Submitted by आनंदयात्री on 3 June, 2012 - 01:49
आज, ३ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
नेहमीचाच, पण जाहीर चर्चेसाठी थोडासा वेगळा असा विषय वाटतोय...
सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाळीव कुत्री त्यांच्या
पाळीव कुत्री त्यांच्या "जाती"नुसार वेगवेगळी कामे करतात किंबहुना त्यांनी ती ती स्पेशलाइज्ड कामे करावीत म्हणूनच त्यांचे ब्रीडींग केले जाते. हेच मानवाच्या बाबतीत लागू आहे/असावं, असं म्हणायचंय का तुम्हाला? म्हणजे श्वेतवर्णी मानवाने केवळ आपले दिखाऊ मिजास करावी (पोमेरियन सारखी), कृष्ण्वर्णीय( तुमच्या भारतीय मनाला तुम्ही कोब्रा असल्यामुळे श्वेतवर्णीय मानत असला तरी जगभर तुम्ही-आम्ही काळेच बरं!)लोकांनी गुलामगिरी करावी इ.इ?
>>> एक शंका. >>>त्या
>>> एक शंका.
>>>त्या कुत्र्यांमधे महाग असतात नं, त्या बहुतेक ठरवून 'ब्रीड' केलेल्या विकृती असतात. उदा. >>>बुटक्या पायांचं कुत्रं, नकट्या नाकाचं इ.इ. <<<< नाही, प्युअर अल्सेशियन/जर्मन शेफर्ड व लॅब्रेडॉर या सारख्या जातीच्या कुत्र्याच्या मागिल साताठ पिढ्यान्चा इतिहास ठेवला जातो, ते प्युरिटी करता, विकृत हायब्रीड करता नाही. अन प्युरीटी करता किम्मत जास्त अस्ते.
>>>> घोड्यांचं म्हणाल तर घोडेबाजी आजकाल फक्त विजय मल्ल्या सारख्याला परवडते, अन रेस कोर्सवर जाऊन पैसे वगैरे लावणे हे फक्त बाबा कदमच्या कादंबरीत दिसते. <<<<
नाही. सारसबागेबाहेर पोराटोरान्ना फिरविणार्या घोडेवाल्यान्पासून ते लग्नातील घोडनवर्याला घोड्यावर बसवुन मिरविणार्यान्पासून रेसच्या घोडेस्वारीपर्यन्त हा शोक पाळला जातो. सामान्य माणसाचा हल्ली सम्बन्ध नाही, पण अजुनही भटक्या जमातीतील लोक देखिल घोडे/खेचरे/गाढवे पाळतात, त्यान्चे बाजारही असतात. अन तिथेही घोड्याची देखिल "जात" बघितलीच जाते.
>>>> बाकी तुम्हाला तुमच्यात अन कुत्र्या/घोड्यांत साधर्म्य जाणवत असेल, <<<<< हा तुमचा करुन घेतलेला गैरसमज, साध्यर्म्य कुत्र्या/घोड्याबरोबर केलेले नाहीये, तर मनुष्यजमात, कुत्र्यामान्जरीघोड्यान्च्या जातीचे देखिल प्युरिटी बघते, तर माणसाची का नाही बघणार असा विषय आहे.
>>>> तर त्याला आमचा नाईलाज आहे. <<< यात मला जराही शन्का नाही
>>>> अन तुमच्या पोस्टींवरून तुमची किम्मत किती करायची हो? रुपयांत की डॉलरात? <<<< ब्राह्मण म्हणून माझेकडून काही काम करुन घेतल्यास रुपया/डॉलर/धान्य/पैका-अडका/वस्त्र, अशा कशातही घसघशीत "दक्षिणा" द्यायला काचकूच करू नका.!
मला ती टाळ्यान्ची जीआयएफ
मला ती टाळ्यान्ची जीआयएफ आवडली, अजुन अशा स्पेशल अस्तील तर टाकत जा

अहो सगळी अॅडव्हर्टायझिन्ग दुनिया "वर्णभेदाच्या" जाहिरातीन्न्वरच जगत्ये, अन तुम्ही काय म्हणता की कुणी वर्णभेद पाळत नाही?
