वट पोर्णिमा

Submitted by Sanjeev.B on 4 June, 2012 - 12:06

ए मृ आज वट पोर्णिमा आहे ना गं, चल ना ऑफिस च्या खाली बॅनयन ट्री आहे ना, तिथे आपण बॅनयन ट्री ला रोटेट करुन होली थ्रेड टाय करुया.

ए हो गं चल.

पण एक प्रॉब्लेम आहे गं, सेवेन जन्म हाच हझबंड मिळणार गं.
अगं ते राहु दे, पण मला तर दुसराच प्रश्न भेडसावत आहे.
ए कोणता गं
अगं सातो जन्म हाच नवरा चालेल गं मला, पण सातो जन्म हीच मदर इन लॉ म्हण्जे...... टु मच गं.
ए टु मच कुठे गं, सेवन मच झालं ना. Wink
ए बरोबर, मला कसे नाही सुचले. Proud

ए ऐक ना माझी मदर इन लॉ नी मला आज फास्ट करायला सांगितले, तर मीच त्यांना उलट सांगितले, मॉम तुम्ही पण करणार ना उपवास, तर मला सांगतात कसे, माझे सर्व करुन झाले आहे हो.
हे म्हणजे असे झाले, एक तर एव्हढे पेन घेऊन उपवास करायचे ते करायचे आणि वर प्राईझ म्हणुन ही असली मदर इन लॉ, oil ही गेले, ghee ही गेले and in hand came धुपाटणे.

काय गं ह्यात oil कोण, ghee कोण गं, आणि धुपाटणे मीन्स तुझी मदर इन लॉ ना गं.

ए ऐक ना, माझी नणंद असते ना अमेरिकेत, तिने किनै मागच्या वर्षी लॅपटॉप वर बॅनयन ट्री चे इमेज गुगल वर शोधले आणि ते इमेज डेस्कटॉप वर सेव्ह करुन त्या इमेज वर हळद आणि कुंकु throw केले आणि लॅपटॉप च्या around रोटेटली.

ए पण मी आज जीन्स घातले आहे गं, साडी नाही नेसले, ते साडी नेसुन ट्रेन मधुन फार त्रास होतं गं,आणि त्या साडी मध्ये कित्ती uncomfortable वाटतं गं, जीन्स घालुन बॅनयन ट्री ला रोटेटणार तर चालणा ना गं.

Proud Wink

- संजीव बुलबुले / ०४.जुन.२०१२

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त

कालच्या मटा मधला विनोद
सासवांनी वडाला ७ फेर्‍या मारल्या.
सुनांनी ७ वेळा वडाला like केले.

मी काहिच केले नाही म्हणून नवरा खूश Happy

विनोदी लेखन म्हणून ठिक आहे पण आपणच आपल्या परंपराची त्यातील चांगले काय ते न घेता अशी खिल्ली उडवायची हे काही बरे नाही. असेल अशी वस्तुस्थीती काही ठिकाणी पण सरसकट ..... सगळ्यांना एका गणतीत घेणे योग्य नाही Sad

विनोदी लेखन म्हणून ठिक आहे पण आपणच आपल्या परंपराची त्यातील चांगले काय ते न घेता अशी खिल्ली उडवायची हे काही बरे नाही>>>

ह्यात नक्की चांगली परंपरा काय आहे? कुतुहल म्हणून विचारते कारण मी, माझी आई किंवा बहिण आम्ही कोणीच वट पोर्णिमेला काही करित नाही.

विनोदी लेखन म्हणून ठिक आहे पण आपणच आपल्या परंपराची त्यातील चांगले काय ते न घेता अशी खिल्ली उडवायची हे काही बरे नाही>>>

अगदि बरोबर

विनोदी लेखन आहे म्हणुन Rofl करायचे आणी सोडुन द्यायचे. नाहीतर चर्चासत्र असतेच की इतर वेळेला. Proud

Happy
जरा अवांतर - मी काल आमच्या ईथल्या व्याघ्रेश्वर मंदीरात गेलेले. तर तिथल्या वडाला काही पुरुष सुध्दा फेर्‍या मारत होते. Uhoh

धन्यवाद उदय, झंपी, वेका, पापु, योगुली, नताशा, सारीका, अभिषेक, सुरश, मंदार, नताशा, गिरी, रिया सस्मित.

