५ मिनिटे

साहित्य :
शेवग्याच्या शेंगांचा गर
(शेंगा उकडून बियांसकट काढलेला) - १ वाटी
अख्खे मूग भाजून केलेला भरडा - १ वाटी
कोथिंबीर (बारीक चिरून) - ५-६ चमचे
आमचूर पावडर - अर्धा चमचा
तिखट - अर्धा चमचा
हळद - अर्धा चमचा
चाट मसाला - अर्धा चमचा
मीठ (चवीनुसार)
तेल

कृती :
वरील सर्व साहित्य एकत्र करून १० मिनिटे भिजवून ठेवावे (साधारण पोळ्यांसाठीच्या कणकेइतपत घट्ट).
नंतर या मिश्रणाचे वडे थापून तेलात shallow fry करावे.
हे कबाब टोमॅटो केचपबरोबर खायला द्यावेत.

वाढणी :
२ माणसांसाठी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा.. करून पण बघितलेस का? भारतात कधी येतो आहेस? Happy

अरे हो.. रविवार सकाळसाठी एकदम फिट्ट आहे Happy
भारतात आता बहुतेक थेट डिसेंबरमध्येच..