म्हणूनच मी म्हणतो, लोक आदर्शवादाचे देखिल "ढोन्ग" करतात, बाहेर वर्णभेद वगैरे पाळू नका म्हणतात, अन घरात जाऊन, निरनिराळी लोशने/मलमे यान्चे लेपच्या लेप अन्गाला फासतात! 
पण,
>>>>कृष्ण्वर्णीय( तुमच्या भारतीय मनाला तुम्ही कोब्रा असल्यामुळे श्वेतवर्णीय मानत असला तरी जगभर तुम्ही-आम्ही काळेच बरं!)लोकांनी गुलामगिरी करावी इ.इ? <<<
यातिल "युरोपिअन वन्शियान्द्वारेचा वर्णभेद" अन "हिन्दु धर्मान्तर्गत जातीभेद" यात काहीच फरक नाही होत? की आपले उगाच टाळ्या वाजवित सुटायचे?
अन वर्णभेदाला युरोप अमेरिकेतच जायला नकोय, इत्थे पुण्यातच देखिल "बायको/नवरा काळा/काळी चालू शकेल" असे म्हणणारे दाखवुन द्या, नि हजार बक्षिस मिळवा
पुन्हा सान्गतो, काळ्यागोर्यातील वर्णभेद अन हिन्दु धर्मान्तर्गत चातुर्वर्ण्य या वेगवेगळ्या बाबी आहेत.
लिंबु, तुम्हाला काही समजेल
लिंबु, तुम्हाला काही समजेल अशी अपेक्षा नव्हतीच.
उगाच स्मायल्या टाकल्याने आणि विषयाशी संबंधित नसलेले मुद्दे टाकल्याने तुमचे म्हणणे खरे होत नाही.
मुद्दा एवढाच आहे की कुत्र्या-गाढवं-घोड्यांच्या जाती बघतात तसं मानवाच्या बघण्यात अर्थ नाही कारण:
मानवाची जात आणि त्याचे स्किल्स व त्यानुरुप काम (प्रोफेशन) निगडीत नाहीत. असायची गरज नाही. उदा. सुनील गावस्करचा मुलगा किंवा वडील दोन्ही त्याच्याइतके चांगले क्रिकेट खेळत नाहीत. तसेच एखादा रस्ता झाडण्याचं काम करत असला तरी त्याच्या मुलाने/मुलीने शिक्षक्/गायक/अंतराळवीर बनु नये/ बनु शकणारच नाही, असंही नाही. (हे मी काय नवीन सांगत नाहीये, याआधी अनेक थोर लोकांनी साम्गूनही प्रकाश पडलेला दिसत नाहीये, म्हणून पुन्हा एकदा..असो.)
आणि तुम्ही जे समर्थन करताय त्याचं कारण तुम्ही भारतीय जातव्यवस्थेत वरच्या पायरीवर आहात. पण तेच लॉजिक जर जगभरातल्या माणसांवर लावयचं ठरवलं तर तुम्ही "काळे" म्हणून गुलामी"च" करावी अशा विचारांचीही लोक जगात आहेत, याचा विसर कसा पडतो? त्यासाठी ते वरचे उदा. होते. आतातरी कळलं का?
<<
<< कुत्र्यामान्जरीघोड्यान्च्या जातीचे देखिल प्युरिटी बघते, तर माणसाची का नाही बघणार असा विषय आहे. >>

माणसाला कुत्र्या मांजराप्रमाणे विकायला काढले तर नक्कीच अशी 'प्युरिटी' बघितली जाणार .

अता इथेच कोणाच्या तरी प्रतिसादात होते ना , आम्हाला को.ब्रा. आई , बाप , आजी , आजोबा असलेलीच मुलगा / मुलगी हवी लग्नाला म्हणुन. ठरवून लग्न हा बाजार आहेच आणि त्यात आहेच या 'प्युरिटी' ला महत्व. तुम्हाला स्वतःला विकायचे असेल किन्वा दुसर्याला विकत घ्यायचे असेल तर 'प्युरिटी' हवीच हो
छान चर्चा!