सस्मित | 5 June, 2012 - 17:30
जरा अवांतर - मी काल आमच्या ईथल्या व्याघ्रेश्वर मंदीरात गेलेले. तर तिथल्या वडाला काही पुरुष सुध्दा फेर्‍या मारत होते<<<< ते नक्किच रिवर्स फेर्‍या मारत असतील Proud

ह्यात नक्की चांगली परंपरा काय आहे? कुतुहल म्हणून विचारते कारण मी, माझी आई किंवा बहिण आम्ही कोणीच वट पोर्णिमेला काही करित नाही.>>>>> आपण एका झाडाची पुजा करतो, असे झाड जे कित्येक वर्ष जगते आणि पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी मदत करते, ह्या झाडाची जास्त काळजी घ्यावी लागत नाही इ. माझ्या मतानुसार हा पुर्वीचा "गो ग्रीन" कन्सेप्ट्च आहे Happy ह्याचा फायदा मी नक्की एवढा सांगु शकते की आपण झाडाचीही पुजा करतो तर त्याला तोडायचे कसे? हा प्रश्न माझ्या मुलाने ४ वर्षाचा असतानाच विचारला होता Happy Happy Happy

पुर्वी मी ह्या निमीत्याने वडाची झाडे वाण म्हणून द्यायचे, आता सर्व जणींना त्यांची वाणे, त्यातल फळे एकत्र करायला सांगते आणि हे सामुहिक वाण अनाथ आश्रमात नेऊन देते Happy Happy Happy

आता पुढच्या वर्षी तुम्ही, तुमच्या आई किंवा बहिण -- सर्वजणी मिळून असे व्रत करा, बघा ह्या व्रताचा आणि देण्याचा आनंद किती मिळतो ते Happy Happy Happy

आपण झाडाचीही पुजा करतो तर त्याला तोडायचे कसे?

पण वट पोर्णिमेला तर झाडाच्या फांद्या विकयला असतात.

झकास . वट वट सावित्री
त्या इमेज वर हळद आणि कुंकु throw केले आणि लॅपटॉप च्या around रोटेटली.> गडबडा लोळलो ..

आज एक समस आला जो तुझ्या लेखात अगदी फिट्ट॑ होवुन जाइल -

वडाच्या झाडाला घालते फेर्‍या राउंड & राउंड
वडाच्या झाडाला घालते फेर्‍या राउंड & राउंड
पण पुढच्या जन्मी हा नवरा should not be found.

काय गं ह्यात oil कोण, ghee कोण गं, आणि धुपाटणे मीन्स तुझी मदर इन लॉ ना गं. .. >> टु मच Rofl

वटपौर्णिमेच्या परंपरेची खिल्ली नसून, आजकालच्या मुलींच्या बोलण्याची खिल्ली आहे. वटपौर्णिमा काय किंवा एलेफंट गॉड्स फोर्थ काय, किंवा फेस्टिव्हल ऑफ लाईट्स काय किंवा अगदी रेव्ह पार्टी काय, खिल्ली आजकालच्या 'मराठी' बोलणार्‍या लोकांची आहे.

हे असेच आजकाल बोलतात का? याचे कुठे व्याकरणाचे पुस्तक आहे का? मला नक्की माहित नाही की कुठल्या शब्दांच्या जागी इंग्लिश शब्द नि कुठे मराठी वापरायचे. ते जमले नाही तर पुण्या मुंबईत माझे हसे होईल ऑक्टोबरमधे जाइन तेंव्हा.

धन्यवाद विनय, मुकु, मनिमाऊ, किट्टु, अमित, अक्षयकुमार आणि झक्की काका.

वटपौर्णिमेच्या परंपरेची खिल्ली नसून, आजकालच्या मुलींच्या बोलण्याची खिल्ली आहे.<<< Lol