छान चर्चा!
>>> ठरवून लग्न हा बाजार आहेच
>>> ठरवून लग्न हा बाजार आहेच आणि त्यात आहेच या 'प्युरिटी' ला महत्व. तुम्हाला स्वतःला विकायचे असेल किन्वा दुसर्याला विकत घ्यायचे असेल तर 'प्युरिटी' हवीच हो <<<

हेच ते सगळ्यात महान सत्य आहे. की जग म्हणजे बाजार आहे.
केवळ लग्न वा इतर बाबीच कशाला? साधे नोकरी/व्यवसायात देखिल तेच अस्ते, आईबाप्/अपत्ये यान्चे आवडते/नावडते नातेसंबंधात देखिल छुपेपणाने का होईना, तेच्च अस्ते. आम्ही उगाचच आदर्शवादाचा बुरखा ढोन्गीपणे पान्घरुन जगत अस्तो. साधा मन्डईतुन आम्बा आणायचा तर आम्हाला शक्यतो रायवळ/तोतापुरी वगैरे नको अस्तो, घेतला तर पायरी रसा करता, अन फोडी करुन पावण्यारावण्यान्समोर मान्डण्याकरता हापुसच हवा अस्तो, बर तर बर, नुस्ता हापुस नै चालत, तो रत्नागिरी-देवगड अस्ला तर अधिक चान्गले! मग त्याकरता आम्हि हजारात देखिल रुपये मोजतो. आम्ब्याची देखिल जात बघतो, तर माणसाचि नै बघणार? बघत नाही? न बघणारे अतिमहान अस्तील, आम्ही तर बोवा सामान्यातील अतिसामान्य माणसे, आम्ही बघतो बोवा. अन आयुष्याचा जोडीदार वगैरे निवडताना तर नक्कीच बघतो! अजुनतरी अशा बघण्यावर कायद्याने बन्दी नसल्याने, तो "गुन्हा" होत नसावा असे वाटते, उद्याचे माहित नाही!
लिंबूमहाराज, कुत्रा/आंबा
लिंबूमहाराज, कुत्रा/आंबा यांच्या प्रजातींमधले भेद निसर्गदत्त आणि दृश्यमान असतात तसेच माणसांच्या जातींमधलेही(वंशातले नव्हे) असतात का असा प्रश्न मागल्या पानावर विचारण्यात आलेला आहे. त्याला आपण बगल दिलेली दिसते. आताही द्या.
तुम्हाला जातीसंवर्धनाच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा!
अहो तुमचे आंब्यांचेच उदा.
अहो तुमचे आंब्यांचेच उदा. पुढे चालवायचे ठरवले तर असंही म्हणता येईल की माणसांत तोतापुरीलाही हापुस लागू शकतो. (चित्रकाराचे मुल गायक होऊ शकते ना, तसे!) हा फरक आहे ना माणसात आणि आंब्यात्-कुत्र्यात्-गाढवात!
मग जात बघून विशेष काही साध्य होत नाही हो! 
नताशा, हे त्यांना मान्य
नताशा, हे त्यांना मान्य नाही.
"माणसाचे वर्तन जातीनुरूप ठरते, पिढ्यांपिढ्यांचे संस्कार गुणसूत्रांतून संक्रमित होतात" असा त्यांचा दावा आहे. सार्वजनिक स्वच्छतेशी संबंधित एका धाग्यावर वाचल्याचे आठवते.
नताशा, तुम्हाला काही कामे
नताशा, तुम्हाला काही कामे नाहित का?
तुम्हीपण लिंबूला शुभेच्छा द्या बघू भरत सारख्या.
लिंबू, काहीवेळा अत्युत्तम ब्रीड मिळण्यासाठी क्रॉस सुद्धा करतात. आणि हापूस हापूस तरी काय असतो , एक बारकिशी हापूसची फांदी रायवळच्या मूळ झाडासोबत कलमच करतात ना! की आपलं लावली हापूसची बाठ आणि आलं हापूसचं झाड असं होतं ? कोंकणी ना तुम्ही आमच्यासारखे , तुम्हाला हे माहिती असायला हवं!
माणसात प्रॉब्लेम एव्हढाच आहे
माणसात प्रॉब्लेम एव्हढाच आहे की कोणती जात 'हापूस' आणि कोणती 'तोतापुरी' हे कोण ठरवणार ? आणि परत एखाद्याला हापूस पेक्षा तोतापुरी जास्त आवडू शकतो आणि एखाद्याला आंबाच आवडत नाही
बाकी करा की हव्या त्या जातीत लग्न , कोणीही बंदी करत नाहीये. मिळत असेल 'प्युअर'जोडीदार तर खुशीने करा.
पण आमच्या जातीतल्या प्युअर मुलीच मिळत नाहीयेत , असलेल्या मुली परजातीत/ पोटजातीत लग्न करातायेत. म्हणुन उर बडवायचे आणि अशा मुलींना / पालकांना नावे ठेवत बसायचे असा ट्रेन्ड जास्ती दिसतोय.
साती आज खरंच नाहीत. आज
साती
आज खरंच नाहीत. आज सुट्टीवर!
हे आंबा-घोडे लॉजिक लहानपणी ऐकले तेव्हा खरे वाटले होते. नंतर विचार केल्यावर फोलपणा कळला. त्यामुळे ज्यांना खरंच अजूनही तसेच वाटते, त्यांना जीव तोडून सांगावे वाटते.
पण आमच्या जातीतल्या प्युअर
पण आमच्या जातीतल्या प्युअर मुलीच मिळत नाहीयेत , असलेल्या मुली परजातीत/ पोटजातीत लग्न करातायेत. म्हणुन उर बडवायचे आणि अशा मुलींना / पालकांना नावे ठेवत बसायचे असा ट्रेन्ड जास्ती दिसतोय.<<<
नुसते उर नाही बडवायचे तर अश्या मुलींना आणि पालकांना बहिष्कृत करायची, इजा करायची स्वप्ने बघायची. काही फरक नाही 'खाप'रांच्यात आणि यांच्या मानसिकतेत. फक्त यांना कायद्याचं भय असल्याने जोर सगळा बडबडीमधेच.
बाकी माणसे, जोडीदार ही
बाकी माणसे, जोडीदार ही कन्झ्युमर प्रॉडक्टस समजायची का आता?
बाकी माणसे, जोडीदार ही
बाकी माणसे, जोडीदार ही कन्झ्युमर प्रॉडक्टस समजायची का आता?

>> मी अगदी हेच म्हणणार होते. पण अजून माझ्याकडून नको वाद वाढवायला, म्हणून लिहिले नव्हते. खरं म्हणजे या लोकांसाठी स्त्रिया या कन्झ्युमर प्रॉडक्टसपेक्षा वेगळ्या नाहीतच.
प्युअर ब्लड, हाफ ब्लड, मडब्लड
प्युअर ब्लड, हाफ ब्लड, मडब्लड ......
रोलिंगबाई खरंच महान आहेत.
प्युअर ब्लड, हाफ ब्लड, मडब्लड
प्युअर ब्लड, हाफ ब्लड, मडब्लड ......
रोलिंगबाई खरंच महान आहेत.
>>> +++++++
प्युअर ब्लड, हाफ ब्लड, मडब्लड
प्युअर ब्लड, हाफ ब्लड, मडब्लड ......
रोलिंगबाई खरंच महान आहेत.

>>> +++++++
हायला, माझ्या नावाने आय डी
हायला, माझ्या नावाने आय डी निघाला.. जागो मोहन प्यारे. गजानन कागलकर ..
लिंबाजीराव, >>>ब्राह्मण
लिंबाजीराव,
>>>ब्राह्मण म्हणून माझेकडून काही काम करुन घेतल्यास रुपया/डॉलर/धान्य/पैका-अडका/वस्त्र, अशा कशातही घसघशीत "दक्षिणा" द्यायला काचकूच करू नका.!<<<
कृपया हलके घेणे.
'ब्राह्मण' म्हणून तुम्ही माझे कोणतेच काम करू शकत नाही हो.
ज्यांनी शिक्षण दिले, ते शिक्षक होते. 'ब्राह्मण' अशी जात होती काहींची, पण त्यांनी ब्राह्मण म्हणून कधीच शिकवल्याचे आठवत नाही.
लगीन मी रजिस्टर केले. रजिस्ट्रार एक गायकवाड म्हणून होते. त्यांनी शपथ वाचून दाखविली, मी अन सौ.नी सह्या केल्या. यातही कुणी ब्राह्मण म्हणून काही केल्याचे आठवत नाही.
पिढीजात नास्तिक आहे. सबब माझ्याकडे साग्रसंगीत 'धर्म कार्ये' होत नाहीत.
मी 'गेल्या'वर नक्की च नरकात जाईन अशी तुमच्या सहित माझ्या सर्वच हितचिंतकांची खात्री आहे. सबब, ब्राह्मण म्हणून मला स्वर्गात पोहोचविण्यासाठीही तुम्हाला कुणी दक्षिणा देतील असे वाटत नाही.
या व्यतिरिक्त, ब्राह्मण म्हणून तुम्ही माझे काय काम करू शकता ते सांगता काय?
(मा. अॅडमिन यांचे करता टीप: महोदय, वर लिंबू भाऊंना ब्राह्मण म्हणून म्हणजे पुरोहित म्हणून म्हणायचे असावे. त्याच अनुषंगाने प्रतिसाद आहे. जातीवाचक शिविगाळ नाही. कृपया अॅट्रॉसिटी कलम लावून उडवू नये हे वि.)
?
?:हहगलो:
मंजोजी, :हहागलो:
मंजोजी,
:हहागलो:
वॉल्डे मॉर्टी लोक !
वॉल्डे मॉर्टी लोक !
(No subject)
व्वा छान चर्चा..!!!
व्वा छान चर्चा..!!!
>>> कृपया अॅट्रॉसिटी कलम
>>> कृपया अॅट्रॉसिटी कलम लावून उडवू नये हे वि.) <<<


इब्लिसराजे, पण प्रॅक्टिकल मधल अॅट्रॉसिटी कलम "ब्राह्मणान्विरुद्ध" लावले जाते, जस्ट तुम्च्या माहिती कर्ता सान्गितले बर्का
>>>ब्राह्मण म्हणून तुम्ही माझे काय काम करू शकता ते सांगता काय? <<<<
हे मुलखाच्या महाचिन्गुसपणामुळे सोईस्कर पुरोगामित्वाचा/नास्तिकतेचा आव आणित देवधर्म न पाळणार्या लोकान्करता सान्गतोय!
)
बेसिक मधेच राडा हे हो भौ, मी ब्राह्मण म्हणून कुणाचेही कसलेही "काम" करत नाही, तो मान गल्लीबोळापासुन दिल्लीपर्यन्तच्या नेताजी लोकान्चा, मी फक्त अमक्यातमक्याचे अमकेतमके काम होण्यास मदत कर अशा अर्जविनन्त्या परमेश्वराला पाठवू शकतो!
पण तुम्हापुरते, तुम्हाला अशा अर्जविनन्त्यान्चे स्वावलम्बनाचे अन जोडीला परोपकाराचे धडे शिकवू शकतो!
त्याशिवाय तुम्हाला बोधामृत पाजू शकेन. गुरूमन्त्र/गुरुपदेश देऊ शकेन (लौकरच गुरुपोर्णिमा येत आहे, तुमच्या माहिती करता)
मनोभावे पाया पडलात तर तोन्डभर आशिर्वाद देऊ शकेन (यास दक्षिणा नसते
फक्त मला काळजी एकाच गोष्टीची आहे की स्वर्ग वा नरक, दोन्हीकडे अॅडमिशन नै मिळाली तुम्हाला, तर त्रिशन्कु सारखे मधेच लटकायला झाल्यावर मी फारसे काही करू शकत नाही, तेवढी पॉवर नाय मला! अन घाटावरची कामे मी करत नाय!
(No subject)
(No subject)
>>अन घाटावरची कामे मी करत
>>अन घाटावरची कामे मी करत नाय!
Pages